Home लाईफ स्टाईल GK : हॉटेलच्या रूम्समध्ये घड्याळ का नसते?
लाईफ स्टाईल

GK : हॉटेलच्या रूम्समध्ये घड्याळ का नसते?

71

आपण कुठेही फिरायला जातो तेव्हा आपण हॉटेलमध्येच राहतो. सध्याच्या काळात तर रिलॅक्स होण्यासाठी एक दिवस का असेना लोकं हॉटेलमध्ये स्टे करायला जातात. आजच्या हॉटेल्समध्ये तर जेवणाखाणापासून ते स्विमिंग पूल, डान्स बार, स्पा, कॉन्फरन्स हॉल, लग्न समारंभ आणि रात्रीच्या मुक्कामापर्यंत सर्व आधुनिक सोयी-सुविधा मिळतात. शिवाय आपल्याला गरजेच्या सगळ्या वस्तू असतात. बेड, सोफा, टीव्ही, गिझर, नळ, पाणी, पंखा, एसी वैगरे…अगदी बाथरूममधील टॉवेलपासून ते मिनीबारपर्यंत गोष्टी असतात. काही तर असे स्टे देखील असतात जिथे किचन आणि त्याच्याशी संबंधीत गोष्टी उपलब्ध असतात. मात्र आपण जेव्हा हॉटेलमध्ये चेक इन करतो तेव्हा तुम्ही कधी लक्ष दिले का, की हॉटेलमध्ये कधीच घड्याळ नसते. एवढेच काय तर आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा देखील कधी आपल्याला हॉटेलमध्ये घड्याळ दिसत नाही. कधीही हॉटेलातील खोल्यांच्या भिंतींवर घड्याळ दिसणार नाही. मग असे का?, का हॉटेलमध्ये घड्याळ नसते. यामागे नक्की काय कारण असावे? तर आज पण हेच कारण जाणून घेऊया. (GK)

हॉटेलात येणारा माणूस हा आराम करण्यासाठी येतो. त्यामुळे तो खोलीत शिरताच त्याला रिलॅक्स वाटलं पाहिजे. त्याने आपलं डेली रुटीन विसरुन जावं असं हॉटेल मालकांना वाटतं. सातत्याने घड्याळ पाहिल्याने टेन्शन वाढतं. जे लोक आराम करण्याचा प्रयत्न करतात, त्यांचं वारंवार घड्याळ पाहिल्याने टेन्शन वाढत असतं. आराम करणाऱ्यांच्या बाबतीत ही गोष्ट होते. त्यामुळेच रोजचे दैनंदिन व्यवहार विसरून आराम मिळावा म्हणून हॉटेल मालक घड्याळ हटवण्याचं काम करतात. शिवाय मोठंमोठ्या इंटरनॅशनल हॉटेलमध्ये लोक वेगवेगळ्या टाइम झोनमधून येतात. लोकल टाइमवर घड्याळ सेट केली असेल तर गेस्ट गोंधळून जातात, विशेषतः जर त्यांनी त्यांच्या डिव्हाइसेसचा वेळ अपडेट करणे विसरले असेल तर. या गैरसमजापासून वाचण्यासाठी, काही हॉटेल्स घड्याळं ठेवणंच टाळतात आणि पाहुण्यांना त्यांच्या मोबाईल फोन किंवा वैयक्तिक घड्याळांवर अवलंबून राहू देतात. (Latest Marathi Headline)

GK

हॉटेल प्रशासन आपल्या पाहुण्यांना उगाचच ताण देऊ इच्छित नाही. कारण हॉटेलमध्ये येणारी व्यक्ती शांततेत काही वेळ घालवण्यासाठी आलेली असते. वेळेवरून त्यांच्यात कोणताही वाद होऊ नये, याची काळजी हॉटेल प्रशासन जास्त घेते. हॉटेल व्यवस्थापन असं मानतं की जर खोलीमध्ये वेळ दाखवणारे साधन नसेल, तर तिथे राहणारा व्यक्ती कोणत्याही घाईत नसतो. तो जास्त वेळ आराम करेल, वेळ किती झाला, मी किती वेळ वाया घालवला, याचा ती व्यक्ती अजिबात विचार न करा, रुममधील सेवांचा आनंद घेईल. यामुळे ग्राहकाचा राहण्याचा कालावधी वाढतो आणि अर्थातच हॉटेलचा महसूल देखील. (Top Stories)

=======

Namaskar : महिलांनी साष्टांग नमस्कार का करू नये?

=======

घड्याळ नसण्यामागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे गेस्ट हॉटेलमध्ये जास्त वेळ घालवतात. जेव्हा त्यांच्यासमोर घड्याळ नसते तेव्हा त्यांना कळत नाही की किती वेळ झाली आहे, किंवा किती उशीर झाला आहे. अशा परिस्थितीत ते हॉटेलच्या रेस्टॉरंट, स्पा किंवा बारसारख्या सेवांचा जास्त उपभोग घेऊ शकतात, ज्यामुळे हॉटेलचे उत्पन्नही वाढते. घड्याळ नसताना लोक लवकर चेक आउट करण्याचा विचारही करत नाहीत. हॉटेलमधील प्रत्येक पाहुण्याकडे आता एक स्मार्टफोन आहे, जो घड्याळ, अलार्म आणि बरेच काही म्हणून काम करतो. अतिथींकडे वेळ तपासण्यासाठी आधीपासूनच वैयक्तिक उपकरणे असल्याने, भिंतीवरील घड्याळाची गरज नाही. जेव्हा पाहुणे वेळेचे भान ठेवत नाहीत, तेव्हा ते रूम सर्व्हिस, स्पा, बार किंवा रेस्टॉरंटसारख्या हॉटेल सुविधांमध्ये जास्त वेळ घालवतात आणि स्वाभाविकच जास्त खर्च करतात. (social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!