आता सगळीकडेच चांगला उन्हाळा जणू लागला आहे. उन्हाच्या झळा देखील खूपच वाढल्या असून, सकाळी आणि संध्याकाळी देखील गरम वातावरण असते. उन्हाळा हा ऋतू जास्त कोणालाच आवडत नाही. हा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने देखील अजिबातच चांगला नसतो. उन्हाळा या ऋतूमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणे जितके जरुरी असते तितकीच आपल्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. ऊन वाढताच आपल्या त्वचेवर वाढत्या उष्णतेचा परिणाम जाणवायला सुरुवात होते. या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडणे, रखरखीत होणे, घाम येणे यासारख्या समस्या जाणवायला लागतात. परंतु आपल्या त्वचेची योग्य काळजी घेऊन आपण आपली त्वचा टवटवीत ठेवू शकतो. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊया. (Skin Care)
उन्हाळ्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त घाम येतो. या घामामुळे आपल्या शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणे खूप गरजेचे आहे. आपण जर जास्त पाणी पिले तर आपल्या शरीरातील विषारी पदार्थ शरीरावर टाकण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्ही बाहेर कुठेही जात असाल तर तुमच्या सोबत पाण्याची बाटली ठेवायला विसरू नका. जर तुम्हाला सारखं सारखं पाणी पिता येत नसेल तर अशावेळी काकडी, लिंबू तसेच पुदिन्याची पाने यांसारख्या गोष्टी खा. त्याचप्रमाणे Hyaluronic acid यांसारखे घटक जर तुमच्या त्वचेवर लावले तर तुमची त्वचा नेहमीच हायड्रेट राहील. (Marathi)
उन्हात फिरताना चेहऱ्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. घरातून बाहेर पडताना पाण्याची बॉटल, सनग्लासेस, आणि चेहऱ्याचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी स्कार्फचा वापर करावा. तसेच सनस्क्रिन लावून घराबाहेर पडावे. उन्हाळ्यात दिवसातून किमान दोनदा सॅलिसिलिक अॅसिड असलेल्या सौम्य एक्सफोलिएटिंग वॉशने तुमचा चेहरा स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो. चेहरा, मान आणि छातीवरील त्वचा पातळ असते, म्हणून या भागात कठोर अल्कधर्मी साबण वापरणे टाळा. (Top Marathi News)

आपण घरात असो किंवा बाहेर जात असून सन स्क्रीनचा वापर करणे अत्यंत गरजेचं आहे. सनस्क्रीन ही जेल बेस असावे. ज्यांना भरपूर प्रमाणात घाम येत असेल किंवा तेलकट त्वचा असेल तर त्यांनी वॉटरप्रूफ सन स्क्रीन वापरावे. एक्सफोलिएशन ही तुमच्या त्वचेच्या पृष्ठभागावरील मृत त्वचा पेशी काढून टाकण्याची प्रक्रिया आहे. नियमित एक्सफोलिएशनमुळे तुमची त्वचा ताजे आणि चमकदार ठेवण्यास मदत करू शकते. यामुळे पोर्स आणि मुरुम फुटणे टाळता येते. तुमच्या त्वचेच्या प्रकाराला साजेसे हलके एक्सफोलिएटिंग प्रोडक्ट निवडा आणि आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ते वापरा. उन्हाळ्यामध्ये सतत घाम येत असतो. त्यामुळे हा घाम जर तसाच राहिला तर त्वचेवर रॅश येऊ शकते. त्यामुळे चेहरा दिवसातू तीन वेळा थंड पाण्याने धुवावा. (Latest Marathi Headline)
उन्हाळ्यामध्ये त्वचा कोरडी झाली असेल तर दही आणि हरभराडाळीचे पीठ लावा.या मुळे त्वचा मऊ होईल. या साठी एका वाटीमध्ये २ चमचे दही आणि एक चमचा हरभराडाळीचे पीठ मिसळून पेस्ट बनवून लावा १५ मिनिटा नंतर चेहरा धुवून घ्या. असं आठवड्यातून किमान दोनवेळा करा. उन्हाळ्याच्या दिवसात आपण जे खातो त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. नेहमी आंबा, पपई, अननस, गाजर, टरबूज आणि बीटरूट्स सर्व पालेभाज्यांच्या हिरव्या भाज्या खा. सॅलड्स, दही आणि ताजी फळे नेहमी खा. साध्या आहारातील बदल आपल्या आतड्याची ताकद सुधारण्यासाठी आणि आपल्याला चमकणारी त्वचा देण्यासाठी उपयोगी पडतात. (Top Stories)
========
========
अॅव्होकाडो, बदाम, अक्रोड, जवसाच्या बिया, चिया बिया आणि ओमेगा-३युक्त मासे हे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात. हेल्दी फॅट्स त्वचेचा नैसर्गिक संरक्षक थर मजबूत करतात आणि ओलावा टिकवून ठेवतात. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि सूज किंवा लालसरपणा कमी होण्यास मदत होते. नियमित प्रमाणात या पदार्थांचे सेवन केल्यास त्वचा अधिक लवचिक आणि मुलायम राहते. (Social News)
(टीप : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics