चैत्र नवरात्रीचा पवित्र पर्वकाळ सुरु होत आहे. चैत्र नवरात्री म्हणजे प्रभू श्रीरामाचे नवरात्र, हे नवरात्र गुढीपाढवा ते रामनवमी पर्यंत असते. श्रीराम हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात झाला, असे मानले जाते. चैत्र शुक्ल नवमी अर्थात रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 च्या दरम्यान प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता. सनातनी लोकांचे आराध्य दैवत म्हणून श्रीरामांची ओळख आहे. त्रेतायुगात भगवान विष्णूंनी राम अवतार घेतला होता. रामांसारखे जीवन जगणे संपूर्ण मानव जातीसाठी अतिशय अवघड आहे. त्यांनी त्यांच्या जीवनात कायम तत्वांना प्राधान्य दिले. एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी असे मर्यादा पुरुषोत्तम राम हे आज सगळ्यांसाठीच आदर्श आहेत. आज्ञाधारक मुलगा, प्रजाहितदक्ष राजा, उत्तम पती, खरा मित्र, आदर्श वडील, आदी सर्वच भूमिका त्यांनी अतिशय सर्वोत्तम पद्धतीने साकारल्या. आज याच श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा होत आहे. आजच्या दिवशी अनेक लोकं श्रीरामांच्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये जाऊन त्यांचे दर्शन घेतात. भारतातील प्रभू रामचंद्रांची प्रसिद्ध मंदिरं कोणती चला जाणून घेऊया. (Ramnavami)
अयोध्या राम मंदिर, उत्तर प्रदेश
भारतातील अयोध्या मंदिर भारतातील एक प्राचीन राम मंदिर आहे. अयोध्या ही श्रीरामाची जन्मभूमी आहे. ज्यामुळे अयोध्यामधील राम मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्या या प्राचीन शहरातील शरयू नदीच्या काठी हे राममंदीर वसलेले आहे. अयोध्या मध्ये प्रभू श्रीराम यांचे भव्य मंदिर स्थापित करण्यात आले आहे. अयोध्या ही श्रीराम यांची जन्म भूमी होय. तसेच भारतातील सर्वात जुने मंदिर अयोध्येतील राम मंदिर होते जे बाबरने पाडले होते. आता श्रीराम मंदिर भव्य आणि दिव्य बांधले गेले आहे. (Lord Ram Temple)

राम राजा मंदिर, मध्य प्रदेश
भारतातील आणखी एक प्रसिद्ध राम मंदिर मध्य प्रदेशच्या ओरछा या शहरात आहे. हे मंदिर झाशी रेल्वे स्टेशनपासून फक्त तेरा किलोमीटरवर आहे. बेतवा नदीच्या काठी ते वसलेलं आहे. राम राजा मंदिर भारतातील एकमेव असे मंदिर आहे जिथे श्रीरामाची एक राजाच्या रूपात पूजा केली जाते. या मंदिरात श्रीरामाप्रमाणेच सीता, लक्ष्मण आणि महाराज सुग्रीव आणि भगवान नरसिंह, भगवान हनुमान आणि जामवंताच्या मूर्तीचीही मनोभावे पूजा केली जाते. (Marathi)

सीता रामचंद्रस्वामी मंदिर, तेलंगणा
सीता रामचंद्र मंदिर भारताच्या तेलंगणा राज्यातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर भारतातील प्रसिद्ध श्रीरामाच्या मंदिरांपैकी एक असून ते गोदावरी नदीच्या काठी वसलेलं आहे. सीता रामचंद्रस्वामी मंदिर हैदराबादपासून तीनशे किलोमीटरवर आहे. सीतारामस्वामी मंदिर एक प्राचीन मंदिर असून त्यामध्ये चारशे वर्षांचा इतिहास दडलेला आहे. (Social Updates)

रामास्वामी मंदिर, तमिळनाडू
रामास्वामी मंदिर हे भारतातील प्रमुख राममंदिरांपैकी असून ते 16 व्या शतकातील आहे. या मंदिराचे बांधकाम सुबक आणि लक्षणीय आहे. तामिळनाडूमधील कुंभकोणममध्ये श्रीरामाचे हे मंदिर आहे. शेकडो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले आहे. या मंदिरातही रामनवमीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात केला जातो. (Latest Marathi News)

काळाराम मंदिर, नाशिक, महाराष्ट्र
भारतातील एक प्रसिद्ध राममंदिर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. काळाराम मंदिर हे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. श्रीराम यांनी त्यांच्या 14 वर्षाच्या वनवासातील मोठा काळ नाशिकमध्ये व्यतीत केला आहे. नाशिकमधील पंचवटीमध्ये आजही भगवान श्रीरामाच्या अस्तित्वाच्या खुणा सापडतात. काळाराम मंदिराची निर्मिती 1782 साली सरदार रंगराव ओढेकर यांनी केली. पूर्वी या मंदिराची बांधणी लाकडाची होती. मात्र, काळ्या दगडात हे मंदिर बांधण्यात आले. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीदेखील काळ्या दगडाची असल्याने या मंदिराला काळाराम मंदिर अशी ओळख मिळाली. असं म्हणतात की, ही श्रीरामाची मूर्ती गोदावरीत सापडली आहे. (Todays Marathi Headline)

त्रिपायर श्री राम मंदिर, केरळ
भारतातील आणखी एक प्रसिद्ध राममंदिर केरळमधील त्रिशूरमध्ये आहे. त्रिपायर नदीच्या काठी त्रिपायरमध्ये श्रीराम मंदिर कोडुन्गल्लुर हे प्रमुख धार्मिक स्थळ आहे. केरळला देवभूमी समजले जाते. त्यामुळे हे स्त्रोतत्रिपायर श्रीराममंदिर भारतातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. या मंदिरामध्ये भगवान श्रीरामाची पूजा त्रिप्रयारप्पन म्हणजेच त्रिपायर थेवरच्या रूपात केली जाते. केरळमधील अनेक सुंदर मंदिरांच्या यादीत या मंदिराचा समावेश होतो. या मंदिरातील अरट्टूपुझा पूरम उत्सव प्रसिद्ध आहे. (Top Marathi News)

राम मंदिर, भुवनेश्वर, ओडिशा
ओडीसामधील भुवनेश्वरच्या खारावेलमध्ये हे राम मंदिर आहे. शहराच्या अगदी मध्यभागी वसलेलं हे राम मंदिर भारतातील प्रसिद्ध राम मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेच्या सुंदर मूर्ती आहेत. या ठिकाणी दरवर्षी रामनवमीला भक्तांचा प्रंचड ओघ इथे सुरू असतो. (Latest Marathi Headline)

कोदंडराम मंदिर, कर्नाटक
कोदंडारामस्वामी मंदिर हे भारतात कर्नाटकमधील चिक्कमगलुरू या थंड हवेच्या ठिकाणी वसलेलं आहे. बंगलोरपासून ते जवळजवळ 250 किलोमीटरवर आहे. या मंदिरामध्ये धर्नुधारी श्रीराम आणि लक्ष्मणाची मूर्ती आहे. श्रीरामाच्या धनुष्याला कोदंडा असं म्हणतात म्हणून या मंदिराचं नाव कोदंडारामस्वामी असं असावं. या मंदिराची निर्मिती दहाव्या शतकात चोल राजांनी केली. असं म्हणतात लंकेवरून परतल्यावर श्रीराम, लक्ष्मण आणि सीता या ठिकाणी थांबले होते. (Top trending News)

रामटेक मंदिर, नागपूर, महाराष्ट्र
रामटेक हे भारतातील एक असे राममंदिर आहे जे महाराष्ट्रातील नागपूर शहरात आहे. नागपूर रेल्वेस्टेशनपासून जवळपास 54 किलोमीटरवर हे मंदिर आहे. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून या मंदिराची ख्याती आहे. असं म्हणतात की, पावसाळ्यामध्ये जवळजवळ चार महिने श्रीराम या ठिकाणी वास्तव्यास होते. अशीही आख्यायिका आहे की या ठिकाणी साधना केल्यामुळे श्रीरामाला अध्यात्मिक ज्ञान आणि ब्रम्हास्त्राचे ज्ञान अवगत झाले होते. त्यामुळे या स्थळाला एक दैवी महत्त्व प्राप्त झालेले आहे. (Top Stories)

==========
Ram Navami : मनोकामना पूर्ण करण्यासाठी रामनवमीला करा ‘हे’ उपाय
Ram Navami : श्रीरामांची कुलदेवी कोण होती माहिती आहे का?
Ramnavami : प्रभू श्रीरामांचा जन्मदिन अर्थात रामनवमी
==========
रघुनाथ मंदिर, जम्मू
रघुनाथ मंदिर हे जम्मू काश्मिरमध्ये असून हे भारतातील एक प्रसिद्ध राम मंदिर आहे. रघुनाथ मंदिर ही संपूर्ण जम्मू काश्मिरची एक ओळख मानली जाते. या राम मंदिराची निर्मिती 1835 साली महाराजा गुलाब सिंह यांनी सुरू केली पुढे महाराजा रणजीत सिंह यांच्या काळात हे मंदिर बांधून पूर्ण झाले. रघुनाथ मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथली वास्तुकला आहे. शिवाय या मंदिरातील आतील भिंतींना सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे. या मंदिरात सात ऐतिहासिक धार्मिक स्थळे असल्यामुळे ती पाहण्यासाठी कायमच पर्यंटकांची गर्दी होत असते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics