चैत्र नवरात्र सुरु असल्यामुळे सध्या सर्वत्र देवीच्या मंदिरांमध्ये चांगलीच गर्दी होताना दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये देवीची अनेक मंदिरं असली तरी त्यातली मुख्य साडे तीन शक्तिपीठांना जास्तच महत्त्व आहे. याच साडे तीन शक्तिपीठांमधील पहिले आणि पूर्ण शक्तीपीठ म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी. तुळजाभवानी मंदिर हे अत्यंत पवित्र शक्तीपीठ मानले जाते. तुळजाभवानी ही अनेक लोकांची कुलदैवत देखील आहे. मुख्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची देखील कुलदेवता होती. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. (Chaitra Navratra)
तुळजाभवानीचे प्राचीन देऊळ हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले आहे. पुराणानुसार असुरांचा संहारकरून धर्माचरण आणि नीतीची पुनर्स्थापना करण्याचे कार्य देवी आईने केले आहे. स्वराज्य हिंदवीचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज भोसले यांची कुलदेवी देखील हीच तुळजाभवानी आहे. भवानीआईच्या आशीर्वादाने महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली असून खुद्द देवी आईने छत्रपती शिवाजी महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील आलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी तलवार दिली होती. (Marathi)
आख्यायिका आहे की देवीचे हे देऊळ डोंगरमाथ्यावर असल्याने याचा कळस दिसत नाही. या देऊळाचे काही भाग हेमाडपंतीने बांधले आहे. नवरात्रोत्सव जरी नऊ दिवसाचा असला तरी हा उत्सव इथे एकूण एकवीस दिवस चालतो. कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनूभुती रुपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले.परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इह्लोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभुतिने सती जाण्याचा निर्णय घेतला; परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतिसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडून ती मेरू पर्वतानजिक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली. आणि तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. (Todays Marathi Headline)

तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लूब्ध झाला. त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली. दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने आदिशक्तिचा धावा केला. यासाठी की शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुट्का करावी आणि खरोखरच देवी भवानी मातेच्या रुपाने त्वरित धावून आली. तिने दैत्याशी युदध केले. दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला. तेव्हा देविने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले.ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले. ही तुळजा भवानीची मूर्ती स्वयंभू असून आई तुळजा भवानीला आठ हात आहेत. (Social Updates)
आई तुळजा भवानीच्या देऊळात दररोज पहाटे चार वाजता चोघड्यानी पूजेला सुरुवात केली जाते. दरवर्षी चैत्र महिन्यात पौर्णिमेस चैत्र पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. पौर्णिमेच्या लख्ख पांढऱ्या शुभ्र प्रकाशात भाविक येथे भेट देतात. विजापूरची शाकंभरी देवीच्या सन्मानासाठी इथे पौष महिन्यात शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. देऊळात दरवर्षी अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र उत्सव देखील मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. (Top Marathi News)
तुळजा भवानीच्या देऊळाचे व्यवस्थापनाची जवाबदारी मंदिर न्यास सांभाळते. देऊळाच्या आवारात न्यासाचे कार्यालय आहे. भाविकांच्या राहण्याची आणि जेवण्याची सर्व व्यवस्था न्यासा मार्फत करण्यात येते. देऊळात प्रवेशासाठी राजा शहाजी आणि राजमाता जिजाऊ यांच्या नावे दोन द्वार आहेत. मुख्य द्वाराच्या पहिल्या मजल्यावर श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम यांचे धार्मिक ग्रंथालय आहे. त्याचजवळ श्री समर्थ हे विश्राम गृह आहे. (Latest Marathi Headline)
तुळजाभवानी मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजास ‘परमार’ दरवाजा म्हणतात. जगदेव परमार या महान देवीभक्ताने आपले मस्तक सात वेळा देवीला अर्पण केले, अशी श्लोकरचना या दरवाजावर कोरली आहे. सभामंडपात पश्र्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात, पूर्वाभिमुख अशी श्री तुळजाभवानी देवीची रेखीव व प्रसन्न मूर्ती आहे. मूर्ती गंडकी शिळेची असून प्रमाणबद्ध आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी असे देवीचे मनोहर रूप आहे. देवी भवानीची ही स्थलांतर करता येणारी मूर्ती आहे. वर्षातून तीनवेळा ही मूर्ती मंचकी (पलंगावर) विसावते. असे इतरत्र कोठेही आढळत नाही. गर्भगृहाच्या भिंतीवर छोटी-छोटी आकर्षक शिल्पे आहेत. सभामंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह असून इथे चांदीचा पलंग आहे. (Top Trending News)
देवी मंदिराच्या मागच्या बाजूस काळा दगडाचा चिंतामणी असून तो गोल आकाराचा आहे. आपले काम होईल की नाही याचा कौल हा चिंतामणी देतो. शिवाजी महाराजही युद्धाला जाण्यापूर्वी मातेचे दर्शन घेऊन चिंतामणीकडे कौल मागत असत. एक रुपयाचे नाणे ठेवून चिंतामणी उजवीकडे फिरल्यास काम होणार व डावीकडे फिरल्यास काम होणार नाही असे समजले जाते. चिंतामणीच्या बाजूलाच देवीच्या अलंकाराचा खजिना, देवीची वाहन ठेवण्याची जागा आणि गुप्तदान कुंडी आहे. देवीच्या अलंकारामध्ये अस्सल सोन्याच्या माळा, हिर्या मोत्यांचे दागिने, जुडवा, कंबरपट्टा, सूर्यहार, चंद्रहार, रत्नहार, चिंचपेटा व रत्नजडित खडावा आहेत. (Latest Marathi Headline)
छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीस सोन्याची माळ अर्पण केली आहे. या माळेच्या प्रत्येक पुतळीवर राजे शिवछत्रपती अशी अक्षरे कोरली आहेत. नवरात्रोत्सवात मुख्य सणांच्या दिवशी, पाडवा, दसरा, दिपावली आदी प्रसंगी देवीस संपूर्ण अलंकार घातले जातात. मुख्य मंदिरासोबतच गोमुख तीर्थ, श्रीकल्लोळ तीर्थ, मंकावती तीर्थ, पापनाशी तीर्थ भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतात. याशिवाय महंत भारतीबुवांचा मठ, महंत बाकोजीबुवांचा मठ, हमरोजी बुवा मठ, अरण्य गोवर्धन मठ संस्थान, महंत गरीबनाथ मठ तुळजापुरात आहेत. (Top Stories)
========
Gudipadwa : गुढी पाडवा १८ की १९ कोणत्या तारखेला? जाणून घ्या गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त!
========
श्री तुळजाभवानी मातेच्या नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो या नवरात्र काळात नऊदिवस पुजा , घटस्थापना करण्यात येते ,छबिना , श्री देवीस विविध प्रकारच्या अलंकार पुजा करण्यात येतात असे अनेक कार्यक्रम साजरे होतात. तुळजापूरला जाण्यासाठी सोलापूर आणि उस्मानाबाद वरून तुळजापूरला जाण्यासाठी नियमित बस आहे. सोलापुरवरून जवळपास चाळीस किलोमीटर च्या अंतरावर तुळजापूर आहे. उस्मानाबाद वरून येथील अंतर 16 किलोमीटर आहे.सोलापूर रेल्वे स्टेशन जवळ आहे. विमानाने जायचे असल्यास पुणे किंवा हैद्राबाद वरून तुळजापूरला यावे लागणार. (Social News)
(टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- Chaitra Navratra
- Chaitra Navratra 2026
- marathi
- tuljabhavani temple tuljapur
- tuljapur
- tuljapur temple
- tuljapur tuljabhavani
- tuljapur tuljabhavani history
- tuljapur tuljabhavani significnace
- tuljapur tuljabhavani story
- चैत्र नवरात्र
- चैत्र नवरात्र २०२६
- तुळजापूर
- तुळजाभवानी माता
- तुळजाभवानी माता इतिहास
- तुळजाभवानी माता तुळजापूर
- तुळजाभवानी माता माहिती
- नवरात्र