Home लाईफ स्टाईल Namaskar : महिलांनी साष्टांग नमस्कार का करू नये?
लाईफ स्टाईल

Namaskar : महिलांनी साष्टांग नमस्कार का करू नये?

77

हिंदू धर्मात देवाला किंवा आपल्यापेक्षा वयाने, मानाने मोठ्या व्यक्तीला नमस्कार करण्याची पद्धत आहे. नमस्कार करणे ही भारतीय संस्कृतीतील आदराची, नम्रतेची आणि प्रेमाची भावना व्यक्त करण्याची अतिशय पवित्र कृती आहे. हात जोडून किंवा वाकून पाया पडून समोरच्या व्यक्तीतील आत्म्याला नमन करणे, यालाच नमस्कार म्हणतात, जे नातेसंबंध दृढ करण्यास आणि अहंकार कमी करण्यास मदत करते. आपण नमस्कार करताना आपण समोरच्या व्यक्तीच्या किंवा देवाच्या समोर वाकून, पायाला स्पर्श करून नमस्कार करतो. नमस्कार करण्याचे देखील काही प्रकार आहेत, यातलाच एक प्रकार म्हणजे, साष्टांग नमस्कार. साष्टांग नमस्कार म्हणजे, झोपून केला जाणारा नमस्कार. यात शरीराचे ८ अवयव – छाती, डोके, दृष्टी, मन, वाचा, पाय, हात आणि गुडघे जमिनीला टेकवून देवाला, वंदनीय व्यक्तीला किंवा गुरुजनांना प्रणाम केला जातो. (Sahthag Namaskar)

बहुतेक तर हा साष्टांग नमस्कार पुरुषांनी घालण्याची प्रथा परंपरा आहे. मात्र हिंदु धर्मात महिलांना साष्टांग नमस्कार घालण्याची परवानगी नाही. याला देखील काही कारणं आहेत. हिंदू धर्मानुसार नमस्कारात तीन प्रकार असतात. ते तीन प्रकार म्हणजे कायिक, वाचिक आणि आंगिक. कायिक म्हणजे संपूर्ण काया म्हणजेच शरीर संपूर्णपणे जमिनीला स्पर्श होतो तो नमस्कार म्हणजे कायिक नमस्कार त्यालाच साष्टांग नमस्कार असे देखील म्हणतात. या नमस्काराला महत्व जास्त आहे. याचं कारण म्हणजे हृदय, माथा, पाय,हात,गुडघे अशी शरीराची अवयवं जमिनीला टेकतात. मात्र असे जरी असलं तरी स्त्रियांनी साष्टांग नमस्कार करु नये असं शास्त्रात सांगितलं आहे. मग यामागे नक्की कोणते कारण आहे चला जाणून घेऊया. (Marathi)

Namaskar

साष्टांग नमस्कार हा एक प्रकारचा आसन आहे. ज्यामध्ये शरीराचा प्रत्येक भाग जमिनीला स्पर्श करतो. या मुद्रेतून त्या व्यक्तीने आपला अहंकार सोडल्याचे प्रतीक आहे. हिंदू शास्त्रानुसार, स्त्रियांचा गर्भ आणि स्तन कधीच जमिनीला स्पर्श होऊ नयेत. कारण महिलांच्या गर्भात एक जीव असतो आणि स्तन त्या बाळाचे पोषण करतात. अशावेळी महिलांनी कायम आपल्या गर्भाची आणि स्तनांची काळजी घ्यावी. यामुळे स्तन आणि गर्भ जमिनीला स्पर्श होऊन नये या उद्देशाने हा विरोध केला जातो. जमीन देखील स्त्रीत्वाचं प्रतीक आहे. जमिन आणि स्त्री जन्म देण्याचं कार्य करतात. एखाद्या जीवाला जन्म देणं आणि त्याचा सांभाळ करणं ही दोन्ही कार्य महिला आणि जमीन सारखंच करतात. स्त्रियांच्या गर्भाशयातून नवा जीव जन्माला येतो तर वक्षांमुळे ती नव्या जीवाचं संगोपन करते. याच कारणाने स्त्रीने साष्टांग नमस्कार करताना या अंगांना जमिनीला स्पर्श करु नये असं सांगितलं जातं. म्हणूनच स्त्रियांनी दंडवत नमस्कार करावा. या नमस्कारामध्ये शरीराच्या गुडघा आणि कपाळाला जमिनीला स्पर्श करणाऱ्या दोन भागांना स्पर्श केला जातो. (Latest Marathi HEadline)

दरम्यान साष्टांग नमस्कार केल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला होतात. साष्टांग नमस्कार करताना आपल्या शरीरातील ८ अवयव पृथ्वीला स्पर्श करतात. या स्थितीत आपले मन शांत असते आणि त्यामुळे आपण पृथ्वीची सकारात्मक उर्जा आकस्मित करु शकतो. तसेच या मुद्रेमुळे तणाव कमी करण्यास दोन प्रकारे मदत मिळते. पहिली तर ही की जेव्हा आपण देवाला समर्पित करण्यासाठी या मुद्रेत झोपतो तेव्हा सांसारिक दु:खातून मुक्ती मिळाल्याची भावना मनी येऊ लागते आणि मानसिक तणाव कमी होतो. दुसरी मदत ही की यामुळे शारीरिक मरगळ कमी होऊन शरीर हलके वाटू लागते. (Top Stories)

=======

Yamunotri Dham : यमुनोत्री धामची रहस्ये

=======

नमस्काराचे प्रकार
अष्टांग नमस्कार – ज्यामध्ये जमिनीला शरीराच्या 8 भागांनी स्पर्श केला जातो – गुडघे, पोट, छाती, हात, कोपर, हनुवटी, नाक आणि मंदिरे.
साष्टांग नमस्कार – यामध्ये शरीराचे 6 अवयव – पाय, गुडघे, हात, हनुवटी, नाक आणि मंदिरे जमिनीला स्पर्श करतात.
पंचांग नमस्कार – यामध्ये शरीराचे 5अवयव – गुडघा, छाती, हनुवटी, मंदिर आणि कपाळ इत्यादी जमिनीला स्पर्श करतात.
दंडवत नमस्कार – यामध्ये शरीराच्या गुडघा आणि कपाळाला जमिनीला स्पर्श करणाऱ्या दोन भागांना स्पर्श केला जातो.
नमस्कार – हात जोडून आणि कपाळाला स्पर्श करून नमस्कार करणे.
अभिवादन नमस्कार – फक्त डोके टेकवून आणि हात जोडून त्यांच्या छातीला स्पर्श करून इतरांना अभिवादन करणे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!