Home आंतरराष्ट्रीय U.S.-Israeli Attacks : भीतीच्या छायेखाली इराणी जनजीवन
आंतरराष्ट्रीय

U.S.-Israeli Attacks : भीतीच्या छायेखाली इराणी जनजीवन

74

अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यांना झेलत इराणमधील जनतेचे रोजचे जीवन एखाद्या नरकासारखे झाले आहे. सतत होणारे हवाई हल्ले आणि इराणी राजवटीच्या कठोर दडपशाहीमुळे इराणी नागरिक कात्रीत सापडले आहेत. सध्या तेथील सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड भीती, अनिश्चितता आणि आर्थिक संकट आहे. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे विस्थापित होण्याची गरज या नागरिकांवर आली आहे. त्यापैकी अनेकांनी आपली पिढीजात घरे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर हजारो नागरिक आपल्या जमिनी आणि शेती टाकून सुरक्षेसाठी अन्य ठिकाणी जात आहेत. या सर्वात इराणच्या आयआरजीसीच्या जवानांची दहशतही त्यांच्यावर कायम आहे. कारण या सत्तेविरोधात आंदोलन केल्यास खुलेआम फाशी देण्यात येत आहे. त्यामुळे प्रस्थापित शासनाविरोधात बंड करण्याचे धाडसही नसलेले इराणचे नागरिक प्रचंड असुरक्षिततेच्या भावनेत राहत आहेत. यापैकी अनेक नागरिकांना मानसिक दडपणामुळे आजारांना सामोरे जावे लागत आहे. मात्र त्यांच्यावर योग्य उपचार होऊ शकत नाहीत. या सर्वात युद्धात पालकांचे निधन झाल्यामुळे एकाकी होणाऱ्या लहान मुलांचा प्रश्न इराणमध्ये झपाट्याने वाढत आहे. अशा अनाथ मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी काही समाजसेवी संघटना पुढाकार घेत असल्या, तरी पुरेशा साधनांअभावी अशा संघटनांपुढेही अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. ( U.S.-Israeli Attacks )

अमेरिकेच्या अध्यक्षांनी पुढचे काही तास इराणसाठी अत्यंत धोक्याचे असल्याचे जाहीर केले आहे. तर इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणी नागरिकांनी रेल्वेने प्रवास करू नये, असे आवाहन केले आहे. या दोन्ही देशांकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यामुळे इराणमधील जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. येथील शाळा, महाविद्यालये बंद असून रोजच्या आयुष्यासाठी लागणाऱ्या वस्तू मिळणेही कठीण झाले आहे. इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्ये हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत. आणि जे नागरिक तिथे राहत आहेत, ते दिवसातून फार कमी वेळा घराबाहेर पडत आहेत. येथील इंटरनेट आणि अन्य साधनेही बंद असल्यामुळे संपर्काची माध्यमेही तुटली आहेत. यामुळे या नागरिकांना आपल्या आप्तेष्टांची कुठलीही माहिती मिळू शकत नाही. अनेक घरांतील पुरुष युद्धासाठी वा अन्य कामासाठी बाहेर आहेत. मात्र त्यांच्याबद्दल कुठलीही माहिती घरातील सदस्यांना मिळू शकत नाही. शिवाय इराणमध्ये मूलभूत गरजांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पिण्याच्या पाण्याचीही कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जे नागरिक तेहरान व अन्य शहरांत राहत आहेत, त्यांच्या मनावर मोठा आघात झाला असून अनेकांचे मानसिक स्वास्थ्य हरवले आहे. तेहरानसह ज्या शहरांमध्ये अमेरिकेचे हल्ले होत आहेत, तेथील नागरिकांची मृत्यूच्या भीतीमुळे झोपही उडाली आहे. त्यामुळे युद्ध संपल्यानंतरही इराणी नागरिकांचे जनजीवन लगेच सामान्य होईल, अशी शक्यता नाही. ( U.S.-Israeli Attacks )

अमेरिकेने इराणच्या प्रशासनाला अंतिम काही तासांची मुदत दिली आहे. मात्र या सर्वात इराणी जनतेची मानसिक स्थिती बिकट झाली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून या नागरिकांवर मृत्यूची छाया कायम आहे. सोबतच रोजच्या जीवनासाठी लागणाऱ्या वस्तूंची किंमतही आवाक्याबाहेर गेली आहे. युद्धामुळे रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. त्यातही शाळा, महाविद्यालये आणि उद्योगधंदे बंद आहेत. तरुणांना आयआरजीसीमध्ये भरती करून घेण्यात येत आहे. आता अमेरिकेवर दबाव टाकण्यासाठी वयवर्ष बारा असलेल्या मुलांच्या हातीही शस्त्र देण्याचा निर्णय इराणच्या सरकारने घेतला आहे. त्यामुळे या कोवळ्या मुलांना सैन्यात भरती करून घेण्यात येत आहे. सोबतच इराणमधील लष्करी आणि अणुऊर्जा केंद्रांवर अमेरिका सातत्याने हल्ला करत असताना या केंद्रांभोवती मानवी साखळी उभारण्याचे आवाहन इराणी सरकारने नागरिकांना केले आहे. सरकारचे हे आवाहन म्हणजे आज्ञा असते, याची इराणी नागरिकांना कल्पना असल्यामुळे इराणमधील जनता हवालदिल झाली आहे. या सर्वाला विरोध करणाऱ्यांना थेट फाशी देण्यात येत असल्यामुळे या राजवटीविरोधात आंदोलन करण्याचे धाडसही त्यांच्यात नाही. त्यामुळे इराणी नागरिक सध्या स्वतःला घरात कोंडून घेऊन स्वतःचा आणि कुटुंबीयांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. या युद्धामुळे इराणमधील महागाई आणि आर्थिक संकट अधिक झाल्याने जनतेला भविष्याची चिंता वाटत आहे. त्यामुळे युद्ध संपल्यावर येथून मोठ्या प्रमाणात विस्थापन होण्याची शक्यता आहे.

=======

हे देखील वाचा : Mojtaba Khamenei : मोजतबा कोमात… इराणची सत्ता आयआरजीसीकडे

=======

इस्रायली आणि अमेरिकी सैन्य इराणमधील नागरी भागांवर हवाई हल्ले करत आहे. या हल्ल्यांमुळे मोठ्या संख्येने नागरिक प्रभावित झाले आहेत. इराणच्या अनेक शहरांचे मोठे नुकसान झाले असून हजारो नागरिक जखमी आहेत आणि शेकडो ठार झाले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पूल, वैद्यकीय केंद्रे आणि इतर पायाभूत सुविधांसारख्या मोक्याच्या ठिकाणांवरील हल्ले झाल्यामुळे नागरिकांना भविष्यातही अधिक गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. इराणमधील अनेक विद्यापीठांवरही या युद्धाचा परिणाम झाला आहे. येथील झांजन शहरात असलेल्या धार्मिक संकुलात धर्माचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून विद्यार्थी येत असत. तेथील ग्रंथालयांमध्ये हजारो पुस्तके होती. शिवाय आरोग्यसेवा देणारा दवाखानाही होता. मात्र याच ठिकाणी बॉम्बवर्षाव होऊन त्यात ग्रंथालयाचे कर्मचारी मारले गेलेच, शिवाय संपूर्ण ग्रंथालय आणि आरोग्यकेंद्रही नष्ट झाले आहे. असेच चित्र इराणच्या अन्य भागातही आहे. ( U.S.-Israeli Attacks )

सई बने….

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!