Home लाईफ स्टाईल Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी केली जाते?
लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी केली जाते?

0
Akshaya Tritiya

आता लवकरच अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीय साजरी केली जाते. या दिवसाला आपल्या पुराणांमध्ये आणि धार्मिक ग्रंथांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. 19 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. त्यामुळे या दिवशी काय खरेदी करायचे आहे याची चर्चा घरात सुरु झाली असेल. कारण अक्षय्य तृतीया हा कोणत्याही शुभ कार्याचे आणि खरेदीचे अक्षय्य फळ देणारा दिवस आहे. मान्यतेनुसार या दिवशी कोणतेही खरेदी केली तर तिचा कधीही क्षय होत नाही. त्यामुळे या दिवशी मोठी खरेदी आणि शुभ कार्य करण्याला मोठे महत्त्व आहे. मात्र असे सांगितले जाते की, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काही मोठी खरेदी करा किंवा नका करू पण या दिवशी मीठ घेणे खूपच चांगले मानले जाते. (Akshaya Tritiya)

अक्षय्य तृतीयेला स्वयंसिद्धी मुहूर्त असेही म्हटले जाते. साडे तीन मुहूर्ता पैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या या दिवशी अनेक शुभ कामं केली जातात. अनेक मोठमोठी खरेदी देखील केली जाते. मात्र अनेक मोठमोठ्या महागड्या वस्तू खरेदी करताना या दिवशी मीठ नक्की खरेदी करावे असे सांगितले जाते. किंवा अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काही खरेदी केली नाही तरी चालेल मात्र मीठ नक्की खरेदी करावे. मग असे का सांगितले जाते? या दिवशी मीठ खरेदी करण्यामागे नक्की कोणते शास्त्र आहे? चला जाणून घेऊया. (Marathi)

अक्षय्य तृतीयेलाही मीठ खरेदी करण्याची फारच जुनी परंपरा आहे. अक्षय्य तृतीयेला मीठ खरेदी करून दान केल्याने आपल्यावरील सर्व संकटे दूर होतात आणि सर्व त्रासांपासून आराम मिळतो अशी श्रद्धा आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मीठ दान केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी केले जाते. मात्र अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्या रोजच्या साध्या मिठाऐवजी सैंधव मीठ खरेदी करणे अधिक शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीयेला सैंधव मीठ खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेले मीठ बाथरूममध्ये काचेच्या भांड्यात ठेवल्याने वास्तुदोष दूर होऊ शकतात. शिवाय हे मीठ तुम्ही स्वयंपाकात देखील वापरू शकता. (Todays Marathi Headline)

Akshaya Tritiya

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सैंधव मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते आणि मानसिक शांती मिळते. घरामध्ये मीठाच्या पाण्याने फारशी पुसल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि वातावरण सकारात्मक होण्यास मदत होते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी केल्यानंतर ते मीठ घराभोवती टाकावे, असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन घरात सकारात्मक ऊर्जा येते. या दिवशी मीठ खरेदी करण्याची ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी करणे ही एक सांस्कृतिक परंपरा बनली आहे, जी लोक अजूनही लोकं मनापासून पाळतात. (Latest Marathi Headline)

अक्षय्य तृतीयेला मीठ खरेदी करणे ही केवळ एक परंपरा नाही तर ती समृद्धी, सकारात्मकता आणि चांगले आरोग्य मिळावे यासाठीची इच्छा दर्शवते. या दिवशी मीठ खरेदी करून, लोक त्यांच्या घरात आनंद, शांती आणि समृद्धी आणण्यासाठी प्रार्थना करतात. अक्षय्य तृतीयेला तुम्ही सोने – चांदी खरेदी करण्यासोबत थोडे मीठ खरेदी केले तर तुमच्या घरात नक्कीच त्याचा शुभ परिणाम दिसून येईल. (Top Stories)

=======

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

=======

मीठ, स्वयंपाकघरातील स्वस्त आणि महत्वाच्या घटकांपैकी एक आहे. जेवणातील मिठाची अनुपस्थिती लगेच आपल्या लक्षात येते आणि त्याची उपस्थिती अन्नाची चव वाढवते. अक्षय्य तृतीयेच्या या पवित्र दिवशी मीठ खरेदी करणे म्हणजे दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रकार आहे. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही मोठी खरेदी केली नाही तरी चालेल मात्र मीठ नक्कीच खरेदी करा. (Social News)

( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!