आपण नेहमीच बाहेर फिरायला जायचा प्लॅन करतो तेव्हा सर्वात आधी बुकिंग केले जाते ते हॉटेलचे. बाहेर फिरायला गेल्यानंतर किंवा दुसऱ्या ठिकाणी कामाच्या निमित्ताने गेल्यानंतर सर्वात आधी राहण्याची सोय केली जाते. आता शहराच्या बाहेर गेल्यानंतर राहण्यासाठी हॉटेलच सोयीस्कर ठरते. मात्र आपण जेव्हा जेव्हा हॉटेलची बुकिंग करतो तेव्हा जवळपास सर्वच हॉटेलचा चेक इन आणि चेक आऊट टाईम हा फिक्स असतो. आपण हॉटेलमध्ये किती वाजता चेक इन केले तरी चेकआउटची वेळ ही फक्त १२ वाजताचीच असते. हे कुठल्या एका हॉटेलचे नाही सर्वच हॉटेलमध्ये हाच नियम आहे. पण असे का हॉटेलमध्ये चेक इन केव्हाही केले तरी चेक आऊट मात्र १२ लाच का करतात? चला जाणून घेऊया या मागचे कारण. (Hotel)
हॉटेलमध्ये आपण कधीही जाऊ शकतो, पण चेकआऊटची वेळ ही दुपारची १२ वाजताचीच असते. जगभरातील अनेक देशांच्या हॉटेलमध्ये याच नियमाचे पालन केले जाते. जर या वेळेत चेकआऊट केले नाही तर पुढच्या दिवशीचे हॉटेलचे भाडे भरावे लागते. हॉटेलमध्ये दुपारी किंवा रात्री कितीही वाजता चेक-इन केले तरीही दुसऱ्या दिवशी दुपारी ठीक १२ वाजता हॉटेलचे कर्मचारी दार ठोठावतात आणि तुम्हाला खोली सोडण्यास सांगतात. तुम्ही २४ तासाचे पैसे भरलेले असले, तरी तुम्हाला संपूर्ण २४ तास खोली मिळत नाही. (Marathi News)
हॉटेलमध्ये चेक-इनची वेळ ठरलेली असण्यामागचे पहिले कारण हाऊसकीपिंगशी संबंधित असते. यात खोलीची स्वच्छता करण्यापासून ती व्यवस्थित लावण्यापर्यंतची सर्व कामे येतात, जेणेकरून पाहुणे येताच आराम करू शकतील. बहुतांश पाहुणे सकाळी १० किंवा ११ वाजेपर्यंत चेक-आउट करतात. ते गेल्यानंतर स्वच्छता कर्मचारी खोल्यांची सखोल साफसफाई सुरू करतात. यात फक्त झाडू-पोछा नसून, खोल्या सॅनिटाइज करणे, चादरी बदलणे, बाथरूम साफ करणे आणि आवश्यक वस्तू भरून ठेवणे याचाही समावेश असतो. (Top Trending Headline)

हॉटेलच्या रूपाशी संबंधित काम अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी जेव्हा सर्व हॉटेलमध्ये चेक-इनची वेळ निश्चित असते, तेव्हा रिसेप्शन स्टाफ, हाऊसकीपिंग आणि मॅनेजर यांना आपले काम नियोजनबद्ध पद्धतीने करणे सोपे जाते. त्यामुळे पाहुण्यांचा अनुभव चांगला राहतो. अनेकदा खोल्यांमधील छोट्या-मोठ्या बिघाड लगेच लक्षात येत नाहीत. चेक-आउट आणि चेक-इनमधील वेळेत मेंटेनन्स टीमला लाईट, नळ, सैल फिटिंग किंवा खराब उपकरणे दुरुस्त करण्याची संधी मिळते. तसेच सुपरवायझरही खोल्यांची तपासणी करतात. (Latest Marathi News)
कामात घाई होऊ नये म्हणून हॉटेल लवकर चेक-इन स्वीकारत नाहीत. जर खूपच लवकर चेक-इनची परवानगी दिली, तर हॉटेलचे रोजचे काम विस्कळीत होऊ शकते, ज्यामुळे पाहुण्यांना त्रास होऊ शकतो. यासोबतच खोलीत राहणाऱ्या पाहुण्यांनाही रूम रिकामी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. याशिवाय, हॉटेल हेही सुनिश्चित करतात की, एकाच वेळी जास्तीत जास्त खोल्या रिकाम्या होतील आणि चेक-इनसाठी तयार असतील. यामुळे संपूर्ण सिस्टीम मॅनेज आणि कंट्रोल करणे मॅनेजरसाठी सोपे होते. (Top Stories)
कोणतेही काम मॅनेज करण्यासाठी नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे बहुतांश हॉटेल्समध्ये चेक आऊटची वेळ १२ वाजता ठेवण्यात आलेली असते. एका ठराविक वेळेवर साफसफाई केल्याने मॅनेजमेंटलाही अधिक फायदा होतो. ग्राहकांनी वेगवेगळ्या वेळी चेक आउट केल्यास, मॅनेजमेंटला अधिक कर्मचारी नियुक्त करावे लागतील. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics