भगवान विष्णूंचा सातवा अवतार म्हणून प्रभू श्रीरामांची ओळख आहे. या अवतारामध्ये प्रभू रामांनी धर्माच्या आणि कर्तव्याच्या मार्गावर चालत कायमच समाजापुढे आदर्श उभा केला. श्रीराम या अवतारात त्यांनी मुख्य म्हणजे रावणासारख्या बलाढ्य व्यक्तीचा सामना करत त्याला युद्धात हरवत त्याचा वध केला होता. मात्र भगवान विष्णूंना राम अवतार का घ्यावा लागला याचे कारण माहिती आहे का? यामागे केवळ रावणाचा वध हे कारण नव्हते तर अजूनही काही कारणं आणि दोन श्राप होते. (Ramnavami)
भगवान विष्णूंना रामाचा अवतार का घ्यावा लागला, याची वेगवेगळी कारणे श्रीमद्भागवत, वाल्मिकी रामायण, हरिवंशपुराण आणि रामचरितमानसमध्ये दिली आहेत. श्रीमद भागवत महापुराणातील तिसऱ्या अध्यायात याबद्दल एक कथा आहे. सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्माजींनी तपश्चर्या करून अनेक लोक निर्माण केले. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार या चार ऋषींच्या रूपात अवतार घेतला. ते भगवान विष्णूंचे पहिले अवतार मानले जातात. वैकुंठलोकात भगवान विष्णूंचे जय-विजय नावाचे दोन द्वारपाल होते. एकदा सनकादि मुनी त्यांच्या दर्शनासाठी वैकुंठाला आले. सनकादि मुनी दरवाजातून बाहेर पडू लागले तेव्हा जय-विजय यांनी त्यांचा अपमान करत त्यांना थांबवले.. सनकादिक ऋषींना याचे वाईट वाटले. (Lord Ram)
त्यांनी दोघांना तीन जन्म राक्षसाच्या रूपात जन्म घेण्याचा शाप दिला. क्षमा मागितल्यावर सनकादि मुनी म्हणाले की भगवान श्री हरी स्वतः तिन्ही जन्मात तुमचा अंत करतील. तीन जन्मानंतर तुम्हाला मोक्ष मिळेल. पहिल्या जन्मात जय-विजय हिरण्यकशिपु आणि हिरण्यक्ष म्हणून जन्माला आले. भगवान विष्णूने वराह अवतार घेऊन हिरण्यक्षाचा वध केला आणि नरसिंहाच्या अवतारात हिरण्यकशिपूचा वध केला. दुसऱ्या जन्मात जय-विजयने रावण आणि कुंभकर्णाच्या रूपात जन्म घेतला. त्यांना मारण्यासाठी भगवान विष्णूंना रामाचा अवतार घ्यावा लागला. तिसर्या जन्मात दोघांचा जन्म शिशुपाल आणि दंतवक्र या रूपात झाला. या जन्मात भगवान श्रीकृष्णाने त्यांचा वध केला. रामाच्या अवताराचे पहिले कारण म्हणजे सनकादी ऋषींचा शाप. (Top Trending Headline)
दुसऱ्या एका आख्ययिकेनुसार रामचरित मानसच्या बालकांडमध्ये कथा आहे. एकदा नारदमुनी हिमालयात तपश्चर्या करत होते. त्यांची तपश्चर्या अनेक वर्षे चालू होती. इंद्राला वाटले की नारदमुनी आपल्या तपश्चर्येने इंद्राचे पद प्राप्त करतील. इंद्राने कामदेवाला नारद मुनींची तपश्चर्या मोडण्याची आज्ञा केली. नारदमुनी जिथे तपश्चर्या करत होते तिथे कामदेव पोहोचले. त्यांनी नारदमुनींवर कामुक बाण सोडले. बाणाने नारदमुनींची तपश्चर्या भंग झाली. त्यांनी डोळे उघडून कामदेवाकडे पाहिले. कामदेवाला वाटले की नारद मलाही भगवान शंकराप्रमाणे भस्मसात करतील. त्यांनी नारदांची क्षमा मागितली. (Todays Marathi Headline)

कामदेव म्हणाले की मी हे सर्व आमचा राजा इंद्राच्या आदेशानुसार केले. मला तपश्चर्या भंग करण्यात रस नाही. मी फक्त राजाच्या आज्ञेचे पालन केले आहे. कामदेवाचे असे शब्द ऐकून नारदांनी हसून त्यांना क्षमा केली. जेव्हा त्यांना क्षमा मिळाली तेव्हा कामदेव म्हणाले – मी भगवान शिवाची तपश्चर्या भंग केली होती, म्हणून त्यांनी मला जाळून राख केले.त्यांनी कामवर विजय मिळवला पण क्रोधाकडून पराभूत झाले. तुम्ही तुमच्या रागावर विजय मिळला आणि मला क्षमा केली. तुम्ही शिवपेक्षा मोठे संन्यासी झाले आहात. (Social Updates)
हे ऐकून नारद गर्विष्ठ झाले. हे सांगण्यासाठी ते भगवान शिवकडे गेले. भगवान महादेवांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि म्हणाले की हे तू मला सांगितले आहेस पण चुकूनही भगवान विष्णूला सांगू नकोस. नारदांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि ते थेट वैकुंठ लोकात गेले. हीच गोष्ट त्यांनी भगवान विष्णूंना सांगितली. भगवान विष्णूंना समजले की नारद अहंकारी झाले आहेत. त्यांचा अहंकार नष्ट करावा लागेल. (Marathi News)
भगवान विष्णूंनी आपल्या भ्रमाने नगर वसवले. ज्याचा राजा शीलानिधी होता आणि त्याची कन्या विश्वमोहिनी होती, जिचे स्वयंवर होणार होता. नारद जेव्हा त्या नगरात पोहोचले तेव्हा विश्वमोहिनीला पाहून त्यांना वाटू लागले की आता आपलेही लग्न करावे. ते भगवान विष्णूंकडे गेले आणि म्हणाले की कृपया मला तुमचे रूप द्या, जेणेकरुन विश्वमोहिनी मला स्वयंवरात निवडू शकेल. (Top Marathi News)
भगवान विष्णूंनी नारदांचे मुख वानरसारखे केले. ते स्वत: स्वयंवरात पोहोचले आणि विश्वमोहिनीने त्यांची वर म्हणून निवड केली. सर्वजण नारदांना हसत होते. हे पाहून नारदांनी भगवान विष्णूला शाप दिला की तुम्ही मला स्त्रियांपासून वियोग दिला त्यामुळे तुम्हीही मानवदेह धारण करून 14 वर्षे स्त्रीपासून वियोगात फिरत राहाल. मला वानरांचे तोंड दिले, हे वानर तुमची पत्नी शोधायला मदत करतील. भगवान विष्णूंनी नारदांचा हा शाप स्वीकारला. (Top Trending News)
एका वरदानानुसार श्रीमद भागवत महापुराण सांगते, सत्ययुगात ब्रह्मदेवाच्या अंशातून जन्मलेल्या मनु आणि शतरूप या दोघांनीही संतान मिळण्यासाठी भगवान विष्णूची वर्षानुवर्षे तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णू प्रकट झाले. त्यांनी मनू आणि शतरूपाला कोणते वरदान हवे आहे असे विचारले. दोघेही म्हणाले की देवा, आम्हाला तुझ्यासारखे मूल हवे आहे. भगवान विष्णू म्हणाले- माझ्यासारखा तर मीच आहे. त्यामुळे मी स्वतः तुमचा पुत्र म्हणून जन्म घेईन. त्रेतायुगात तुमचा जन्म राजा दशरथ आणि शतरूप कौशल्या म्हणून होईल. मी तुमचा पुत्र राम म्हणून जन्म घेईन. (Latest Marathi Headline)
=========
Ram Navami : मनोकामना पूर्ण करण्यासाठी रामनवमीला करा ‘हे’ उपाय
Ram Navami : श्रीरामांची कुलदेवी कोण होती माहिती आहे का?
Ramnavami : प्रभू श्रीरामांचा जन्मदिन अर्थात रामनवमी
Ramnavami : मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची ‘ही’ आहेत भारतातील प्रसिद्ध मंदिरं
=========
तर वाल्मिकी रामायणानुसार रावणाने ब्रह्मदेवासाठी कठोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला वरदान कोणते हेवे विचारले. रावण म्हणाला- मला अमर होण्याचे वरदान हवे आहे. ब्रह्माजींनी उत्तर दिले की या जगात कोणीही अमर नाही, जो जन्माला येईल त्याला मरावेच लागेल. मात्र, तुम्ही तुमच्या मृत्यूची परिस्थिती ठरवू शकता. (Top Stories)
रावण म्हणाला- ठीक आहे, मला असे वरदान द्या की मला कोणीही देव किंवा दानव मारू शकणार नाही. नाग, किन्नर, गंधर्व, यक्ष, गण किंवा कोणतीही देवी त्याला मारू शकली नाही. हिंसक प्राणीही मला मारू शकत नाही. ब्रह्मदेवाने वरदान दिले. रावणाने मानव आणि वानरांना सोडले कारण त्याला असे वाटले की जेव्हा कोणीही मारू शकत नाही तेव्हा ते त्याला कसे मारतील. ब्रह्मदेवाने रावणाला दिलेले हे वरदान हेच कारण होते की भगवान विष्णूला रामाचा अवतार मानवी रूपात घ्यावा लागला कारण फक्त एक सामान्य माणूसच रावणाचा वध करू शकतो. अशाप्रकारे दोन शाप आणि दोन वरदान हे रामाच्या अवताराचे मुख्य कारण बनले. (Social News)
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)