Home आरोग्य Sugarcane Juice : उन्हाळ्यातील अमृततुल्य पेय – उसाचा रस
आरोग्य

Sugarcane Juice : उन्हाळ्यातील अमृततुल्य पेय – उसाचा रस

71

उन्हाळ्याला सुरूवात झाली असून, उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. या उन्हाळ्यामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात तुमच्या आरोग्याची काळजी नाही घेतल्यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. उन्हाळ्यात तिव्र सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला डिहायड्रेशन, चक्कर येणे, संसर्ग होणे अशा समस्या होतात. वाढत्या उष्णतेमध्ये तुमच्या शरीराला हायड्रेटेड ठेवणे गरजेचे आहे. कडक उन्हात किंवा उष्माघात टाळण्यासाठी शरीराला आतून थंडावा मिळणे आवश्यक असते. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासोबतच आरोग्याच्या अनेक समस्या टाळायच्या असतील आणि त्यावर उपचार करायचे असतील तर उसाचा रस प्यावा. (Sugarcane Juice)

उसाचा रस हे 100 नैसर्गिक पेय आहे, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारे कोलेस्ट्रॉल नसते. जरी त्यात काही प्रमाणात चरबी, फायबर आणि प्रथिने असतात. उसाच्या रसात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह यांसारखे पोषक घटक आढळतात. उन्हाळा सुरु झाला की, जागोजागी रसवंत्या दिसायला सुरुवात होते. उन्हाळ्याची चाहूल लागली की, उसाच्या रसवंती देखील उघडू लागतात. उन्हाळा आणि उसाचा रस हे अतिशय लोकप्रिय आणि आरोग्यदायी समीकरण आहे. (Marathi)

कडक उन्हापासून आणि उष्माघातापासून वाचण्यासाठी लोक ते भरपूर पितात. हे फक्त चविष्टच नाही, तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर देखील आहे. हे शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि ऊर्जावान देखील ठेवते. याशिवाय, ऊसाचा रस पचनसंस्था सुधारण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. त्यात अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. ऊस आणि उसाचा रस हा उन्हाळ्याचा रस मानला जातो. उसाचा रस पोटाला थंडावा देतो आणि उष्णता, उष्णतेच्या लाटा आणि तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण करतो. (Top Maarthi News)

Sugarcane Juice

उसाचा रस हे हायड्रेटिंग पेय आहे. उन्हाळ्यात सतत शरीरात पाण्याची कमतरता भासते. उसाच्या रसामध्ये असलेले इलेक्ट्रोलाइट्स पोटॅशियम असतात. हा उसाचा रस प्यायल्याने आपले शरीर हायड्रेट राहते. उसाच्या रसामध्ये नैसर्गिकरीत्याच भरपूर साखर असते. यामुळे या रसाच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. ऊसाचा रस हा एक नैसर्गिक औषध देखील आहे. लिव्हर आणि किडनीशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी हा उसाचा रस उपयुक्त ठरू शकतो. ऊसापासून काढलेला आणि फिल्टर न केलेला रस अनेक ठिकाणी रम, दारू, गूळ आणि ब्राउन शुगर तयार करण्यासाठी वापरला जातो. उसाचा रस स्पोर्ट्स ड्रिंक म्हणून वापरता येतो. व्यायामानंतर आलेला थकवा दूर करण्यासाठी उसाचा रस पिऊ शकतो. त्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. (Top Trending Headline)

उसाच्या रसात पूर्णपणे साखर नसते. त्यात ७५ टक्के पाणी आणि सुमारे १५ टक्के फायबर असतं. प्रक्रिया न केलेल्या उसाच्या रसात फिनोलिक आणि फ्लेव्होनॉइड्स असतात. हे घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. उसाच्या रसामुळे शरीरातील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्सचं प्रमाण वाढतं. उसाच्या रसामध्ये असलेले फायबर पचन क्रिया सुधारते आणि पचनाच्या समस्या दूर करते. यकृताचं कार्य सुधारण्यासाठी उसाचा रस पिणं चांगलं आहे. तज्ज्ञांच्या मते, यकृताचं आरोग्य राखण्यासाठी आणि यकृताशी संबंधित आजारांपासून वाचण्यासाठी हा रस वरदान आहे. स्त्रियांनी उसाच्या रसाचं नियमित सेवन केल्यानं मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी होतो. (Top Stories)

===========

हे देखील वाचा : 

Skin Care : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?

Health : नेहमी तोंड कोरडे होणे आणि सतत तहान लागणे आहे गंभीर आजारांचे लक्षण

Health : चाळीशीनंतर निरोगी राहण्यासाठी महिलांनी आरोग्याची ‘अशी’ घ्या काळजी

===========

उसाचा रस कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि मँगनीजचा समृद्ध आहे. काही अभ्यासांनुसार हास रस कर्करोगाशी लढण्यास मदत करतो. डायबिटीस असणाऱ्या लोकांनी उसाचा रस पिणे चांगले नसते. त्यात असलेल्या साखरेचे प्रमाण अचानक रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. मात्र तुम्ही डॉक्टरांचा यावर सल्ला घेऊन रस प्यावा की नाही हे ठरू शकतो. उसाचा रस दात मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतो. शिवाय या रसामुळे बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होण्यास मदत होते. उन्हाळ्यात तुमच्या हाता-पायांची जळजळ होत असेल, तर अशा लोकांनी रोज उसाचा रस प्यावा. उन्हामुळे येणारा थकवा दूर करण्यासाठी उसाचा रस एक चांगला पर्याय आहे. नाकातून रक्त येणे, लघवीला आग होणे, जळजळ होणे अशा त्रासांवर उसाचा रस फायदेशीर ठरु शकतो. (Social News)

(टीप : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Blood Pressure 
आरोग्य

Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल

आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा चांगला, वाईट परिणाम...

Potato
आरोग्य

Potato : खरंच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

आपल्या भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घराचा राजा कोण असे विचारल्यावर सर्वच लोकांचे एकच...

Pooja Bhatt Relationships
आरोग्य

Dental Care : मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात पाहिजे, मग आजच ‘हे’ उपाय करा

असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे...

आरोग्य

Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!