सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एकच मुद्दा गाजतोय आणि तो म्हणजे इराण आणि अमेरिका यांचे युद्ध आणि युद्धाचे संपूर्ण जगावर होणारे परिणाम. भारतात देखील या युद्धाचे परिणाम जास्त नसले तरी थोड्याफार प्रमाणात परिणाम जाणवत आहेत. या युद्धाचा परिणाम भारतात सर्वात जास्त झाला तो गॅस सिलेंडरवर. भारतात गॅस सिलेंडर मिळणे जरा अवघड झाले आहे. आधी सहज मिळणारे सिलेंडर आता बरेच दिवस वाट बघितल्यावर मिळते. मध्ये एक बातमी आली होती की, 14 किलो वजनाचा सिलेंडर आता कमी होऊन 8 ते 10 किलोचा मिळणार. मात्र अर्थात ही बातमी खोटी ठरली. आजही सिलेंडर 14.2 किलोचा मिळतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, सिलेंडरचे वजन 14.2 का असते? (Cylinder)
तसे पाहिले तर 14.2 किलो गॅस सिलेंडर ठेवण्याची कायदेशीर अशी सक्ती नाही. सिलेंडरच्या वजनाबद्दलचा हा निर्णय आजही बदलता ही येऊ शकतो. पण 14.2 किलो सिलेंडरचे वजन असण्यामागे एक खास आणि अतिशय विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. सर्वसामान्यांना गॅस सिलेंडर सहज वापरता यावे. त्याची वाहतूकच नाही तर घरातही एलपीजी सिलिंडरच्या वजनामागे सुरक्षितता, सोय आणि वाहतूक व्यवस्था ही कारणे आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव सिलिंडरचे वजन 14.2 किलो ठेवले जाते. या सिलेंडरमध्ये उच्च दाबाखाली वायू असतो. 20-25 किलो वजनाचा सिलेंडर उचलणे अधिक कठीण असते, ज्यामुळे गळती किंवा अपघाताचा धोका वाढतो. 14.2 किलो वजनाचा सिलेंडर एक किंवा दोन व्यक्ती सहजपणे उचलू शकतात. यामुळे इतक्या वजनाचा सिलेंडर घरी वापरणे सुरक्षित ठरते. (Marathi)

भारतात घरगुती LPG सिलेंडरचा वापर 1950 च्या दशकात सुरू झाला. त्याकाळी भारतात बर्मा शेल नावाची एक परदेशी कंपनी गॅस पुरवठा करत होती. त्यावेळी या कंपनीने एक विशेष सर्व्हे केला होता. त्यांना हे जाणून घ्यायचे होते की, एक सामान्य माणूस कोणत्याही मशिन शिवाय किती वजन सहज उचलू शकतो. तेव्हा कंपनीने सर्वात अगोदर सिलेंडरचा आकार आणि वजन निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर या कंपनीचे नाव बदलून भारत पेट्रोलियम (BPCL) असे करण्यात आले. (Latest Marathi Headline)
गॅस भरलेल्या सिलिंडरचे एकूण वजन म्हणजेच रिकाम्या टाकीचे वजन + गॅसचे वजन असे साधारणपणे 29.5 ते 30 किलो भरते. हा आकडा पाहिल्यावर जाणकारांच्या असे लक्षात आले की, जर गॅसचे प्रमाण 15 किलोपेक्षा जास्त केले असते, तर सिलिंडरचे एकूण वजन 35 किलोच्या पार गेले असते. अशा वेळी घराच्या पायऱ्या चढून सिलिंडर नेणे, डिलिव्हरी देणाऱ्या लोकांना देखील तो वाहून नेणे अत्यंत कठीण आणि धोकादायक ठरू शकतो. एलपीजी म्हणजेच ‘लिक्विड पेट्रोलियम गॅस’ हा अत्यंत ज्वलनशील असतो. उष्णता वाढली की गॅस प्रसरण पावतो, ज्यामुळे सिलिंडरच्या आतील दाब वाढतो. सुरक्षेच्या नियमांनुसार, सिलिंडरमध्ये थोडी रिकामी जागा सोडणे अनिवार्य असते, जेणेकरून प्रसरण पावणाऱ्या गॅसला जागा मिळेल. त्यामुळे हा आणि अशा अनेक गोष्टींचा विचार करून 14.2 हे सिलेंडरचे वजन निश्चित करण्यात आले.(Top Marathi NEws)
========
U.S.-Israeli Attacks : भीतीच्या छायेखाली इराणी जनजीवन
========
शिवाय हा 14.2 किलो आकडा ठरवताना भारतीय कुटुंबाची गरज आणि ‘रिफिलिंग’ चक्र याचा देखील अभ्यास केला गेला. सिलिंडरची क्षमता ठरवताना केवळ वजनाचाच नाही, तर एका सरासरी भारतीय कुटुंबाच्या वापराचाही विचार केला गेला. तेव्हा असे समजले की, 14.2 किलो गॅस हा 4 ते 5 सदस्य असलेल्या कुटुंबासाठी साधारणपणे 30 ते 45 दिवस पुरतो.हा काळ बुकिंग आणि रिफिलिंगच्या चक्रासाठी सर्वात सोयीचा ठरला. जर सिलिंडर छोटा असता, तर ग्राहकांना वारंवार बुकिंग करावे लागेल आणि खूप मोठा सिलेंडर असेल तर त्याची किंमत सामान्यांच्या बजेटबाहेर गेली असती. म्हणूनच सरतेशेवटी 14.2 किलोचेच सिलेंडरचे वजन निश्चित कऱण्यात आले. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics