दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला प्रभू रामांचा जन्मोत्सव अर्थात रामनवमी राम नवमी साजरी केली जाते. भगवान श्री रामाची रामनवमीच्या दिवशी मनोभावे पूजा केल्याने इच्छित फळ प्राप्त होते असे सांगितले जाते. या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये भगवान श्री रामाची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव साजरा केला जातो. भगवान श्री राम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात. धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी त्रेतायुगात अवतार घेतला असे म्हणतात. यंदा गुरुवार, २६ मार्च रोजी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांची जयंती, म्हणजेच रामनवमी, साजरी होणार आहे. २६ मार्च रोजी सकाळी ११:४८ वाजता होणार आहे आणि २७ मार्च रोजी सकाळी १०:०६ पर्यंत ही तिथी असणार आहे. (Ram Navami)
प्रभू रामाची उपासना करण्यासाठी सर्वांत योग्य वेळ सकाळी ११:१३ ते दुपारी १:४१ पर्यंत आहे. दुपारचे १२:२७ हे तास विशेषतः शुभ मानले जातात, कारण यावेळीच भगवान रामांचा जन्म झाला होता. ज्योतिषांच्या मते, या रामनवमीला चार अद्वितीय योग तयार होत आहेत, जे साधकांसाठी अत्यंत फलदायी आहेत. यातील पहिला योग म्हणजे, शोभन योग. हा योग रात्रभर टिकेल आणि या योगात केलेली पूजा इच्छा पूर्ण करते. त्यानंतरचा दुसरा योग सर्वार्थ सिद्धी योग असणार असून, हा योग सायंकाळी ४:१९ वाजता सुरू होणारा हा योग कार्यात यश सुनिश्चित करतो. यादिवशी तिसरा योग हा रवी योग आहे. जो सायंकाळी ४:१९ नंतरची वेळ उत्तम आरोग्य प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम आहे. रामनवमीच्या दिवशी रामाच्या पूजेसोबतच काही खास गोष्टी केल्याने अडचणी दूर होतात आणि श्रीरामांची कृपा आपल्यावर राहते. या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया. (Lord Ram)
आर्थिक सुब्बतेसाठी
कोणत्याही राम मंदिरात भगवा ध्वज दान करा आणि पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करा. केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामाचा अभिषेक करा. यामुळे धनलाभाचे योग निर्माण होतील. या दिवशी रामायणाचे पठण केल्यास भगवान राम तर प्रसन्न होतातच, पण रामभक्त हनुमानही प्रसन्न होतात. ज्याने घरात सुख-समृद्धी येते. धन-संपत्ती वाढते. (Top Marathi Headline)
रामरक्षा स्तोत्राचे पठण आणि रामांचा अभिषेक
रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान, पूजापाठ झाला की, एखाद्या राम मंदिरात जाऊन शांत मनाने रामरक्षा स्तोत्राचे पठण करा. हा उपाय केल्याने तुमच्या प्रत्येक समस्येचं समाधान होवू शकते. रामनवमीच्या दिवशी स्नान, पूजापाठ झाल्यानंतर घरातील देवघर गंगाजलने शुद्ध करा. एखाद्या लाकडी चौकटीवर किंवा पाटावर प्रभू श्रीराम यांची मूर्ती स्थापित करा. त्यानंतर दक्षिणावर्ती शंखात दूध आणि केशर भरून प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीवर अभिषेक करा. असे केल्यामुळे तुमचे पेमेंट अडकले असेल तर ते मिळेल तसेच घरातील सुख-सुविधा वाढतील. (Marathi)

इच्छापूर्तीसाठी
रामनवमीच्या दिवशी श्रीरामांची पूजा करताना रामभक्त हनुमानजी यांचे नक्की स्मरण करा. घरामध्ये सुंदरकांडाचे पठण करा, यामुळे प्रभू श्रीरामा यांचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल. रामनवमीच्या दिवशी माकडांना चणे, केळी किंवा इतर फळ खावू घालणे असा उपाय केल्याने तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ शकतात. (Todays Marathi Headline)
घरातील सुख समृद्धीसाठी
रामनवमीच्या दिवशी तुळशीची पूजा अवश्य करा. संध्याकाळी प्रदोष काळात तुळशीसमोर दिवा लावा तसेच तीन प्रदक्षिणा घाला. असे सांगितले जाते की, भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे आणि श्रीराम म्हणजे विष्णूंचा अवतार आहे. त्यामुळे या दिवशी तुळशीच्या संदर्भात उपाय केल्याने प्रभू श्रीराम प्रसन्न होतील आणि तुमच्या घरात एकता आणि सुखसमृद्धी वाढेल. (Top Marathi News)
लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी
रामनवमीला भगवान रामाला ७ धान्य अर्पण करावीत. यामुळे तुमच्या घरातील संपत्ती वाढते. तुमच्या घरातून कोणीही रिकाम्या हाताने परतत नाही. रामनवमीच्या दिवशीही काही धान्य दान करावी. यामुळे तुमच्या घरात धान्य कायम भरलेले राहिल. तसेच माता लक्ष्मी देखील तुमच्या घरात आनंदाने वास करेल, असे म्हटले जाते. (Latest Marathi Headline)
उत्तम आरोग्यासाठी
रामनवमीच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात पूजा करावी. घराच्या पूर्वेला भिंतीवर सूर्योदयाचे म्हणजेच उगवत्या सूर्याचे किंवा सूर्यवंशी प्रभू श्री राम दरबाराचे चित्र लावावे. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल. तसेच आरोग्य देखील सुदृढ राहील. तसेच रामनवमीला सुख-समृद्धीसाठी 11 दिवे दारात लावावेत. (Social Updates)
घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी
रामनवमीला एका भांड्यात पाणी घेऊन ‘ॐ श्री ह्वी क्लीन रामचंद्राय श्री नमः’ या रामरक्षा मंत्राचा 108 वेळा जप करा. हे पाणी घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडा. हा उपाय केल्याने वास्तू दोष दूर होण्यासोबतच नकारात्मक ऊर्जाही संपते. (Top Trending News)
=========
Ramnavami : प्रभू श्रीरामांचा जन्मदिन अर्थात रामनवमी
Kamada Ekadshi : मनोकामना पूर्ण करणाऱ्या कामदा एकादशीचे व्रत
=========
धनधान्याच्या भरभराटीसाठी
रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांना सात प्रकारच्या धान्यांचा नैवेद्य अर्पण करा. यामुळे तुमच्या घरातील धन-धान्य वाढेल. रामनवमीच्या दिवशी तुमच्या घरी आलेली कोणतीही व्यक्ती रिकाम्या हाताने परत जाणारा नाही, याची काळजी घ्या. रामनवमीच्या दिवशी कमीत कमी एका प्रकारचं धान्य करा. यामुळे तुमच्या घरातील धान्याचं कोठार सदैव भरलेलं राहीव आणि माता लक्ष्मीचा सहवास तुमच्या घरी राहील. (Top Stories)
हनुमान चालीसा
रामनवमीच्या दिवशी हनुमानजींची पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते. हनुमानजी हे भगवान श्रीरामांचे परम भक्त आहेत. जर एखादी व्यक्ती एखाद्या आजाराशी झुंज देत असाल तर यापासून सुटका होण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करावे. हे पठण तुम्ही जर हनुमान मंदिरात केलेत तर उत्तम राहील. शिवाय रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाच्या भक्तांनी हनुमानजींची स्तुती करावी आणि हनुमान चालिसाचा पूर्ण पाठ करावा. हा उपाय केल्याने व्यक्तीवर श्रीराम आणि हनुमानजींची कृपा कायम राहते. (Social News)
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics