असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे या मोठ्या खर्चापासून वाचायचे असेल तर दातांची निगा घेणे आवश्यक आहे. आपले सौंदर्य अधिक खुलवण्यामध्ये हास्याचा सर्वात मोठा वाटा असतो. आणि हास्य खुलवण्यामध्ये दातांचा. जर आपले दात पिवळे असतील तर आपण कधीच चारचौघांमध्ये खुलून हसू शकत नाही. पिवळ्या दातांमुळे आपला आत्मविश्वास देखील कमी होतो. आपण सतत बाहेर जाताना दातांना ब्रश करत असतो. पिवळे दात केवळ सौंदर्यातच बाधा निर्माण करत नाही तर दात आणि हिरड्यांशी संबंधित अनेक समस्यांनाही आमंत्रण देऊ शकतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि तोंडाची स्वच्छता न ठेवल्यामुळे दातांवर पिवळी घाण साचते, यालाच टार्टर म्हणतात. वास्तविक हा पिवळा थर पांढऱ्या दातांना पिवळे बनवण्याचे काम करतो. (Dentel Care)
टार्टर वेळीच दूर केले नाही तर ते दात आणि हिरड्यांच्या मुळांमध्ये शिरते, त्यामुळे दात आणि हिरड्या कमकुवत होतात. नंतर या समस्येमुळे पायरिया, दातांत पोकळी निर्माण होणे, दातांमधून रक्त येणे, हिरड्या दुखणे इत्यादी त्रास सुरु होतात. मात्र पिवळ्या दातांवर सतत ब्रश करणे हा उपाय नाही. जर तुम्हाला देखील तुमचे दात पांढरेशुभ्र करायचे असतील तर तुम्ही काही घरगुती आणि अतिशय सोपे उपाय केले पाहिजे. काही लोकं बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक पेस्ट, केमिकल्सचा आधार घेतात, जे दातांसाठी हानिकारक ठरते. मात्र घरगुती उपाय करून नक्कीच तुमचे दात पांढरे होतील आणि तुमचा आत्मविश्वास देखील परत येईल. मग पिवळ्या दातांना पांढरे करण्यासाठी कोणते उपाय आहे चला जाणून घेऊया. (Health)
नारळ तेल
पिवळे दात शुभ्र करण्यासाठी तुम्ही नारळ तेलाचा वापर करू शकता. यासाठी नारळ तेल घेऊन पाच मिनिटे ते दातांवर लावून ठेवा. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या टूथब्रशमध्ये काही थेंब नारळाचे तेल टाकून त्याने ब्रश करू शकता. यानंतर तोंड स्वच्छ धुवा. तुम्ही जर दररोज केले तर तुमच्या दातांवरील पिवळेपणा काही दिवसांतच दूर होईल.
एप्पल सायडर विनेगर
पिवळे दात स्वच्छ करण्यासाठी एप्पल सायडर विनेगरचा वापर करता येतो. त्यासाठी दोन चमचे एप्पल सायडर विनेगर एक कप पाण्यात मिसळून माउथवॉश बनवा. त्यानंतर 30 तो घोळ तोंडात ठेऊन ब्रश करुन गुळणे करा. परंतु हे करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. (Marathi)
लिंबाची साल
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असते, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट असतात आणि लिंबाच्या सालामुळे आपले दात स्वच्छ होऊ शकतात. यासाठी तुमच्या दातांवर लिंबाची साल काही वेळ चोळा आणि नंतर तोंड स्वच्छ धुवाधुवून टाका. त्याचबबरोबर तुम्ही लिंबाच्या सालीची पावडर तयार करू शकता. ही पावडर तुम्ही दातांवर लावून काही वेळ ठेवू शकता. यामुळेही दातांचा पिवळेपणा दूर होईल. (Todays Marathi Headline)

केळीची साल
केळीच्या सालीमध्ये खूप पोटॅशिअम, मॅग्नेशिअम असते. या गोष्टींचा उपयोग ब्लिचिंग एजंट म्हणून करण्यात येऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही केळ खाल्ल्यानंतर त्याची साल न फेकता ती साल दातांवर घासली तर दातांचा पिवळेपणा कमी करण्यास मदत होईल. तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करु शकता.
तुळशी
तुळशी ही औषधी गुणधर्मांनी भरपूर वनस्पती आहे. तुळशीच्या पानांची पेस्ट तयार करून दातांवर लावल्यास, दातांवरील पिवळेपणा कमी होतो. तुळशीचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म दातांवरील बॅक्टेरिया नष्ट करतात आणि दातांना नैसर्गिक स्वरूपात ठेवतात. तुळशीच्या पानांचा नियमित वापर केल्यास दातांचे आरोग्य सुधारते आणि ते अधिक स्वच्छ व चमकदार होतात. (Top Marathi News)
ऍक्टिव्ह चारकोल
दात चमकदार करण्यासाठी चारकोल देखील खूप प्रभावी ठरू शकतो. कोळसा तुमच्या दातांवरील डाग काढून टाकतो. यासाठी ब्रशवर ऍक्टिव्ह चारकोल पावडर लावा आणि त्याद्वारे दात स्वच्छ करा. लक्षात ठेवा की कोळशाचे प्रमाण अगदी कमीत कमी असावे.
हळदीची पेस्ट
हळदीमध्ये काही थेंब पाणी मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि नंतर ती दातांवर घासा. हळद हिरड्यांची जळजळ कमी करते, तोंडात साचलेले बॅक्टेरिया साफ करते आणि दात स्वच्छ करण्यास देखील मदत करते.(Latest Marathi Headline)
कडूनिंब
कडुनिंबाच्या फांद्या आजही अनेक भारतीय टूथब्रश म्हणून वापरतात. कडुलिंबाच्या तेलामध्ये तोंड व श्वासातून येणारा दुर्गंध रोखण्यासाठी, दातांवर साचलेले सूक्ष्मजीव किंवा डोळ्यांना न दिसणारे सुक्ष्म बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी आणि दात किडणे व पोकळी निर्माण होणे यांसारख्या समस्यांशी लढण्यासाठी तुरट आणि अँटीसॅप्टिक गुणधर्म असतात. म्हणूनच कडूनिंबाने दात घासावेत.
बाभूळ
बाभूळ ही दात पांढरे करण्यासाठी एक प्रभावी आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. हेच कारण आहे ज्यामुळे आयुर्वेदात बाभळीच्या डहाळ्यांचा वापर डिस्पोजेबल टूथब्रश म्हणून करण्यास सांगितला आहे. बाभूळमध्ये आढळणारे टॅनिन दात एका झटक्यात पांढरे करतात. (Top Trending News)
त्रिफळा
तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी, दात पांढरे करण्यासाठी आणि तोंडामधील जखमा कमी करण्यासाठी तुम्ही त्रिफळा वापरू शकता. यासाठी त्रिफळा पाण्यात तोपर्यंत उकळा जोपर्यंत पाणी अर्धे होणार नाही आणि मग हे पाणी थंड होऊ द्या. ते कोमट झाल्यावर त्याने दात स्वच्छ धुवा आणि गुळण्या करा.
=========
Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय
Health : पोटाचा घेर कमी करायचा? मग ‘हे’ उपाय करून पाहाच
=========
ऑईल पुलिंग
ऑईल पुलिंग ही एक आयुर्वेदिक पद्धत आहे जी दात स्वच्छ करण्यासाठी आणि त्यांना निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. यासाठी तुम्ही नारळाचे तेल वापरू शकता. तीळ किंवा खोबरेल तेलाने ऑईलं पुलिंग करा. एक झाकण तेल तोंडात ठेवून 15-20 मिनिटे तोंडात गरागरा फिरवा आणि मग चूळ भरा. याने तोंडात साचलेले बॅक्टेरिया साफ होतात. यामुळे दात चमकदार होतात आणि पोकळी निर्माण होण्याचा धोकाही कमी होतो. (Top Stories)
लक्षात ठेवा
धूम्रपान करू नका आणि तंबाखूचे सेवन करू नका. यामुळे दात पिवळे होतात. डार्क कोल्ड्रिंक्स, रेड वाईन, कॉफी, चहा इत्यादी डाग असलेल्या पदार्थांमुळेही दातांवर डाग पडतात. म्हणून, ते कमी प्रमाणात प्या आणि प्यायल्यानंतर पाण्याने चांगली चूळ भरा. रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा. यामुळे तुमच्या दातांमध्ये अडकलेले अन्न स्वच्छ होईल आणि तुमचे दात चमकदार दिसतील. दररोज फ्लॉस करा. डेंटल फ्लॉस तुमच्या दातांमध्ये अडकलेले अन्न साफ करते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics