Home गाजावाजा स्पेशल Ekadshi : वैशाख महिन्यात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महत्त्व
गाजावाजा स्पेशल

Ekadshi : वैशाख महिन्यात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महत्त्व

77

हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधिवत केली जाते. वर्षभरात २४ एकादशीचे व्रत केले जातात, परंतु यंदा अधिक मास असल्याने यावर्षी २६ एकादशी वर्षभरात येणार आहे. वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक एकादशीला तिचे नाव आणि खास महत्त्व असते. प्रत्येक एकादशी विविध कारणांसाठी आणि विविध फलप्राप्तीसाठी ओळखली जाते. आता लवकरच वरुथिनी एकादशी येत आहे. वरुथिनी एकादशी अतिशय लाभदायक आणि फलदायक मानली जाते. या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केल्यास इच्छित फळाची प्राप्ती होते. पंचांगानुसार वरुथिनी एकादशी वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात येते, जो एप्रिल महिन्यात येतो. धार्मिक माहितीनुसार वरुथिनी एकादशीचे व्रत पाळल्याने आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने हजारो वर्षांच्या तपश्चर्येइतके फळ मिळते. असे मानले जाते की हे व्रत मनोभावे केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोठे पुण्य प्राप्त होते. (Ekadshi)

पंचांगानुसार यावर्षी वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी तिथी 13 एप्रिल 2026 रोजी पहाटे 1 वाजून 17 मिनिटांनी सुरू होईल आणि 14 एप्रिल 2026 रोजी पहाटे 1 वाजून 08 मिनिटांनी संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार, वरुथिनी एकादशीचा उपवास सोमवार 13 एप्रिल 2026 रोजी केला जाईल आणि त्याचे पारण 14 एप्रिल 2026 रोजी द्वादशी तिथीला केले जाईल. वरुथिनी एकादशीच्या दिवशी पूजेसाठी शुभ वेळ सकाळी 05 वाजून 58 ‍ मिनिटांपासून ते सकाळी 07 वाजून 34 मिनिटांपर्यंत असेल. बाज पूजेसाठी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांपासून ते 10 वाजून 46 मिनिटांपर्यंतचा शुभ मुहूर्त असेल. (Marathi)

चैत्र कृष्ण एकादशीला वरुथिनी एकादशी म्हटले जाते. या दिवशी श्रीविष्णूंच्या वराह अवताराचे पूजन केले जाते. वरुथिनी एकादशीचे व्रत करणाऱ्यांना श्रीविष्णूंचे संरक्षण, कवच मिळते, अशी मान्यता आहे. वरुथिनी एकादशीला श्रीविष्णूंची पूजा करावी. यावेळी विष्णूसहस्रनामाचे पठण करणे फलदायी मानले जाते. या व्रतामध्ये श्रीविष्णूंच्या दशावताराची कथा ऐकावी किंवा त्यांचे स्मरण करावे. (Top Marathi News)

Ekadshi

वरुथिनी एकादशीच्या दिवशी सकाळी नित्यकर्म आटोपून, स्नान करावे. त्यानंतर शंख, चक्र, कमळ, गदा आणि पितांबर धारण केलेल्या जगाचे पालनहार श्री हरी विष्णूंच्या पूजेसाठी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नानादी करा. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर पूजेला सुरुवात करा. यावेळी विष्णूंना रोळी, पिवळे चंदन, अक्षत, पिवळी फुले, फळे, मिठाई इत्यादी अर्पण कराव्यात, धूप-दीपाने आरती करावी आणि दिव्याचे दान करावे. तसेच श्री विष्णूच्या मंत्रांचा जप करावा. या दिवशी विष्णू सहस्त्रनाम पाठ करणे फार फलदायी असते. (Latest Marathi Headline)

वरुथिनी एकादशी व्रत कथा
वरुथिनी एकादशी संदर्भातील पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी मांधाता नावाचा राजा होता. त्याचे नर्मदा नदीच्या तीरावर राज्य होते. राजा मांधाता हा दानशूर आणि तपस्वी होता. एकदा जंगलात तपश्चर्या करत असताना त्याच्याजवळ एक अस्वल आले आणि त्याने राजाच्या पायाला चावा घेतला. त्यानंतर त्या अस्वलाने राजाला ओढत जंगलात नेले, त्यामुळे राजाची तपश्चर्या भंग झाली आणि तो जखमी झाला. वेदनेत राजाने हरिविष्णूचे ध्यान केले आणि प्राण वाचवण्याची प्रार्थना करू लागला. (Top Trending News)

=======

Kamdhenu : घरात कामधेनू गायीची मूर्ती ठेवताना ‘ही’ दिशा ठेवा लक्षात

Tulsi Puja : तुळशीजवळ दिवा कधी लावावा ? वास्तुशास्त्रातील नियम जाणून घ्या

=======

तेवढ्यात विष्णूंनी आपल्या चक्राने अस्वलाचा ठार केले. अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या राजाला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्याने विष्णूंना शारीरिक आणि मानसिक वेदना कमी करण्यासाठी उपाय विचारला. यावर विष्णू म्हणाले की, तू तुझ्या जुन्या कर्माचे फळ भोगत आहेस. अशा स्थितीत मथुरेत जाऊन चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत करा आणि माझ्या वराह अवताराचीही पूजा करावी. असे केल्यास तुला सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल. (Top stories)

वरुथिनी एकादशीच्या दिवशी, उपवास करताना, व्यक्तीने दूध, दही, फळे, सरबत, साबुदाणा, बदाम, नारळ, रताळे, बटाटा, मिरची, सेंधे मीठ, राजगीर पीठ इत्यादींचे सेवन करावे. पूजा केल्यानंतर, स्वच्छ पाण्यात आणि स्वच्छ भांड्यात काहीही खावे. या उपवासाच्या आधी किंवा त्याच दिवशी मांसाहार करू नका. यामुळे उपवास अयशस्वी मानला जाईल. हा व्रत करणाऱ्या व्यक्तीला भात आणि मीठ खाण्यासही मनाई आहे. द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर स्वतः भोजन करावे. (Social News)

( टीप : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. आम्ही या माहितीची कोणतीही पुष्टी करत नाही. आमचा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics
📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

गाजावाजा स्पेशल

Akshaya Tritiya : जाणून घ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण येत्या...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

Flight Ticket Booking
गाजावाजा स्पेशल

E-Arrival Card नक्की काय आहे? कोणासाठी महत्वाचा आणि कोणती कागदपत्रे सादर करावी याबद्दल घ्या जाणून

E-Arrival Card :  भारतातील विमानतळ प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल होत आहे....

India and Iran
गाजावाजा स्पेशल

Iran : इराणसाठी भारत-चीनसह हे 5 देश का महत्त्वाचे? जाणून घ्या जागतिक राजकारणातील समीकरण

Iran : मध्यपूर्वेतील महत्त्वाचा देश असलेल्या इराण साठी आंतरराष्ट्रीय संबंध अत्यंत महत्त्वाचे...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!