Home आरोग्य Health : चाळिशीनंतर निरोगी राहण्यासाठी महिलांनी आरोग्याची ‘अशी’ घ्या काळजी
आरोग्य

Health : चाळिशीनंतर निरोगी राहण्यासाठी महिलांनी आरोग्याची ‘अशी’ घ्या काळजी

71

स्त्री ही प्रत्येक घराचा मुख्य आधारस्तंभ आहे. स्त्रीशिवाय घराची दैना होते. घरात स्त्री असल्यामुळेच घराला घरपण असते. घरच्या, बाहेरच्या, ऑफिसच्या सर्वच जबाबदारी स्त्रिया अतिशय उत्तमपणे पार पडताना आपण कायम बघतो. मात्र या जबाबदाऱ्यांमध्ये स्त्रिया स्वतःकडे सतत दुर्लक्ष करतात. स्त्रिया आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये इतक्या व्यस्त होऊन जातात की, त्या आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना देखील आरामाची, मदतीची गरज असते हे घरातील लोक आणि त्या स्वतः देखील विसरून जातात. मात्र वाढत्या वयासोबत स्त्रियांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे अतिशय आवश्यक आहे. वाढणाऱ्या वयानुसार स्त्रियांना अनेक त्रास उद्भवण्याचा धोका देखील मोठ्या प्रमाणावर वाढत असतो. त्यामुळेच स्त्रीने स्वतःकडे लक्ष देणे गरजचे आहे. वयाच्या चाळिशीनंतर तर प्रत्येक स्त्रीने प्रकर्षाने काही गोष्टी केल्याच पाहिजे, जेणेकरून चाळिशीनंतर होणारे त्रास कमी करता येतील. पण मग चाळिशीनंतर महिलांनी नक्की कोणती काळजी घ्यावी? (Health)

स्त्रिया वयाची चाळीशी पार करतात, तेव्हा शरीराची चयापचय क्रिया कमी होऊ लागते, सोबतच हार्मोन्समध्ये देखील कमतरता व्हायला सुरुवात होते. त्यांच्या पचन क्रियेवर परिणाम होतो. सामान्यत: स्त्रियांमध्ये ४५ से ५० वयादरम्यान रजोनिवृत्ती देखील होते, मात्र अनेकदा ही अवस्था महिलांमध्ये वयाच्या ४५ वर्षांआधीच लक्षण दाखवायला सुरुवात करते. या आणि यांसारख्या अनेक समस्यांपासून शरीराची सुरक्षा करण्यासाठी स्त्रियांनी आपल्या आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे. ज्यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात, मात्र कॅलशियम, लोह, प्रथिने आणि तंतुमय पदार्थांची मात्रा अधिक असावी. (Marathi)

महिलांच्या आहारात फायबर, प्रोटीन असणारे घटक तसंच पालेभाज्या यांचा समावेश हवा. मनुके रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यावं तसंच मनुके चघळून खावेत. त्यामुळे इम्युनिटी वाढते. एक गाजर, आवळा आणि बीट रस हे पदार्थ तुम्ही सकाळी नाष्टानंतर सूप म्हणून पिऊ शकता. त्याचबरोबर एक टोमॅटो सालीसह खावे. त्याचे सूपही तुम्ही पिऊ शकता. कॅल्शियम असणाऱ्या घटकांचे प्रमाण आहारामध्ये जास्त असावे. त्यासाठी तुम्ही रोज दूध पिऊ शकता. या दुधामध्ये एक चमचा खारीक पावडर टाकली तर हाडांचा त्रास कमी होतो. (Todays Marathi Headline)

Health

ऋतूनुसार येणाऱ्या भाज्यांचा आहारात समावेश केलाच पाहिजे, असे ज्येष्ठांनी नेहमीच सांगितले आहे. अशात, जर तुम्ही ते खात नसाल तर ही सवय बदलणे खूप महत्वाचे आहे. याच्या मदतीने शरीरातील पोषक तत्वांची पुरेशी काळजी घेतली जाऊ शकते. निरोगी आयुष्यासाठी आहारातील प्रथिनांच्या गरजांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. शरीरातील त्याची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही दररोज एक वाटी दुग्धजन्य पदार्थ आणि कोरड्या फळांचा आहारात समावेश करू शकता. (Top Marathi News)

स्त्रिया घरच्या कामात कितीही व्यस्त असल्या तरी त्यांनी त्यांच्या उत्तम शरीरासाठी आवश्यक असलेल्या व्यायामासाठी थोडा वेळ काढणे फार महत्वाचे आहे. त्यांनी त्यांच्या वेळापत्रकानुसार सकाळी किंवा संध्याकाळी कोणतीही वेळ निवडून तेव्हा व्यायाम करू शकता. जिमला गेले तर उत्तमच आहे, मात्र जिमला नसेल जायचे तर घरीच छोटे छोटे योगा प्रकार आणि भरपूर चालून देखील तुम्ही स्वतःला निरोगी ठेऊ शकता. शरीराला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. पाणी कमी पिण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघू शकत नाहीत. नियमित पाणी पिण्याची सवय करा. दररोज भरपूर पाणी प्या. (Latest Marathi Headline)

चाळीशीनंतर महिलांनी स्वतःची शारीरिक आणि मानसिक काळजी घेणे आवश्यक आहे. नियमित आरोग्य तपासणी करा, डेंटल चेकअप करा आणि विश्रांती घेण्यासाठी वेळ घ्या. अति कॅलोरी, जंक फूड आणि फॅटी पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरते. यामुळे वजन वाढू शकते आणि हृदयाच्या समस्या होऊ शकतात. पौष्टिक आहारावर लक्ष केंद्रित करा. अल्कोहोल आणि धूम्रपान हृदयविकार, कॅन्सर आणि इतर शारीरिक आजारांना कारणीभूत ठरू शकतात. त्यांचे सेवन सोडून निरोगी जीवनशैली स्वीकारा. (Top Stories)

========

Skin Care : चेहऱ्याला कधीच लावू नका या ५ गोष्टी; अन्यथा त्वचेचे सौंदर्य पडू शकते फिकट

========

चांगली झोप घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. झोपेच्या अभावामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आठ तासांची शांत झोप घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आत्मसन्मान कायम ठेवा. आत्मविश्वास आणि सकारात्मक मानसिकता राखणे दीर्घायुष्याच्या आणि आनंदाच्या किल्ली आहेत. मसूर डाळीमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन बी ९ हे खच्चून भरलेले असते. ज्याला फोलेट देखील म्हणतात. मसूर खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. या डाळीचे सेवन केल्याने हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका कमी होऊ शकतो. सेलेनियम नावाचे खनिज डाळींमध्ये आढळते. कॅन्सरशी लढण्यास मदत होते. एकूणच काय तर स्त्रियांनी आपल्या स्वतःकडे आणि आरोग्याकडे लक्ष देताना मुख्यत्वे आपला आहार आणि व्यायाम हे करणे सर्वात जास्त आवश्यक आहे. (Social News)

(टीप: कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Blood Pressure 
आरोग्य

Health : स्मरणशक्ती शार्प ठेवण्यासाठी आजच आहारात करा ‘हे’ बदल

आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचा चांगला, वाईट परिणाम...

Potato
आरोग्य

Potato : खरंच बटाटा खाल्ल्याने वजन वाढते का?

आपल्या भारतीय घरांमध्ये स्वयंपाक घराचा राजा कोण असे विचारल्यावर सर्वच लोकांचे एकच...

Pooja Bhatt Relationships
आरोग्य

Dental Care : मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात पाहिजे, मग आजच ‘हे’ उपाय करा

असे अनेकदा म्हटले जाते की दातांची ट्रीटमेंट ही सर्वात खर्चिक असते. त्यामुळे...

आरोग्य

Joints Sound : हाडांमधून येणाऱ्या कटकट आवाजाचे कारण आणि त्यावर उपाय

अनेकदा आपल्या लक्षात येते की, आपण खाली बसतो, उठतो तेव्हा आपल्या हाडांमधून...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!