Home लाईफ स्टाईल Akshaya Tritiya : कधी आहे अक्षय्य तृतीया?
लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : कधी आहे अक्षय्य तृतीया?

63
Akshaya Tritiya

गुढीपाडवा झाला की, वेध लागतात ते अक्षय्य तृतीयेचे. अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील लोकांचा महत्त्वाचा सण असतो. अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. याला अखाती तीज असेही म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस सनातन धर्मात अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी केलेले कोणतेही शुभकार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते. तसेच भगवान विष्णूच्या सहाव्या अवताराचे रूप असलेल्या परशुरामांचा जन्म याच दिवशी झाला असल्याने परशुराम जयंती देखील यादिवशी साजरी करतात. शास्त्रानुसार, या दिवशी केलेले दान, धर्म आणि खरेदी कधीही क्षयाला जात नाही, म्हणूनच नवीन व्यवसायाचा श्रीगणेशा करण्यासाठी किंवा सोने खरेदी करण्यासाठी हा वर्षातील सर्वात शुभ दिवस मानला जातो. (Akshaya Tritiya)

यंदा तृतीया तिथीची सुरुवात ही 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:49 वाजता होणार आहे. तर तृतीया तिथीची समाप्ती ही 20 एप्रिल 2026, सकाळी 07:27 वाजता होईल. अशातच मध्यान्हव्यापिनी तृतीया तिथी 19 एप्रिल रोजी दुपारी येईल. त्यामुळे यावर्षी अक्षय तृतीया 19 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. या दिवशी पूजेची वेळ सकाळी 10 वाजून 49 मिनिटांनी सुरू होईल. हा शुभकाळ दुपारी 12 वाजून 20 मिनिटांपर्यंत चालेल. या वेळेत लक्ष्मी मातेची पूजा कोणत्याही वेळी करता येईल. यंदा अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खास योग देखील तयार होत आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राची युती होणार आहे, जे स्वतःच अत्यंत शुभ मानले जाते. यासोबतच, सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग देखील तयार होत आहेत, जे कोणतेही कार्य यशस्वी आणि फलदायी करण्यासाठी उत्कृष्ट मानले जातात. (Top Marathi News)

Akshaya Tritiya

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त 19 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजून 49 मिनिटांनी सुरू होईल.हा दिवस 20 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजून 51 मिनिटांपर्यंत चालेल. अक्षय्य तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने यादिवशी शुभकार्य केली जातात. तसेच नवीन वस्तू देखील घेतात. अक्षयतृतीयेला सोने आणि चांदी घेणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच यादिवशी वास्तू खरेदी करणे सुद्धा शुभ मानतात. गृहप्रवेश केला जातो, वास्तुशांती देखील घातली जाते. नवीन गाडी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर अनेकजण घेतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्व आहे. यादिवशी गोर गरिबांना अन्नदान करणे शुभ मानतात. तसेच पक्षांना धान्य टाकणे, गरजुंना आवश्यक वस्तू दान करणे महत्वाचे मानले जाते. यादिवशी तुम्ही कोणत्याही स्वरूपाचे दान करू शकता. (Latest Marathi Headline)

अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा करण्याची मान्यता आहे. देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो. असे म्हणतात यादिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरात धनसंपत्ती, समृद्धी येते. दिवाबत्ती, धूप हार फुले वाहून देवीची आराधना करावी. काहीजण कलश मांडून देखील पूजा करतात. तसेच घरात गोडाचा नैवेद्य करून तो देवाला अर्पण करावा. (Top Stories)

धार्मिक मान्यतेनुसार वैशाख महिन्याच्या तिसऱ्या दिवशी, विश्वाचे रक्षक भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात आपला सहावा अवतार घेतला. याच दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली. अक्षय तृतीयेलाच संपत्तीचा देव कुबेराने भगवान शिवाची तपश्चर्या केली आणि त्यांच्यावर प्रसन्न होऊन महादेवाने त्यांना देवांचे कोषाध्यक्ष बनवले म्हणूनच या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते. शिवाय धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते. यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही. हिंदू धर्मासोबतच अक्षय्य तृतीयेचा दिवस जैन धर्मासाठीही महत्त्वाचा आहे. (Social News)

( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!