Home लाईफ स्टाईल Ram Navami : श्रीरामांची कुलदेवी कोण होती माहिती आहे का?
लाईफ स्टाईल

Ram Navami : श्रीरामांची कुलदेवी कोण होती माहिती आहे का?

0

आपण जर पाहिले तर आपल्या सर्वांच्याच घरात आपल्या कुलदेवतेचा फोटो, मूर्ती असतेच असते. वर्षातून, दोन वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जातोच. हिंदू धर्मामध्ये कुलदेवतेला मोठे महत्त्व आहे. अगदी विविध देवता, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते आपल्या सारख्या सामान्य लोकांपर्यंत सर्वांच्याच घराण्याची एक कुलदेवता आहे. ‘कुलदेवता’ हा शब्द ‘कुल’ आणि ‘देवता’ या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. कुलदेवता ज्या वेळी पुरुषदेवता असते, त्या वेळी तिला ‘कुलदेव’ आणि जेव्हा ती स्त्रीदेवता असते, तेव्हा तिला ‘कुलदेवी’ म्हणून संबोधले जाते. कुलदेवी ही प्रत्येक परिवाराची आणि वंशाची एक विशेष देवी असते जी त्या वंशाचे रक्षण करते आणि त्यांच्या प्रगतीसाठी शक्ती प्रदान करते. महाराष्ट्रातील, भारतातील विविध देवीची स्थाने कुलदेवता म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का? की , प्रभू रामचंद्रांची देखील एक कुलदेवता आहे. याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसेल. आज आपण श्रीराम यांच्या कुलदेवतेबद्दल जाणून घेऊया. (Ramnavami)

श्रीरामांचा जन्म अयोध्येतील सूर्यवंशात (रघुकुल) झाला. रघुवंशी क्षत्रियांची कुलदेवता बडी देवकाली असल्याचे मानले जाते. याच देवीला चंडिका म्हणूनही ओळखतात. आजही श्रीरामाची कुलदेवी, म्हणजे देवकाली मातेचे मंदिर अयोध्येत आहे. वनवासाला जाण्यापूर्वी श्रीरामांनी बडी देवकाली मातेचा आशीर्वाद घेतला होता. हे मंदिर अयोध्येच्या सीमेवर वसले असून शौर्य, धर्म आणि विजयाची देवी म्हणून या मातेची पूजा केली जाते. खरंतर जस जसा काळ पुढे सरकला, तसे लोकांना या मंदिराचा विसर पडला होता, परंतु जेव्हा अयोध्येचे राम मंदिर बांधण्यात आले तेव्हा लोकांनी पुन्हा या मंदिराचा शोध घेतला. बडी देवकाली ही देवी महाकाली, महालक्ष्मी, आणि महासरस्वतीचा या देवींचे संगम आहे. (Marathi)

जाणकारांच्या माहितीनुसार प्रभु श्रीराम यांच्या जन्मानंतर त्यांची आई कौशल्या पूर्ण कुटुंबासोबत या बडी देवकाली देवीच्या मंदिरात आल्या होत्या. त्यानंतर अशी परंपरा बनली आहे जेव्हा पण कोणाच्या घरी बाळ जन्माला यायचे तेव्हा घरातील सर्व सदस्य बाळाला घेवून मंदिरात दर्शनाला येते. खूप सारे लोक नवीन कार्य सुरु करण्यापूर्वी देवीचे दर्शन घ्यायला मंदिरात येतात. आजही अनेक लोकं या मंदिरात बाळ होण्याची इच्छा मनात घेऊन येतात. (Todays Marathi Headline)

Ramnavami

माता सीतेच्या वडिलांच्या वंशातील कुलदेवीबद्दल बोलायचे झाले तर माता सीता ही मिथिलेची राजकन्या आणि राजा जनकाची कन्या होती. मिथिला वंशातील कुलदेवी ही माता भगवती अर्थात दुर्गामातेचे एक रूप असल्याचे मानले जाते. आजही जनकपूर (नेपाळ) मध्ये जानकी मंदिरासह गिरिजस्थान (माता गिरिजा मंदिर) येथे माता सीतेची कुलदेवता म्हणून पूजा केली जाते. (Top Stories)

========

Ramnavami : प्रभू श्रीरामांचा जन्मदिन अर्थात रामनवमी

Ramnavami : प्रभू रामचंद्रामधील ‘हे’ गुणच त्यांना बनवतात आदर्श पुरुष

========

माता सीतेच्या विवाहानंतर तिची अजून एक कुलदेवता होती, ती म्हणजे छोटी देवकाली. असे म्हटले जाते की जेव्हा माता सीता विवाहानंतर जनकपूरहून अयोध्येला आली, तेव्हा तिने आपल्या कुलदेवतेची म्हणजे दुर्गा मातेची मूर्ती सोबत आणली होती. माता सीतेने राजा दशरथ यांना विनंती करून अयोध्येच्या ईशान्य कोपऱ्यात एक मंदिर बांधण्यास सांगितले आणि तिथे या मूर्तीची स्थापना करण्यात आली. याच मंदिराला छोटी देवकाली मंदिर म्हणून ओळखतात. हे मंदिर मातृत्व, करुणा आणि गृह रक्षणाचे प्रतीक आहे. नवरात्रीमध्ये या मंदिरात 1100 दिव्यांची विशेष आरती होते. मातेच्या पूजनासाठी लाखोंच्या संख्येत भाविक या मंदिरात येतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीला प्रार्थना करतात. (Social News)

( टीप : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. आम्ही या माहितीची कोणतीही पुष्टी करत नाही. आमचा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!