Home लाईफ स्टाईल Swami Samarth : श्री स्वामी समर्थ प्रकट दिन! जाणून घ्या स्वामींच्या पूजेचा विधी
लाईफ स्टाईल

Swami Samarth : श्री स्वामी समर्थ प्रकट दिन! जाणून घ्या स्वामींच्या पूजेचा विधी

1

आज 20 मार्च रोजी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन आहे. स्वामी समर्थांचे असंख्य भक्त आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतात. आमपासून ते खासपर्यंत सर्वच जणं श्रद्धेने स्वामींच्या चरणाशी नतमस्तक होतात. स्वामी देखील कायम त्यांचे भक्त आणि इतरही सर्वच लोकांच्या पाठीशी कायम उभे असतात. आजच्या दिवशी स्वामींचे भक्त मोठ्या भक्तिभावाने या दिवशी स्वामींच्या चरणी लीन होऊन त्यांची सेवा करतात. श्री स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायाचे महान संत आणि गुरु होते. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचा तिसरा अवतार आहे. स्वामी समर्थ हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंहसरस्वती यांच्यानंतर भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार आहेत. चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजे 20 मार्च 2026 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. (Shree Swami Samarth)

श्री स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याची माहिती सांगणारे कोणतेही अधिकृत दस्तऐवज नाही. कथेनुसार, असे मानले जाते की पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून २४ किमी अंतरावर असलेल्या छेली खेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते. अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात 1856 मध्ये त्यांचे दर्शन झाले. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया तिथीचा. त्यानुसार या वर्षी 20 एप्रिलला शुक्रवारी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्री दत्तात्रेयांचा तिसरा अवतार मानले जातात. अशी मान्यता आहे की, अक्कलकोटमध्ये प्रकट होण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हे इकडे-तिकडे फिरत राहिले आणि मंगळवेढा येथे आले होते. याठिकाणी ते चांगलेच लोकप्रिय झाले. येथून ते सोलापूरमार्गे अक्कलकोटला आले. (Marathi)

Swami Samarth

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नानादी करुन स्वच्छ कपडे परिधान करा. आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा. नित्याची देवपूजा करा. देवासमोर एक नारळ, विडा ठेवून, नमस्कार करावा. घरातील वडीलधाऱ्यांना देखील नमस्कार करावा. त्यानंतर पूजेला सुरुवात करा. जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती रांगोळी काढावी. मध्ये स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून केशरी, लाल अथवा पिवळे वस्र अंथरुन मध्यभागी वडाचे पान पालथे ठेवून त्यावर गंध, अक्षता, तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा. आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गणपती पूजनासाठी सुपारी ठेवावी. सुपारीच्या उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवा. पूजा झाल्यानंतर पिवळ्या रंगाची मिठाई, वस्त्र इत्यादी गोष्टी स्वामींना अर्पण करावे. 108 वेळा स्वामी मंत्रांचा जप करावा. 108 वेळा शक्य नसल्यास जितके जमेल तितक्या वेळा जप करावा. स्वामींना पूजेचे साहित्य अर्पण करत शेवटी आरती करुन स्वमी समर्थांना नमस्कार करावा. (Latest Marathi Headline)

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
नि:शंक हो निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी,
जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
आज्ञेविन काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला,
उगाची भितोसी भय हे पळु दे.
जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे, (Top Trending News)
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा.
खरा होई जागा श्रद्धेसहीत,
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त.
कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
नको डगमगु स्वामी देतील साथ,
विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती. (Social News)

(टीप :वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!