Home आंतरराष्ट्रीय Iran’s Long History : अलेक्झांडर ते ट्रम्प… इराणपुढे झाली सर्वांची हार
आंतरराष्ट्रीय

Iran’s Long History : अलेक्झांडर ते ट्रम्प… इराणपुढे झाली सर्वांची हार

74

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अंतिम इशारा देत, “एक संपूर्ण संस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे,” असे विधान केले होते. ट्रम्प यांच्या या विधानावर अनेक नेत्यांनी टीका केली. पण ट्रम्प यांच्या या धमकीला तुर्कीमधील इराणी दूतावासाने जे उत्तर दिले, त्यातून इराणच्या युद्धातील चिवट वृत्तीचा परिचय नव्याने जगाला झाला आहे. ट्रम्प यांना उत्तर देताना इराणी दूतावासाने लिहिले की, “अलेक्झांडरने जाळले. मंगोलांनी उद्ध्वस्त केले. इतिहासाने त्याची परीक्षा घेतली आहे. पण इराण अजूनही इथेच आहे. एका मनोरुग्णाच्या धमक्या इराणला नष्ट करू शकत नाहीत.” यातूनच रोम, ग्रीस आणि मंगोल ज्या इराणची संस्कृती नष्ट करू शकले नाहीत, ती महान संस्कृती ट्रम्पसारखे मनोरुग्ण नेते काय नष्ट करणार, असे खुले आव्हान ट्रम्प यांना इराणतर्फे देण्यात आले. आता अमेरिकेने पंधरा दिवसांची युद्धबंदी जाहीर केल्यावर इराणची संस्कृती किती जुनी आहे, आणि अलेक्झांडरसारखा महान सेनानीही येथे कसा पराभूत झाला, याच्या कथा सांगितल्या जात आहेत. ( Iran’s Long History )

इराणला पुन्हा पाषाणयुगात नेणार, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यावर इराणमध्ये या धमकीचे स्वागत करण्यात आले. पाषाणयुगातही इराण समृद्ध होता, आम्ही तेव्हा गॅस आणि तेलाशिवाय राहत होतो, असे खुले प्रत्युत्तर इराणने अमेरिकेला दिले. त्यानंतर इराणचा इतिहास आणि संस्कृती कशी होती, याचा शोध घेतला जाऊ लागला आहे. मुळात इराणच्या मागे ५,००० ते १०,००० वर्षांचा इतिहास असलेली संस्कृती आहे. इराणी संस्कृतीची मुळे पश्चिम इराणच्या भागातील झाग्रोस पर्वतरांगांमध्ये सापडलेल्या प्राचीन मानवी वस्त्यांमध्ये पाहायला मिळतात. इ.स.पूर्व १५०० च्या सुमारास, मध्य आशियातील आर्यांनी इराणच्या सामाजिक आणि राजकीय रचनेत बदल घडवून आणला. हे आर्य नंतर मेडीज आणि पर्शियन लोकांमध्ये विभागले गेले. मेडियन साम्राज्य हे पहिले संघटित राज्य होते. त्यांची राजधानी एकबताना म्हणजेच इराण होती. सायरस द ग्रेटने शेवटचा राजा अस्टियागेस याला पराभूत केल्यानंतर या साम्राज्याचा अंत झाला. त्यानंतर सायरस द ग्रेटच्या काळात पर्सेपोलिससारखी भव्य शहरे बांधली गेली. सायरस हा धार्मिक सहिष्णुता आणि कार्यक्षम प्रशासकीय धोरणांसाठी प्रसिद्ध होता. इराणी साम्राज्याला सर्वात मोठा धक्का इ.स.पू. ३३० मध्ये बसला. हा तो काळ होता, जेव्हा मॅसेडोनिया, ग्रीसमधून अलेक्झांडरच्या नावाची लाट पसरत होती. अलेक्झांडरने पर्शियावर आक्रमण करून अचेमेनिड राजवंशाचा पराभव केला आणि २०० वर्षांहून अधिक जुन्या अचेमेनिड साम्राज्याचा अंत केला.

त्यानंतर ससानीयन साम्राज्य आले. इ.स. ६५१ मध्ये अरब मुस्लिमांच्या आक्रमणामुळे ससानीयन साम्राज्य कोसळले आणि इस्लामने इराणमध्ये प्रवेश केला. हळूहळू, इस्लाम हा प्रमुख धर्म बनला, परंतु पर्शियन संस्कृती पूर्णपणे नष्ट झाली नाही. या काळात सामनिद राजवंशांनी पर्शियन भाषा आणि साहित्याचे पुनरुज्जीवन केले. या काळात तुर्की आणि मंगोल आक्रमणे मोठ्या प्रमाणात झाली. मात्र इराणी संस्कृतीने आपली मुळे घट्ट रोवून ठेवली. सामनिद राजवंशाने इराणमध्ये शिया इस्लामला राजधर्म म्हणून घोषित केले. याच राजवंशाच्या काळात इस्फहानसारखी शहरे कला आणि वास्तुकलेची केंद्रे म्हणून उदयास आली. पर्शियन-इस्लामिक वास्तुकला, प्राचीन पूल, मशिदी आणि राजवाड्यांची उभारणी झाली. त्यापैकी अनेक इमारती आजही इराणच्या वैभवात भर घालत आहेत. जगभरातील पर्यटक येथील पर्शियन-इस्लामिक वास्तुकला पाहण्यासाठी आवर्जून येतात. १२१८ मध्ये इराणवर ख्वारेझम साम्राज्याचे राज्य होते. तेव्हा एका राज्यपालाने एका व्यापारी तांड्याची कत्तल केली. यात एका मंगोल राजनैतिक शिष्टमंडळाचीही हत्या झाली. या घटनेमुळे चंगेज खान प्रचंड संतापला. १२१९ मध्ये चंगेज खानने हल्ला करत मर्व, निशापूर आणि हेरात यांसारखी शहरे उद्ध्वस्त केली. ( Iran’s Long History )

=======

हे देखील वाचा : Donald Trump Ceasefire : ट्रम्पच्या पलटीमागचं सत्य

=======

तेथील लोकांना निर्घृणपणे ठार मारण्यात आले. यानंतर काही वर्षे हा प्रदेश चंगेज खानच्या ताब्यात होता. या काळात येथील जनतेवर अनेक अत्याचार झाले. पण त्यानंतरही इराणचा हा भाग नव्याने उभा राहिला. २० व्या शतकात इराणमध्ये पहलवी राजवंशाची सत्ता आली. पहलवी राजवंशाचा कल आधुनिकीकरणाकडे होता. मात्र बहुसंख्य इराणी जनतेला हे आधुनिकीकरण आवडले नाही. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात सामाजिक असंतोष पसरला. त्याचाच फायदा १९७९ मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीला झाला. १९७९ च्या इराणी क्रांतीने राजेशाही संपुष्टात आणली आणि इराण इस्लामिक प्रजासत्ताक देश म्हणून घोषित करण्यात आला.

जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक असलेल्या इराणवर अलेक्झांडर द ग्रेटपासून ते क्रूर चंगेज खानपर्यंत हल्ले झाले आहेत. पण आत्तापर्यंतच्या इतिहासात इराणी जनता पुन्हा उभी राहिली आहे. आता ट्रम्प यांनी इराणला पाषाणयुगात टाकण्याची धमकी दिल्यावरही येथील जनता आपल्या पूर्वजांच्या साहसी इतिहासामुळे स्थिर राहिली. ( Iran’s Long History )

सई बने….

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!