अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पराभूत करण्यासाठी आता इराणच्या हृदयावरच वार केले आहेत. १४ मार्च रोजी अमेरिकेने इराणच्या खार्ग बेटावर सर्वात मोठा हल्ला केला. ट्रम्प यांनी या हल्ल्याचे “मध्यपूर्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली बॉम्बस्फोट” असे वर्णन करत अमेरिकेने इराणच्या हृदयाला नष्ट केल्याचा मोठ्या अभिमानाने दावा केला आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांची जी नाकेबंदी केली आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला गरजेचा असल्याचे स्पष्टीकरण ट्रम्प यांनी दिले. तसेच सध्यातरी खार्ग बेटावरील तेल पायाभूत सुविधा नष्ट न करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मात्र इराणने यापुढेही असेच हल्ले सुरू ठेवले तर अमेरिका खार्गमधील तेल निर्यातीच्या पायाभूत सुविधाही नष्ट करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. अमेरिका-इराण युद्धातील ही सर्वात मोठी आणि चिंताजनक घटना ठरणार आहे. आधीच होर्मुझ सामुद्रधुनीद्वारे इराणने तेल निर्यात मर्यादित केली आहे. त्यात इराणची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खार्ग बेटावरील लष्करी तळ उद्ध्वस्त केल्यामुळे इराणनेही अमेरिकेचा बदला घेणार असल्याचे म्हटले आहे. इराणला नमवण्यासाठी सर्व प्रयत्न करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी खार्गवर हल्ला करून मधमाशांचे मोहोळ फोडले असून यापुढे इराण अधिक जोमाने अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ( Iran’s Kharg Island )

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने सुरू केलेल्या युद्धात अमेरिकेला पंधरा दिवसांनंतरही अपेक्षित यश न मिळाल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प जिद्दीने पेटले आहेत. त्यांनी आता इराणच्या आर्थिक स्रोतांवर वार करण्यास सुरुवात केली आहे. इराणच्या शिरेपेचातील कोहिनूर म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या खार्ग बेटावरील लष्करी तळ पूर्णपणे नष्ट केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. त्यासाठी यूएस सेंट्रल कमांडने मध्यपूर्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली हवाई हल्ले केल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र हा हल्ला करताना तेथील तेल पायाभूत सुविधांना लक्ष्य केले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या सर्व घडामोडींमध्ये खार्ग बेटाचा इतिहास महत्त्वाचा आहे. सुरुवातीपासूनच या बेटावर अमेरिकेची नजर होती. खार्ग बेट ताब्यात आले तर इराणच्या आर्थिक नाड्या ताब्यात येतील, हे अमेरिका जाणून आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या आधीच्या अध्यक्षांनीही या बेटाला हस्तगत करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो अयशस्वी ठरला. आता ट्रम्प खार्ग बेटांच्या मागे लागले आहेत. आत्तापर्यंत अमेरिकेने खार्ग बेटांना लक्ष्य केले नव्हते, पण आता झालेल्या हल्ल्यामुळे अमेरिका या बेटावर कब्जा करू शकते, अशी शक्यता वाढली आहे. खार्ग बेट हे इराणच्या अर्थकारणातील प्रमुख शक्तीस्थान आहे. इराणचे सर्वात मोठे तेलसाठे येथे आहेत. इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी सुमारे ९० टक्के निर्यात या लहान बेटावरून होते. खार्ग हे फक्त २० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले प्रवाळ बेट आहे. ते इराणच्या नैऋत्येस स्थित असून बुशहर प्रांताचा भाग आहे. खार्ग हे इराणचे मुख्य तेल निर्यात टर्मिनल आहे. मोठ्या तेल टँकरसाठी आवश्यक असलेली समुद्राची खोली येथे असल्यामुळे कच्च्या तेलाच्या निर्यातीसाठी हे सर्वात योग्य स्थान मानले जाते. येथून जवळच इराणचा सर्वात मोठा ऑफशोअर ऑइल कॉम्प्लेक्स अबूझर आहे, जो इराणच्या तेल उत्पादनाचा प्रमुख स्रोत आहे. अबूझर ऑइल फिल्डमध्ये तीन मुख्य उत्पादन प्लॅटफॉर्म आहेत आणि प्रत्येकाची उत्पादन क्षमता दररोज ८०,००० बॅरल आहे. अबूझर ऑइल रिफायनरी देखील खार्ग बेटावर आहे. ( Iran’s Kharg Island )
=======
हे देखील वाचा : Iran’s Hormuz Island : होर्मुझ बेट…. लाल माती आणि सॉस
=======
खार्गमध्ये ४० हून अधिक कच्च्या तेल साठवण टाक्या असून त्यांची एकूण क्षमता २० दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त आहे. येथे कच्च्या तेलाच्या गुणवत्तेची सतत चाचणी करण्यासाठी एक रासायनिक प्रयोगशाळा आहे, जी ISO/IEC १७०२५ मानकांनुसार प्रमाणित असून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आहे. खार्ग बेटावर एक पेट्रोकेमिकल कंपनीही आहे, जी तेल उत्पादनादरम्यान सोडल्या जाणाऱ्या वायूंचे उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतर करते. ८,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या बेटावर इस्लामिक आझाद विद्यापीठाची सागरी विज्ञान आणि कला शाखा आहे. पेट्रोलियम आणि सागरी अभ्यास हे तेथील प्रमुख विषय आहेत. केवळ इराणमधीलच नव्हे तर जगभरातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात.
आता अमेरिकेने या बेटावर हल्ला केला असून बेटाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. नेमके काय नष्ट झाले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणवर आणखी हल्ले करण्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी जर येथील तेल पायाभूत सुविधांना लक्ष्य केले तर जगातील तेलसंकट अधिक तीव्र होणार आहे. तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होऊन जगभर महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. ( Iran’s Kharg Island )
– सई बने
- 20 million barrel capacity
- 90 percent oil export route
- Abuzar oil field
- Bushahr province Iran
- crude oil storage tanks
- Donald Trump statement
- economic sanctions impact
- energy security crisis
- global inflation risk
- global oil crisis
- Gulf geopolitics
- Iran oil exports
- Iran retaliation threat
- Iranian military base strike
- Kharg Island airstrike
- maritime trade disruption
- Middle East tensions
- military escalation Middle East
- offshore oil complex
- oil price surge
- petrochemical facilities Iran
- Strait of Hormuz blockade
- strategic oil terminal
- US Central Command operation
- US Iran conflict