चैत्र नवरात्रीचा जल्लोष सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. उत्तर भारतीय लोकं मोठया प्रमाणावर चैत्र नवरात्र साजरे करतात. मात्र असे असले तरी संपूर्ण भारतामध्ये या काळात सर्वच लोकं देवीची मनोभावे उपासना करतात. चैत्र नवरात्राच्या निमित्ताने आपण भारतातील विविध शक्तिपीठांचे दर्शन घेत आहोत. आज आपण आसाममधील कामाख्या देवीबद्दल जाणून घेणार आहोत. गुवाहाटी येथे स्थित ५१ शक्तीपीठांपैकी एक कामाख्या शक्तीपीठ अतिशय प्रसिद्ध आणि चमत्कारी आहे. हे मंदिर आसाममध्ये आहे. कामाख्या मंदिर हे गुवाहाटीच्या नीलांचल पर्वतरांगेत वसलेले आहे. कामाख्या देवी मंदिरात अघोरी आणि तांत्रिकांची मोठी गर्दी असते. कामाख्या मंदिर हे सर्व शक्तीपीठांचे महापीठ मानले जाते. (Chaitra Navratra)
सतीने अग्निमध्ये स्वतःचे शरीर भस्म केल्यानंतर महादेव ते मृत शरीर घेऊन पृथ्वीमध्ये दुःख व्यक्त करत फिरत होते. देवी सतीसाठी असलेला महादेवाचा मोह भंग करण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे 51 भाग केले होते. ज्या-ज्या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले, ते शक्तीपीठ रुपात प्रसिद्ध झाले. असे सांगितले जाते की, देवी सतीचा योनी भाग ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणाला कामाख्या महापीठ म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार येथे देवीचा योनी भाग असल्यामुळे येथे देवी रजस्वला होते. कामाख्या शक्तीपीठ चमत्कार आणि रोचक गोष्टींनी भरलेले आहे. (Marathi)
आसामची राजधानी दिसपूरपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिराला देशभरातून आणि जगभरातून लाखो भाविक भेट देतात. माता सतीला समर्पित असलेल्या या मंदिरात दरवर्षी 22 जून ते 26 जून दरम्यान अंबुबाचा मेळावा आयोजित केला जातो. 22 जून ते 25 जून या काळात मंदिराचे दरवाजे बंद राहतात, या काळात ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी लाल राहते. असे मानले जाते की या दिवसात माता सती मासिक पाळीत राहतात. दुसरीकडे, 26 जून रोजी सकाळी मंदिर भाविकांसाठी खुले केले जाते, त्यानंतर भाविकांना मातेचे दर्शन होते. (Todays Marathi Headline)

कामाख्या मंदिराची गणना भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांमध्ये केली जाते. इतिहासानुसार हे कामाख्या मंदिर 8 व्या ते 9 व्या शतकात बांधले गेले. मात्र, हुसेनशहाने या राज्यावर हल्ला करून मंदिर उद्ध्वस्त केले. वर्षांनंतर, 1500 AD मध्ये, कोच वंशाचे संस्थापक, राजा विश्वसिंग यांनी मंदिराचे पूजास्थान म्हणून पुनरुज्जीवन केले. त्यानंतर 1565 मध्ये राजाच्या मुलाने हे मंदिर पुन्हा बांधले. तेव्हापासून आजतागायत हे मंदिर भारतातील प्रसिद्ध शक्तीपीठांमध्ये गणले जाते. कामाख्या माता ही काली आणि त्रिपुरा सुंदरी नंतर तांत्रिकांची सर्वात महत्वाची देवी आहे. या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण होते. असे मानले जाते. (Top Marathi News)
कामाख्या मंदिर तीन भागात बनवले आहे. पहिला भाग सर्वात मोठा आहे, प्रत्येकाला त्यात जाण्याची परवानगी नाही. दुसऱ्या भागात मातेचे दर्शन आहे. इथे दगडातून सतत पाणी येत असते. असे मानले जाते की, मातेला मासिक पाळी महिन्यातील तीन दिवस येते. हे तीन दिवस मंदिराचे दरवाजे बंद असतात. तीन दिवसांनंतर पुन्हा पूर्ण धूमधडाक्यात दरवाजे उघडले जातात. तंत्र साधनेसाठी हे ठिकाण सर्वात महत्त्वाचे मानले जाते. येथे साधू-अघोरींची वर्दळ असते. येथे येण्याने प्रत्येक व्यक्तीच्या सर्व अडचणी दूर होतात. (Latest Marathi Headline)
अंबुबाची यात्रा तांत्रिकांसाठी महत्त्वाची मानली जाते. देशभरातून लाखो भाविक आणि तांत्रिक समाज राजेवारी पूजा करण्यासाठी अंबुबाची यात्रेत सहभागी होतात. अंबुबाची यात्रेत तांत्रिकांचे अनेक गट सहभागी होतात आणि आपल्या परंपरेनुसार विधी करतात. अंबुबाची यात्रेत तांत्रिक साधना करण्यासाठी आणि आपल्या शक्ती वाढवण्यासाठी येतात, अशी मान्यता आहे. काही तांत्रिक गुप्तपणे विधी करतात. (Top Stories)
========
Chaitra Navratra : करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई
========
२२ ते २५ जून दरम्यान हा अंबूबाची मेळा पार पडला. या मेळ्यादररम्यान मंदिराचा दरवाजा बंद केला जातो आणि आतमध्ये जमिनीवर पांढऱ्या रंगाचा फडका अंथरला जातो जेव्हा ५ दिवसांनंतर मंदिर उघडलं जात तेव्हा हा फडका पूर्णतः ओला आणि लाल रंगाचा झालेला असतो. या कपड्याला अंबूबाची वस्त्र असं म्हटलं जात आणि याचे तुकडे करून भक्तांना प्रसाद म्ह्णून दिला जातो. भक्तांच्या म्हणण्यानुसार हा कापड देवीचा आशीर्वाद असतो आणि लोक याला घरी आपल्या देव्हाऱ्यात ठेवतात. पण या मंदिराबद्दल असणारी अजून एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इथे योनीच्या रूपातील दगडाची जी पूजा केली जाते तीथे कायम पाणी वाहत असत पण हे पाणी कोठून येतय, हे अजून कोणालाच सांगता आलेला नाही. अंबूबाची वस्त्रासोबतच हे पाणी सुद्धा भक्तांना प्रसाद म्हणून दिल जात. त्याचबरोबर असं म्हणतात कि यावेळी म्हणजे या ५ दिवसात ब्रह्मपुत्रा नदीच पाणीसुद्धा लाल रंगाचं वाहतं. (Social News)
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. आम्ही त्याची हमी देत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- Aasam
- Chaitra Navratra
- Chaitra Navratra 2026
- devi sati
- History Kamakhya Devi Temple
- Kamakhya
- Kamakhya Devi facts
- Kamakhya Devi information
- Kamakhya Devi mahiti
- Kamakhya Devi Temple Assam
- Kamakhya Devi Temple Secret
- Kamakhya Devihistory
- Kamakhya Mandir ka rahasya
- Kamakhya Shaktipeeth
- Kamakhya Temple
- Kamakhya Temple Cave
- parvati
- shiv paravtai
- आसाम
- कामाख्या मंदिर
- कामाख्या मंदिर आख्यायिका
- कामाख्या मंदिर आसाम
- कामाख्या मंदिर महत्त्व
- कामाख्या मंदिर माहिती
- कामाख्या मंदिर रहस्य
- चैत्र नवरात्र
- चैत्र नवरात्र २०२६
- देवी सती
- पार्वती
- महादेव
- शिव पार्वती