Home लाईफ स्टाईल Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

23
Parshuram

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू यांनी अनेक अवतार घेतले त्यातलाच एक अवतार म्हणजे भगवान परशुराम. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. याचं शुभ दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. त्यामुळे या दिवशी परशुराम जयंती देखील साजरी केली जाते. हा श्री विष्णूचा उग्र अवतार मानला जातो. श्रीरामांच्या आधी त्यांनी पृथ्वीवर अवतार घेतला होता. असे म्हणतात की त्यांना चिरंजिवी होण्याचे वरदान मिळाले होते. स्कंद पुराण आणि भविष्य पुराणानुसार वैशाख शुक्ल तृतीयेला रेणुकेच्या गर्भातून भगवान विष्णू जन्माने ब्राह्मण आणि कर्माने क्षत्रिय भृगुवंशी परशुराम म्हणून जन्माला आले. त्यांचे पिता जमदग्नी ऋषी आहेत. एका आख्यायिकेनुसार, परशुरामची आई रेणुका आणि महर्षी विश्वामित्र यांच्या आईने एकत्र पूजा केली आणि प्रसाद देताना ऋषींनी प्रसादाची देवाणघेवाण केली. या देवाणघेवाणीच्या परिणामानुसार परशुराम ब्राह्मण असूनही क्षत्रिय प्रकृतीचे होते आणि विश्वामित्र हे क्षत्रिय पुत्र असूनही ब्रह्मर्षी होते असे म्हणतात. (Bhgvan Parshuram)

संताप स्वभावाचे होते परशुराम
जमदग्नी ऋषीं आणि रेणुका यांच्या पाच मुलांपैकी परशुराम हे चौथे होते. विवाहानंतर सत्यवतीने महर्षी भृगु यांच्याकडून पुत्र प्राप्तीचे वरदान मागितले. तेव्हा महर्षी भृगु यांनी तिला २ फळे दिली आणि सांगितले की ऋतू स्नानानंतर तू उंबराच्या झाडाला आणि तुझ्या आईला पिंपळाच्या झाडाला आलिंगन द्यायला सांग आणि मग हे फळ खा. परंतु सत्यवती आणि तिच्या आईने या कामात चूक केली आणि चुकीच्या झाडांना आलिंगन देऊन फळ खाल्ले. जेव्हा ही गोष्ट महर्षी भृगुना समजली तेव्हा त्यांनी सत्यवतीला सांगितले की तुम्ही चुकीच्या झाडाला आलिंगन दिले आहे. म्हणूनच तुझा पुत्र ब्राम्हण असूनही क्षत्रिय गुणांचा होईल आणि तुझ्या मातेचा पुत्र क्षत्रिय असून देखील ब्राम्हणासारखे वर्तन करेल. हेच कारण होते की परशुराम ब्राम्हण असून देखील क्षत्रिय गुणांचे होते आणि विश्वामित्र क्षत्रिय असून देखील त्यांनी ब्रम्हर्षी पद प्राप्त केले. त्यामुळे परशुराम हे जमदग्नी ऋषींचे पाचवे अपत्य झाले, जे बालपणापासूनच क्रोधी स्वभावाचे होते. (Marathi)

भगवान शिवाकडून मिळाला परशु
भगवान परशुरामाचे मूळ नाव राम आहे. ते जमदग्नी ऋषींचे पुत्र असल्यामुळे त्यांना जमदज्ञ असेही म्हणतात. पण ते परशुरामाच्या नावाने जास्त प्रसिद्ध आहे. परशुराम हे देखील भगवान शिवाचे भक्त आणि शिष्य होत. त्यांची भक्ती आणि क्षमता पाहून भगवान शिवाने त्यांना विद्युभि नावाचा परशु दिला होता. नेहमी परशु धारण केल्यामुळे ते परशुराम या नावाने जगात प्रसिद्ध आहे. (Latest Marathi Headline)

गणेशाला एकदंत परशुरामांनीच बनवले
गणेश पुराणानुसार, महादेवाचे निस्सीम भक्त असलेले परशुराम कैलास पर्वतावर शिवनाथांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. मात्र, प्रथमेश गणपतीने त्यांना प्रवेशद्वारावरच अडवले. शिवशंकरांचे दर्शन घेण्यासाठी गणपती अडवत असल्याचे परशुरामांना खटकले. विनंती करूनही गणेश भगवंतांचे दर्शन घेण्यापासून रोखत आहेत म्हटल्यावर परशुरामांनी गणाधीशाला युद्धाचे आव्हान दिले. दोघांमध्ये मोठे युद्ध झाले. त्यात परशुरामांनी परशूने गणरायावर जोरदार प्रहार केला. त्यातच लंबोदराचा एक दात निखळला. तेव्हापासून पार्वतीनंदन एकदंत नावाने ओळखले जाऊ लागले. (Top Marathi News)

Parshuram

परशुरामांनी श्रीरामांना दिले होते युद्धाचे आव्हान
सीता स्वयंवराच्या वेळी जेव्हा रामाने भगवान शिवाचे धनुष्य तोडले तेव्हा पृथ्वी हादरली, अशी आख्यायिका आहे. सीतास्वयंवरावेळी शिवशंकरांचे शिवधनुष्य भंग केल्यावर मिथिलेत परशुराम प्रकट झाले. यावेळी ते महेंद्र पर्वतावर ध्यानस्त बसले होते. सुरुवातीला विष्णूस्वरूप श्रीरामांना परशुराम ओळखू शकले नाही. ते महाराज जनकाच्या दरबारात पोहोचले आणि भगवान रामाला युद्धासाठी आव्हान देऊ लागले. त्यावेळी भगवान रामाने परशुरामाला आपण भगवान विष्णूचा अवतार असल्याची जाणीव करून दिली. भगवान रामाचे रहस्य कळल्यावर परशुराम यांचा राग शांत झाला. (Marathi NEws)

बत्तीस हात उंच सोन्याची वेदी
भगवान परशुरामजींनी यज्ञ करण्यासाठी बत्तीस हात उंच सोन्याची वेदी बनवली होती आणि त्यात शेकडो यज्ञ केले होते. नंतर ही वेदी महर्षी कश्यप यांनी घेतली आणि परशुरामांना पृथ्वी सोडण्यास सांगितले. तेव्हा परशुरामजींनी त्याची आज्ञा पाळली आणि समुद्र परत घेऊन गिरिश्रेष्ठ महेंद्राकडे गेले. (Trending News)

परशुराम यांनीच बनवले केरळ
मान्यतेनुसार परशुरामजींनी ही जमीन हैययवंशी क्षत्रियांकडून जिंकल्यानंतर दान केली होती. राहायला जागा उरली नाही तेव्हा ते सह्याद्री पर्वताच्या गुहेत बसून वरुणदेवाची तपश्चर्या करू लागले. वरुण देवाने परशुरामांना दर्शन दिले आणि सांगितले की तू समुद्रात कुऱ्हाड टाक. तुझी कुऱ्हाड समुद्रात पडेल तितके समुद्राचे पाणी सुकून पृथ्वी होईल. ती सर्व पृथ्वी तुझी होईल. परशुरामांनी हे केल्यावर समुद्राचे पाणी आटले आणि त्यांना समुद्रात सापडलेल्या जमिनीला आजचे केरळ म्हणतात. याच भूमीवर परशुरामजींनी भगवान विष्णूचे मंदिर बांधले. तेच मंदिर आजही ‘तिरूक्ककर अप्पण’ या नावाने प्रसिद्ध असल्याचे सांगितले जाते. ज्या दिवशी परशुरामजींनी मंदिरात मूर्तीची स्थापना केली त्या दिवशी ‘ओणम’ हा सण साजरा केला जातो. (Top Stories)

========

Akshaya Tritiya : कधी आहे अक्षय्य तृतीया?

Financial Growth : घरात ‘ही’ झाडं लावा आणि आर्थिक सुबकता आणा

========

परशुराम पहिले कावडी
कावड आणून भोलेनाथांचा अभिषेक करण्याची पद्धत नेमकी केव्हा आणि कुठून सुरू झाली हे सांगणे कठीण आहे. परंतु भगवान परशुराम हे पहिले कावडी होते ज्यांनी गंगेच्या पाण्याने शिवाचा जलाभिषेक केला असे निश्चितपणे म्हणता येईल. परशुरामांनी वडिलांची आज्ञा मानून कजरी वनात शिवलिंगाची स्थापना केली. तेथे असताना त्यांनी गंगाजल आणून त्याचा महाभिषेक केला. या ठिकाणी आजही प्राचीन मंदिर अस्तित्वात आहे. कजरी वनक्षेत्र मेरठजवळ आहे. ज्या ठिकाणी परशुरामांनी शिवलिंगाची स्थापना करून जलाभिषेक केला होता. त्या जागेला ‘पुरा महादेव’ म्हणतात. (Social News)

( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

लाईफ स्टाईल

Akshay Tritiya : भारतातील प्रत्येक राज्यात अक्षय्य तृतीया कशी साजरी होते?

अक्षय्य तृतीया अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आता अनेकांच्या घरात या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!