Home लाईफ स्टाईल Swami Samarth : स्वामी समर्थाच्या प्रकट दिनाची कथा
लाईफ स्टाईल

Swami Samarth : स्वामी समर्थाच्या प्रकट दिनाची कथा

0

हिंदू धर्मातील दत्त संप्रदाय खूपच प्रसिद्ध आहे. दत्त संप्रदाय हा प्रमुख संप्रदाय म्हणून ओळखला जातो. हिंदू धर्मातील मुख्य देवता असलेल्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचे एकत्रित स्वरूप म्हणजे ‘श्री दत्त’. याच भगवान दत्तात्रयांचा अवतार म्हणून श्री स्वामी समर्थांची ओळख आहे. भगवान दत्तात्रयांचा श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचा पूर्ण अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ. आज याच स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. चैत्र शुद्ध द्वितीया अर्थात गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी स्वामींचे अक्कलकोट येथे दर्शन झाले होते. त्यामुळे हा दिवस सर्वच स्वामी भक्तांसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. (Swami Samarth)

आज चैत्र शुद्ध द्वितीया हीच तिथी असून आज महाराजांचा प्रकट दिन साजरा होत आहे. यादिवशी समर्थांच्या मठामध्ये आणि घरोघरी महाराजनची विधिवत पूजा केली जाते. शिवाय त्यांना नैवैद्य देखील दाखवला जातो. स्वामी नक्की कधी प्रकट झाले यावर अजूनही ठोस तारीख किंवा तिथी नाही. असे मानले जाते की पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून २४ किमी अंतरावर असलेल्या छेली खेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते. अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात 1856 मध्ये त्यांचे दर्शन झाले. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया तिथीचा. अशी मान्यता आहे की, अक्कलकोटमध्ये प्रकट होण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हे इकडे-तिकडे फिरत राहिले आणि मंगळवेढा येथे आले होते. याठिकाणी ते चांगलेच लोकप्रिय झाले. येथून ते सोलापूरमार्गे अक्कलकोटला आले. (Marathi)

अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार असल्याचे मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नृसिंहसरस्वती श्री शैल्य येथून कर्दळी वनात जाऊन तेथे तपश्चर्येला बसले होते तेव्हा काही काळातरांने त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. नंतर साडेतीनशे वर्षे गेली आणि एके दिवशी एक लाकूडतोड्याचा लाकूड तोडताना घाव चुकला आणि वारुळावर पडला. तेव्हा त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाल्याचे सांगितले जाते. लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव जेव्हा वारुळावर बसला तर तो श्रीस्वामी समर्थांच्या मांडीवर लागला ज्याने स्वामी समर्थ समाधीतून जागे झाले. कुऱ्हाडीचा वार त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत असे. श्री स्वामी समर्थ तेथून श्री काशीक्षेत्री प्रकट झाले. नंतर तेथून गंगा काठाने कलकत्ता, जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले. प्रथम श्रीस्वामी समर्थ मंगळवेढे गावात प्रकट झाले. (Top Marathi News)

Swami Samarth

ते रानात वास्तव्य करायचे आणि क्वचितच गावात जात असे. गावात आल्यावर एक ब्राह्मण कुटुंब श्री स्वामी महाराजांना भोजन देत असे. नंतर स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर ह्या ठिकाणी वास्तव्य करून अक्कलकोट येथे आले. इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी तीन दिवस अन्न देखील ग्रहण केले नव्हते. भक्त चोळाप्पा स्वामींना आपल्या घरी घेऊन गेले आणि त्यांना भोजन दिले. तेव्हापासून चोळाप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले. (Latest Marathi HEadline)

श्री स्वामींच्या प्रचिती अक्कलकोट येथील लोकांना येऊ लागली. मग लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप:साधना केली. स्वामींच्या अक्कलकोट येथील 22 वर्षांच्या वास्तव्यात हे स्थळ तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेकांना मार्गदर्शन केले. आपल्या मुक्कामात त्यांनी सर्वांना सांगितले की, ते यजुर्वेदी ब्राह्मण आहे, त्यांचे गोत्र कश्यप आहे आणि राशी चिन्ह मीन आहे. त्यांनी आपले शिष्य श्री बालप्पा आणि श्री चोलप्पा यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर तेथून स्वामी समर्थांनी संपूर्ण देशाचा दौरा केला. या दौऱ्यात ते सर्वत्र वेगवेगळ्या नावांनी ओळखले गेले. (Top Trending News)

==========

Swami Samarth : श्री स्वामी समर्थ प्रकट दिन! जाणून घ्या स्वामींच्या पूजेचा विधी

==========

अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांनी रविवार दि. ३० एप्रिल १८७८ रोजी माध्याह्नकाली ‘वटवृक्ष समाधी मठस्थानी’ आपल्या दैवी अवतार कार्याची समाप्ती केली होती. स्वामींचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ स्वामींना समाधिस्थ करण्यात आले. अशी मान्यता आहे की, श्री स्वामी महाराज आपले अवतारकार्य संपवून पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले. असे असले तरीही भक्तांच्या हाकेला स्वामी सदैव धावून येतात. असे म्हटले जाते की, जेव्हा त्यांनी समाधी घेतली तेव्हा त्यांचा आत्मा दोन भागात विभागला गेला. एक भाग वटवृक्षात विलीन झाला जो आता त्यांची समाधी म्हणून पूजला जातो आणि दुसरा भाग साईबाबांमध्ये विलीन झाला. (Social News)

(टीप :वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!