E-Arrival Card : भारतातील विमानतळ प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल होत आहे. १ एप्रिल २०२६ पासून परदेशी नागरिक आणि ओसीआय (OCI) कार्डधारकांसाठी डिजिटल ई-अरायव्हल कार्ड भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे पारंपरिक कागदी फॉर्मची गरज संपणार असून प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि वेगवान अनुभव मिळणार आहे. या नव्या प्रणालीमुळे विमानतळावरील लांबच लांब रांगा टाळता येणार आहेत.
1: ई-अरायव्हल कार्ड म्हणजे काय?
ई-अरायव्हल कार्ड हे पूर्वी विमानात किंवा विमानतळावर भरल्या जाणाऱ्या डिसेंबार्केशन कार्ड (फॉर्म डी) चे डिजिटल रूप आहे. आता प्रवाशांना हा फॉर्म ऑनलाइन भरावा लागणार आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर प्रवाशांना QR कोड मिळेल, जो भारतात पोहोचल्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून स्कॅन केला जाईल. यामुळे प्रक्रिया अधिक वेगवान आणि सोपी होणार आहे. प्रवासी हा फॉर्म त्यांच्या प्रवासाच्या ७२ तास आधीपर्यंत भरू शकतात.
2: कोणाला भरावे लागेल ई-अरायव्हल कार्ड?
ही सुविधा भारतीय नागरिकांसाठी लागू नसून परदेशी नागरिक आणि ओसीआय कार्डधारकांसाठी अनिवार्य आहे. भारतात येणारे पर्यटक, विद्यार्थी, व्यावसायिक प्रवासी या सर्वांना हा फॉर्म भरावा लागेल. विशेष म्हणजे, एक व्यक्ती एकाच वेळी कुटुंबातील पाच सदस्यांपर्यंतचा फॉर्म भरू शकते. त्यामुळे गटाने प्रवास करणाऱ्यांसाठी ही प्रक्रिया अधिक सोयीस्कर ठरणार आहे.

3: फॉर्ममध्ये कोणती माहिती द्यावी लागेल?
ई-अरायव्हल कार्ड भरण्यासाठी काही मूलभूत माहिती आवश्यक आहे. यामध्ये पासपोर्ट तपशील (क्रमांक, जारी तारीख, मुदत समाप्ती), फ्लाइटची माहिती (विमान क्रमांक, आगमन तारीख, विमानतळ), संपर्क तपशील (फोन नंबर, ईमेल), भारत भेटीचे कारण आणि मुक्कामाचा पत्ता यांचा समावेश आहे. ही माहिती अचूक भरल्यास इमिग्रेशन प्रक्रिया अधिक सुलभ होते.
===========
हे देखील वाचा :
Iran : इराणसाठी भारत-चीनसह हे 5 देश का महत्त्वाचे? जाणून घ्या जागतिक राजकारणातील समीकरण
Bhagat Singh : भगत सिंग आणि त्यांचे तीन मराठी क्रांतिकारी दोस्त !
Strait Of Hormuz : जागतिक अर्थव्यवस्थेची लाइफलाइन असलेल्या ‘होर्मुझची खाडी’चे महत्त्व
===========
4: ई-अरायव्हल कार्ड कुठे भरायचे?
प्रवासी हे कार्ड विविध प्लॅटफॉर्मवरून सहज भरू शकतात. यासाठी ब्युरो ऑफ इमिग्रेशनची अधिकृत वेबसाइट, भारतीय व्हिसा ऑनलाइन पोर्टल किंवा ‘सु-स्वागतम’ अॅपचा वापर करता येतो. या डिजिटल सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होणार आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics