रामनवमी हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण आहे, जो देशभरात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यंदा हा सण गुरुवार, 26 मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. भगवान राम हे आदर्श पुरुष म्हणून ओळखले जातात. राम नवमी हा एक हिंदू सण आहे आणि हा सण भगवान रामाचा जन्मसमर्पित आहे. यादिवशी घरी मंदिरांमध्ये श्रीरामांची पूजा केली जाते. रामनवमीनिमित्त अनेक मंदिरांमध्ये शिवाय घरी देखील सुंठवड्याचा प्रसाद दिला जातो. रामनवमीच्या प्रसादासाठी सुंठवडा कसा तयार करायचा, ते जाणून घेऊयात. (Ramnavami)
सुंठवडा
साहित्य
1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा खडी साखर, 3 चमचे साखर, अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा किस, 4 वेलची, 1 चमचा खसखस, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा बडीशेप , 10 काजू, 15 बदाम, अर्धा कप खारीकचे तुकडे
कृती
कढईमध्ये सुका मेवा हलका भाजून घ्या. सगळ्यात आधी खारीक भाजून घ्या. त्यानंतर बदाम, काजू, पांढरे तीळ, बडीशेप, खसखस, सोललेली वेलजी आणि सुक्या खोबऱ्याचा किस हे सगळं कढईमध्ये वेगवेगळं भाजून घ्या. त्यानंतर बदाम आणि काजू वगळून इतर सुका मेवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका. त्यात साखर आणि खडीसाखर टाका आणि वाटून घ्या. या मिश्रणात मग खोबऱ्याचा किस, बदाम, काजू तसेच सुंठ पावडर टाका आणि सगळं मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. तुमचा सुंठवडा तयार आहे. सुंठवडा चविष्ट तर आहेच शिवाय तो शरीरासाठी फायदेशीर आहे. (Marathi)
सुंठवडा खाल्ल्यामुळे आपली पचनसंस्था सुधारते. सुंठ सर्दी आणि खोकला दूर करण्यासाठी उपयुक्त असते. सुंठवड्यामध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि फायबरयुक्त घटकांचा समावेश आहे. डायबिटीस, ह्रदयविकार असे त्रास होऊ नये म्हणून सुंठवडा खाण्याचा सल्ला दिला जातो. पोटावर साठणारी चरबी कमी होण्यासाठीही सुंठवणडा खाणे उपयुक्त ठरते. (Top Marathi News)

_____________________________________________________________________________________________________________________________________________________
पंजिरी
रामनवमी म्हणजेच भगवान श्रीराम यांचा जन्मदिवस. या दिवशी रामाची पूजा करून त्यांना पंजिरीचा प्रसाद अर्पित केला जातो. ही पंजिरी खायला चविष्ट असते, त्याचबरोबर आरोग्यासाठी ही फायदेशीर आहे. रामनवमीच्या दिवशी पंजिरीचा प्रसाद अत्यंत महत्त्वाचा असतो. यंदा रामनवमीला जर तुम्हाला श्रीरामांसाठी पंजिरीचा प्रसाद तयार करायचा असेल, तर ही जाणून घ्या पंजिरीची रेसिपी. (Top Trending Headline)
साहित्य:
धने पावडर – 100 ग्रॅम, शुद्ध देसी तूप – 3 टीस्पून, साखरेची पावडर – 1/2 कप, किसलेलं नारळ – 1/2 कप, मखाने – 1/2 कप, काजू – 8 ते 10, बदाम – ८ ते 10, चारोळी दाणे – 1 टीस्पून
कृती:
पंजिरी बनवण्यासाठी सर्वप्रथम कढई घ्या. त्यात 1 टीस्पून तूप टाका आणि मध्यम आचेवर गरम करा. जेव्हा तूप वितळेल तेव्हा कढईमध्ये धने पावडर टाका आणि गॅस कमी आचेवर ठेवा. 1-2 मिनिटे धने पावडर भाजा. भाजलेले धने पावडर वेगळी काढा. आता पुन्हा कढईत तूप टाका आणि त्यात मखाने घाला. मध्यम आचेवर मखाने भाजून घ्या. मखाने चांगले भाजले की त्याला मिक्सरमध्ये बारीक करा. त्यानंतर काजू आणि बदामाचे तुकडे करुन त्यात घाला. एका वाटीत किसलेलं नारळ घ्या आणि सर्व मिश्रण एकत्र करा. शेवटी चिरंजीचे दाणे टाका आणि पुन्हा एकत्र करा. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- Lord Ram
- Lord Vishnu
- panjiri recipe marathi
- Ram Navami
- Ram navami 2026
- Ram navami and panjiri
- Ram navami and sunthvada
- Ram navami prasad
- Ram navami prasad recipe
- ramnavami
- Ramnavami 2026
- sunthavada recipe marathi
- ओणजीरी रेसिपी
- राम नवमी
- राम नवमी 2026
- राम नवमी प्रसाद
- राम नवमी माहिती
- रामनवमी
- श्रीराम
- श्रीराम प्रसाद
- सुंठवडा फायदे
- सुंठवडा रेसिपी