Home आंतरराष्ट्रीय Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

57
Katrina Kaif

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती आहे. मात्र याच चीनमधील एका भविष्यवक्त्याचे नावही चर्चेत आले आहे. या चीनच्या नॉस्ट्राडॅमसने इराण युद्धाची भविष्यवाणी आधीच केली होती. सोबतच हे युद्ध संपल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याभोवती अडचणींचा फास अधिक घट्ट होणार असल्याचेही सांगितले होते. चीनचे नॉस्ट्राडॅमस म्हणून जियांग शुएकिन यांचे नाव घेतले जाते. जियांग यांनी अमेरिका-इराण युद्धाची भविष्यवाणी आणि दोन्ही देशांमधील दोन आठवड्यांच्या युद्धविरामाचीही भविष्यवाणी केली होती. या दोन्हीही भविष्यवाण्या सत्यात उतरल्यावर आता त्यांची तिसरी भविष्यवाणी चर्चेत आहे. यात त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना भविष्यात आव्हानात्मक परिस्थिती राहणार असून, त्यांच्या खुर्चीलाही धोका असल्याचे सांगितले आहे. ( Jiang Xueqin )

चीनचे नॉस्ट्राडॅमस म्हणून जियांग शुएकिन यांना ओळखले जाते. जियांग यांनी फार पूर्वीच अमेरिका आणि इराण यांच्यात महाविनाशकारी युद्ध होणार, असे भाकीत केले होते. जियांग शुएकिन यांनी २०२४ साठी तीन प्रमुख भाकिते केली होती. त्यांचे पहिले भाकीत होते की, ट्रम्प अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक जिंकतील. त्यांचे दुसरे भाकीत होते की, अमेरिका इराणविरुद्ध युद्धभूमीवर उतरेल. तर तिसरे भाकीत होते की, अमेरिका इराणसोबतचे युद्ध हरेल आणि यामुळे जागतिक व्यवस्था कायमची बदलेल. जियांग यांनी या युद्धाचे फक्त भाकीत केले नव्हते, तर युद्धात कोणाची बाजू सरस ठरेल हेही सांगितले होते. जियांग यांनी तेव्हाच इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेला संघर्ष करावा लागू शकतो, हे सांगितले होते. मात्र अमेरिकेचा महासत्तेचा दर्जा पाहून जियांग यांना या भविष्यावरून ट्रोल करण्यात आले होते. अमेरिकेला इराणसारखा देश हरवू शकत नाही. उलट इराण अमेरिकेसमोर फार दिवस उभा राहू शकणार नाही, असेही काहींनी सांगितले होते. मात्र जियांग शुएकिन आपल्या भविष्यावर ठाम राहिले. आता अमेरिका-इराण युद्ध सुरू झाल्यावर चाळीस दिवसानंतरही इराणचे पारडे जड होते, हे उघड आहे. त्यावरून जियांग यांची ही भविष्यवाणी सत्यात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळेच जियांग शुएकिन यांनी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अधिक वादात अडकणार असून त्यांची खुर्चीही जाणार का, अशी उत्सुकता अनेकांना आहे.

अमेरिका-इराण युद्धाबाबत जियांग यांनी सविस्तर भविष्य सांगितले आहे. त्यात जियांग शुएकिन यांनी असेही म्हटले आहे की, अमेरिका अनिच्छेने का होईना, इराणमध्ये जमिनीवरील कारवाईसाठी आपले सैन्य पाठवू शकते. माध्यमांच्या वृत्तानुसार, इस्लामाबाद येथे होणारी शांतता वार्ता अयशस्वी ठरली तर ट्रम्प प्रशासन इराणचे समृद्ध युरेनियम सुरक्षित करण्यासाठी विशेष दले पाठवण्याचा निर्णय घेऊ शकते. जियांग शुएकिन ‘प्रेडिक्टिव्ह हिस्ट्री’ नावाचे यूट्यूब चॅनल चालवतात, जिथे ते आपली भाकिते आणि विचार मांडतात. जियांग बीजिंगमध्ये तत्त्वज्ञान आणि इतिहास शिकवतात. येल कॉलेजचे पदवीधर असलेल्या जियांग यांनी चीनमधील शिक्षण सुधारणा आणि अभ्यासक्रम विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासोबत ते भाकितेही सांगतात. त्यांच्या या अचूक भाकितांमुळेच त्यांना ‘चीनचा नॉस्ट्राडॅमस’ हे टोपणनाव मिळाले आहे. शैक्षणिक क्षेत्रापलीकडे, जियांग यांनी त्यांच्या ‘प्रेडिक्टिव्ह हिस्ट्री’ या यूट्यूब चॅनलद्वारे मोठी लोकप्रियता मिळवली आहे. यामध्ये जियांग वारंवार घडणारे भूकंप आणि राजकीय घटना याबाबत आपल्या प्रेक्षकांना माहिती देत असतात. ( Jiang Xueqin )

=======

हे देखील वाचा : Donald Trump Ceasefire : ट्रम्पच्या पलटीमागचं सत्य

=======

जियांग हे ‘सायकोहिस्ट्री’ या संकल्पनेवर आधारित भाकिते व्यक्त करतात. ही एक काल्पनिक विज्ञान शाखा असून लेखक आयझॅक असिमोव्ह यांनी ‘फाउंडेशन’ मालिकेत तिची संकल्पना मांडली आहे. ही शाखा भविष्याचा अंदाज लावण्यासाठी दीर्घकालीन ऐतिहासिक प्रवाहांचा वापर करते. त्यांच्या या सायकोहिस्ट्री संकल्पनेवर त्यांनी ट्रम्प यांच्यासंदर्भात जी भाकिते व्यक्त केली, तेव्हा खूप टीका झाली होती. तेव्हा जियांग यांनी अमेरिका-इराण या युद्धात इराणला फायदा होऊ शकतो, कारण इराणी लोक गेल्या २० वर्षांपासून या संघर्षाची तयारी करत असल्याचे सांगितले होते. त्यांनी हे भाकीत सांगितल्यावर त्यांची खिल्ली उडवण्यात आली. मात्र युद्ध सुरू झाल्यावर हे भाकीत प्रत्यक्षात उतरले आहे. आता जियांग यांनी हे युद्ध दीर्घकाळ चालेल आणि जेव्हा ते अखेरीस संपेल, तेव्हा जग पूर्वीसारखे राहणार नाही, असे नवे भाकीत केले आहे. त्यामुळे या युद्धाच्या परिणामाच्या कल्पनेने आता भीती व्यक्त होत आहे. ( Jiang Xueqin )

सई बने…

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

आंतरराष्ट्रीय

Iran’s Long History : अलेक्झांडर ते ट्रम्प… इराणपुढे झाली सर्वांची हार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अंतिम इशारा देत, “एक संपूर्ण संस्कृती...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!