फ्रिजशिवाय कोणतेही घर अपूर्ण असते. घर लहान असो किंवा मोठे त्यात फ्रिज असतेच असते. आजच्या काळात फ्रिज ही स्वयंपाकघरातील अतिशय महत्त्वाची वस्तू बनली आहे. दूध, फळं, भाज्या आदी अनेक गोष्टी ठेवण्यासाठी फ्रीजचा सर्वत्र वापर केला जातो. फ्रिज कितीही भारी, चांगले, महागडे असो कधी ना कधी फ्रिजच्या विविध समस्यांना आपल्याला तोंड द्यावेच लागते. फ्रिजमधून येणारा आवाज, फ्रिजमधून येणारा वास आणि कधी कधी फ्रिजमधून येणारे पाणी हे अनेकांसाठी डोकेदुखी ठरते. फ्रिजमधून पाणी येणे ही तर खूपच सामान्य आणि सर्वच फ्रिजला येणारी समस्या आहे. बऱ्याचवेळा तर फ्रिज रिपेयर करून देखील पुन्हा काही दिवसांनी फ्रिजमधून पाणी येण्यास सुरुवात होते. अशा वेळेस समजत नाही की, फ्रिज खराब झाले आहे का दुसरीच कुठली समस्या आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला फ्रिजमधून गळणारे पाणी तुम्ही घरच्या घरी मॅकेनिकला न बोलवता कसे थांबवू शकता याबद्दल सांगणार आहोत. (Fridge)
फ्रिजच्या मागील बाजूस एक लहान ड्रेन होल आहे जो वितळलेला बर्फ (डिफ्रॉस्ट) बाहेर काढतो. त्यामुळे जर त्यात अन्न किंवा बर्फ गोठू लागला तर पाणी बाहेर येऊ शकत नाही आणि फ्रिजच्या आत किंवा खाली गळू लागते. यासाठी, ड्रेन होल कोमट पाण्याने किंवा पातळ वायरने स्वच्छ करावे. तसेच, दर काही महिन्यांनी ते तपासा जेणेकरून ते कोणत्याही कारणास्तव बंद होणार नाही, अडकणार नाही आणि फ्रिजमधून पाणी बाहेर येणार नाही. जर रेफ्रिजरेटरखालील ड्रिप ट्रे फुटली असेल, तुटली असेल किंवा जास्त पाणी भरले असेल तर पाणी गळू शकते. ही ट्रे वेळोवेळी तपासणे आणि स्वच्छ करणे महत्वाचे आहे. फ्रिजच्या मागे आणि बाजूंना थोडं अंतर ठेवा. यामुळे उपकरणाचं कार्यक्षमता टिकून राहते आणि गळती टाळली जाते. (Latest Marathi News)
=======
Cylinder : घरगुती गॅस सिलेंडर हे 14.2 किलोचेच का असते?
=======
फ्रीजरमध्ये बर्फाचा डोंगर तयार झाला असेल, म्हणजेच खूप बर्फ गोठला असेल, तर तो हळूहळू वितळतो आणि खाली गळतो. जेव्हा फ्रिजचा दरवाजा वारंवार उघडतो किंवा दरवाजाचा रबर सैल असतो तेव्हा असे होते. आत ओलावा जाण्यामुळे बर्फ अधिक गोठतो. यासाठी, वेळोवेळी तुमचा फ्रीजर मॅन्युअली डीफ्रॉस्ट करा. जर फ्रिज एका बाजूने थोडासा झुकला असेल तर पाणी योग्य दिशेने वाहत नाही आणि ते खाली गळू लागते. यासाठी, तुम्हाला फ्रिजचा बॅलेन्स तपासावा लागेल जेणेकरून ते जमिनीवर व्यवस्थित उभे राहील. शिवाय रेफ्रिजरेटर पूर्णपणे भिंतीला चिपकवून ठेवल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला जाऊ शकतो, ज्यामुळे गळती वाढू शकते. रेफ्रिजरेटरच्या मागे थोडी जागा सोडा जेणेकरून हवा आणि पाणी सहज वाहू शकेल. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics