Home आरोग्य Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल
आरोग्य

Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल

58
Blood Pressure 
Blood Pressure 

आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा चांगला, वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. पर्यायाने तो आपल्या मानसिक आरोग्यावर देखील होतो. आजच्या या धकाधकीच्या लाइफस्टाईलमध्ये आपण दिवसभर इतक्या गोष्टींमध्ये व्यस्त असतो की, आपल्याला आपल्या जेवणाची, व्यायामाची देखील आठवण राहत नाही. या गोष्टी आता वाचताना जरी सध्या वाटत असल्या तरी त्याचे गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. जर आपण नीट बघितले तर अगदी लहान सहान बाबी देखील कधी कधी आपल्याला पटकन आठवण नाही. जोर देऊन देखील काही गोष्टी लक्षात ठेवणे अवघड होऊन बसते. पूर्वी उतरत्या वयात होणारा हा त्रास आता तर अगदी तरुण वयात देखील होताना दिसत आहे. स्मरणशक्ती कमजोर झाल्याने आपल्याला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. म्हणूनच जर तुम्हाला देखील तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटत असेल तर तुम्ही आणि ज्यांना त्यांची स्मरणशक्ती कधीच कमजोर होऊ नये असे वाटते त्यांनी देखील आजपासूनच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय करणे चालू करा. (Health)

आपला मेंदू हा एखाद्या संगणकाप्रमाणे कार्य करतो. एखाद्या विषयाचे ग्रहण करणे त्यानंतर त्याविषयीचे ज्ञान संरक्षित ठेवणे आणि योग्य वेळी असलेल्या ज्ञानाचे स्मरण होणे अशा तीन टप्प्यांत मेंदूचे कार्य चालते. या तीनही टप्प्यांवर मेंदूचे काम व्यवस्थित होणे गरजेचे असते, अन्यथा स्मरणशक्तीशी निगडित साध्या विसरभोळेपणापासून ते अल्झायमर्स डिसिजसारखे आजार होऊ शकतात. सततचा ताण, तणाव, चुकीचा आहार आणि अपुरी झोप यामुळे स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते. ही समस्या लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच जाणवत आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय देखील प्रभावी ठरू शकतात. (Mental Health)

व्हिटॅमिन सी
ओवा, स्प्राउट्स, लिंबूवर्गीय फळे, ब्रोकोली, बटाटे, स्ट्रॉबेरी, किवी, लाल मिरची, कोबी आणि पालेभाज्या यांसारखे पदार्थ व्हिटॅमिन सीचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. (Top Marathi NEws)

भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बियांमध्ये Omega 3 Fatty Acid, झिंक आणि मॅग्नेशियम असते. मेंदूच्या आरोग्यासाठी हे घटक खूप महत्त्वाचे असतात. दररोज भोपळ्याच्या काही बिया खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते. मन शांत राहते आणि एकाग्रता वाढते.

Health

मध
दररोज सकाळी मधासोबत एक चमचा आवळा पावडर घेतल्यास स्मरणशक्ती सुधारते, असं अनेक आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात. तसेच दूध आणि हळद यांचे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास मानसिक थकवा दूर होतो.

व्हिटॅमिन ई
व्हिटॅमिन ई देखील नैसर्गिकरित्या घेतले जाऊ शकते. यासाठी तुम्ही सुका मेवा, बिया, संपूर्ण धान्य, अक्रोड तेल, गव्हाच्या बिया आणि अंकुर इत्यादींचा आहारात समावेश करू शकता. (Todays Marathi HEadline)

गाईचे तूप
आयुर्वेदानुसार गाईचे तूप, हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा रोजच्या आहारात समावेश असावा. सोबतच गाईचे दूध, साळीच्या लाह्या, बदाम, अक्रोड तसेच कोहळा हे खाद्यपदार्थ मेध्य म्हणजेच बुद्धी वाढवणारे आहेत.

मॅग्नेशिअम
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मॅग्नेशिअमयुक्त पदार्थही खूप फायदेशीर असतात. यामध्ये सफरचंद, सेलेरी, चेरी, अंजीर, भाज्या, पपई, मटार, मनुका, बटाटा, हिरवी पाले आणि अक्रोड इत्यादींचा आहारात समावेश करू शकता. (Social Updates)

व्हिटमिन बी12
व्हिटॅमिन बी 12 समृद्ध असलेले अन्न देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन बी 12 समृद्ध अन्नामध्ये दूध, चिकन, अंडी आणि मासे इत्यादींचा समावेश असू शकतो.

​झोप आणि आहार
नियमित सात ते आठ तासांची झोप घ्या. यानंतर आपल्या आहारामध्ये फळे, हिरव्या भाज्या आणि प्रोटीन इत्यादी पोषक घटकांचा समावेश होत आहे की नाही, याची काळजी घ्या. सकाळी उठल्यानंतर पौष्टिक अन्नपदार्थांचे सेवन करा. ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिडचा समावेश असलेल्या पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करा. सुकामेवा, अळशीच्या बिया इत्यादी. नियमित आठ ते नऊ ग्लास पाणी प्या. (Top Trending News)

फ्लेवोनॉइड्स
जर तुम्हाला फ्लेव्होनॉइड्स घ्यायचे असतील तर तुम्ही कांदा, कोबी, ब्रोकोली, फ्लॉवर आणि सलगम इत्यादींचा आहारात समावेश करू शकता. याशिवाय तुम्ही केशरी रंगाची फळे, मिरची आणि बीन स्प्राउट्स इत्यादी घेऊ शकता.

कॅरोटिनॉईड
तुम्ही तुमच्या आहारात गाजर, स्प्राउट्स, रताळे, पालक, भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी एक वनस्पती, लाल मिरची, टोमॅटो आणि संत्री यासारख्या फळांचा समावेश करू शकता, ज्यामध्ये कॅरोटीनॉइड्स भरपूर आहेत. (Latest Marathi HEadline)

===========

Lung Health : काय सांगता! धूम्रपान न करणाऱ्यांचे फुफ्फुसही धोक्यात ? वाढतोय धोका

===========

व्यायाम
रोज व्यायाम केल्यानं शरीरातील रक्तप्रवाह योग्य पद्धतीनं काम करतो. डोक्यापर्यंत ऑक्जिन पोहचवण्याचं काम रक्तामधून होत असते. रोज व्यायाम केल्यानं काम करण्याची क्षमता वाढते. तुम्ही योगा, स्विमिंग, सायकलिंग, रनिंग यासारखे वर्कआऊट करु शकता.

तणावापासून दूर रहा
ताण-तणावांचा मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. त्याचा मेंदूच्या कार्यक्षमतेवरही प्रभाव पडतो. ताण कमी करण्यासाठी तुम्हाला आनंद मिळेल त्या गोष्टी करा. ताण कमी करण्यासाठी एखादा छंद जोपासा. त्यामधूनही तुम्हाला आनंद मिळेल. (Top Stories)

ध्यान
ध्यान केल्यानं तणाव कमी होतो. मन शांत होते आणि स्मरणशक्ती वाढते. मेंदू काम करण्याची क्षमताही यामुळे वाढू शकते. सकाळी कोणत्याही मोकळ्या जागेवर बसून ध्यान करावे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Potato
आरोग्य

Potato : खरंच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

आपल्या भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घराचा राजा कोण असे विचारल्यावर सर्वच लोकांचे एकच...

Pooja Bhatt Relationships
आरोग्य

Dental Care : मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात पाहिजे, मग आजच ‘हे’ उपाय करा

असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे...

आरोग्य

Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून...

आरोग्य

Health : पोटाचा घेर कमी करायचा? मग ‘हे’ उपाय करून पाहाच

आजच्या काळात जशी लठ्ठपणा ही मोठी समस्या बनत आहे, तशीच एक समस्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!