चैत्र नवरात्राच्या निमित्ताने आज आपण कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. साडे तीन शक्तिपीठांमधील कोल्हापूरची अंबाबाई हे पूर्ण पीठ आहे. शिवाय जगातील 51 शक्तीपीठांपैकी हे प्रमुख शक्तीपीठ देखील आहे. अनेक लोकांची कुलस्वामिनी म्हणून देखील अंबाबाईची ओळख आहे. शिवाय तिरुपती बालाजी यांची पत्नी म्हणून देखील कोल्हापूरच्या अंबाबाईला ओळखले जाते. तिरुपती बालाजीला जाऊन आल्यानंतर जोपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेत नाही तोवर आपली यात्रा पूर्ण होत नाही आणि या यात्रेचे फळ देखील आपल्याला मिळत नाही अशी मान्यता आहे. (Chaitra Navratra)
कोल्हापूरच्या मंदिराचा उल्लेख कधी अंबाबाई कधी महालक्ष्मी असा केला जातो. असे सांगितले जाते की, श्री महालक्ष्मी मातेची मूर्ती रत्नजडित खंड्यापासून घडविण्यात आली असून ती जवळपास पाच ते सहा हजार वर्षांपूर्वीची असावी. चैत्र आणि शारदीय नवरात्रीमध्ये भक्त लाखोंच्या संख्येने कोल्हापुरात दाखल होऊन अंबाबाईचे दर्शन घेतात. वर्षातून दोनदा साजरा होणार ‘किरणोत्सव’ हा सोहाळा या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. दरवर्षी मार्च आणि नोव्हेंबरमध्ये हा सोहळा साजरा केला जातो. ठराविक दिवशी उगवित्या सूर्याची किरणे महालक्ष्मीच्या पायांशी पडतात. हा अनुभव घेण्यासाठी आणि हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक आवर्जून कोल्हापुरामध्ये येत असतात. (Marathi News)

कोकणाचा राजा कर्णदेव कोल्हापुरात आल्यावर ही मूर्ती एका लहानश्या मंदिरात होती. त्याने इथल्या मंदिराच्या बाजूस स्वच्छता करवून मंदिराला प्रकाशात आणले. वास्तुशास्त्राच्या बांधणीनुसार चालुक्य राजवटीत मंदिराचे बांधकाम केले गेले. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले असून या मंदिराला चक्क पाच कळस आहेत. जुन्या मंदिरातील खांबाला ‘गरूड खांब’ म्हणतात. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले. शालिवाहन काळात राजा कर्णदेवाने याची उभारणी केली. काळातराने तेथे अजुन 30 ते 35 मंदिरे बांधण्यात आली. 27 हजार वर्गफूट क्षेत्रफळावर पसरलेले हे मंदिर 51 शक्तीपिठांपैकी एक आहे. आदि शंकराचार्यांनी महालक्ष्मीच्या या मुर्तीची प्राण-प्रतिष्ठा केली होती. (Latest Marathi HEadline)
कोल्हापूर शहरात असलेले हे शक्तिपीठ जम्बू द्वीपांतर्गत ‘शिव’च्या परिसरात वसलेले आहे. हे देवीचे मंदिर 1700 ते 1800 वर्षे जुने आहे. मंदिरात द्वारपालांच्या दोन भव्य मूर्तींचीही एक कथा आहे. या मूर्ती दोन असुरांच्या असल्याचे सांगितले जाते. या असुरांनी एका रात्रीत हे भव्य मंदिर बांधले होते. तथापि, या कथेशिवाय एक कथा आहे. तैलन नावाच्या व्यक्तीने 1140 च्या सुमारास देवीच्या समोर महाद्वार बांधला होता, असे मानले जाते. प्राचीन शिलालेखानुसार- मंदिराचा पूर्व दरवाजा तत्कालीन सरदार दाभाडे यांनी बांधला होता. दुसरीकडे, देवी महालक्ष्मीसमोरील गरुड मंडप दाजी पंडित यांनी 1838 ते 1842 दरम्यान बांधला होता. आदिलशहाच्या काळात शहरातील कपिलतीर्थ परिसरात राहणाऱ्या एका पुजाऱ्याच्या घरात देवीची मूर्ती लपवून ठेवली जात होती. पुढे विजयादशमीच्या दिवशी देवीची मूर्ती पुन्हा मंदिरात विराजमान झाल्याचे सांगितले जाते. (Top Stories)
========
Chaitra Navratra : माहूरच्या रेणुका देवीचा इतिहास
Chaitra Navratra : साडे तीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ – सप्तशृंगी देवी
========
17व्या शतकात या लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंदिराचे तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असतं. देवीची मूर्ती पश्चिममुखी आहे. मंदिराच्या पश्चिमीकडील भिंतीवर छोटीशी खिडकी आहे. श्री महालक्ष्मीची मूर्ती रत्नजडित खड्यांपासून घडविण्यात आली असून ती जवळपास पाच ते सहा हजार वर्षापूर्वीची असावी, असे बोलले जाते. या मंदिराच्या कोरीव कामामध्ये वेगवेगळे वेद मंत्र कोरले आहेत. या देवीची मूर्ती किमतीच्या दगडाची असून वजनाला 40 किलोग्रॅमची आहे. मूर्ती घडताना हीरक नावाचा धातू मिसळला आहे. हे मंदिर चौकोनी दगडांच्या तुकड्यावर उभारले गेले आहे. या मूर्तीला चार हात असून एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल आहे. उजव्या हातात खालील बाजूस महाळुंग आहे आणि डाव्या हातात पानाचे ताट आहे. डोक्यावर मुकुट असून त्यावर शेषनागाची मूर्ती आहे. (Social News)
(टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- bhojan patra temple kolhapur
- Chaitra Navratra
- Chaitra Navratra 2026
- Kolhapur
- mahalaxmi temple
- Mahalaxmi Temple Kolhapur
- Mahalaxmi Temple Kolhapur mahiti
- Mahalaxmi Temple Kolhapur significance
- sade teen shaktipitha
- Shree Mahalaxmi Temple
- करवीरनिवासनी
- कोल्हापूर
- चैत्र नवरात्र
- चैत्र नवरात्र २०२६
- महालक्ष्मी मंदिर
- महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर
- महालक्ष्मी मंदिर महत्त्व