Home लाईफ स्टाईल Gudipadwa : गुढी पाडवा १८ की १९ कोणत्या तारखेला? जाणून घ्या गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त!
लाईफ स्टाईल

Gudipadwa : गुढी पाडवा १८ की १९ कोणत्या तारखेला? जाणून घ्या गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त!

0
Diwali

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र हा पहिला महिना असतो. या चैत्र महिन्याची किंबहुना हिंदू नवीन वर्षाची सुरुवातच होते ती गुढी पाडव्याने. साडे तीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा आणि पूर्ण मुहूर्त म्हणून गुढी पाडव्याची ओळख आहे. दारात छानशी सजवलेली गुढी उभारली जाते घरातील वातावरण यावेळी प्रसन्न असते. महाराष्ट्रात ठिकठिकाणी पारंपारिक वेशभूषेत ‘शोभायात्रा’ काढल्या जातात, ज्यामध्ये लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचे स्वागत केले जाते. (Gudipadwa)

गुढीपाडव्याला दारात सडा रांगोळी टाकून छान फुलांचे तोरण दाराला लावून गुढी उभारली जाते. या सणाचे धार्मिक,पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व देखील मानले जाते. मुख्य म्हणजे गुढी पाडव्याच्या दिवशी चैत्र महिन्यात  हिंदू नववर्ष आणि नवरात्रीची सुरुवात होते. गुढीपाडव्याचा सण मराठी आणि कोकणी हिंदूंसाठी विशेष महत्त्वाचा आहे. यंदा गुढीपाडवा कधी येतोय आणि या दिवशीची शुभवेळ, मुहूर्त कोणता चला जाणून घेऊया. (Todays Marathi News)

यावर्षी गुढी पाडव्याच्याच दिवशी अमावस्या आल्याने अनेकांमध्ये गुढीपाडवा कधी साजरा करायचा असा संभ्रम आहे. पंचांगानुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथी १९ मार्च २०२६ रोजी आहे. प्रतिपदा तिथीचा प्रारंभ १९ मार्च रोजी सकाळी ०६:५५ वाजता होणार असून, तिथीची समाप्ती २० मार्च रोजी पहाटे ०४:५० वाजता होईल. उदयतिथीनुसार, गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजीच संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जाईल. १९ मार्च रोजी सूर्योदय सकाळी ०६:२६ वाजता होईल. गुढी उभारण्यासाठी सकाळी सूर्योदयानंतरची वेळ अत्यंत शुभ मानली जाते. तसेच, दुपारी १२:०४ ते १२:५३ या वेळेत ‘अभिजित मुहूर्त’ असल्याने या काळातही धार्मिक विधी उरकले जाऊ शकतात. (Latest Marathi Headline)

Gudipadwa

गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान केले जाते. त्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर तोरण लावून सडा-रांगोळी काढली जाते. एका बांबूच्या काठीला नवीन वस्त्र सोवळे, साडी किंवा खण नेसवून त्यावर कडुनिंबाची डहाळी, साखरेची गाठी आणि फुलांचा हार बांधला जातो. या काठीवर तांब्याचा कलश उपडा ठेवून ती गुढी घराबाहेर किंवा खिडकीत उंच ठिकाणी उभारली जाते. गुढीला हळद-कुंकू लावून, धूप-दीप दाखवून तिची पूजा केली जाते आणि गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. गुढीपाडव्याला सकाळी गुढीपूजन झाल्यावर कडुलिंबाची पाने, खडीसाखर, जिरे, ओवा आणि मीठ एकत्र करून त्याचा प्रसाद खाल्ला जातो. यामागे धार्मिक आणि आयुर्वेदिक अशा दोन्ही अर्थांची सांगड घातली आहे: (Top Stories)

========

Ekadshi : पापांपासून मुक्त करणाऱ्या पापमोचनी एकादशीचे महत्त्व

Sheetala Ashtami : शीतला अष्टमीच्या दिवशी का खाल्ले जाते शिळे अन्न?

========

‘गुढीपाडवा’ हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे. ‘गुढी’ म्हणजे ब्रह्मध्वज किंवा विजयाचे प्रतीक असलेले निशाण आणि ‘पाडवा’ हा संस्कृत शब्द प्रतिपदा वरून आला आहे, ज्याचा अर्थ हिंदू महिन्याच्या शुक्ल पक्षाचा पहिला दिवस असा होतो. गुढीपाडवा हा हिंदू धर्मात खूप शुभ दिवस मानला जातो. पौराणिक कथेनुसार, याच दिवशी भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती सुरू केली होती. शिवाय, हा दिवस नवीन वर्ष, नवीन आशा आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात लोक घराबाहेर गुढी उभारतात आणि देवाला सुख, समृद्धी आणि यशासाठी प्रार्थना करतात. (Social News)

( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Akshaya Tritiya
लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला मीठ का खरेदी केली जाते?

आता लवकरच अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला...

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!