Home गाजावाजा स्पेशल Shiv Jayanti : समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे किस्से
गाजावाजा स्पेशल

Shiv Jayanti : समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे किस्से

74

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, श्रीमंत योगी, शिवकल्याण राजा अशा अगणित उपाधी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती वर्णावी तरी किती? हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी महाराजांनी शत्रू विरोधात मोठा लढा दिला आणि स्वराज्य उभारले. महाराजांना कायम आपल्या कार्यात मार्गदर्शन केले ते त्यांचे गुरु असलेल्या समर्थ रामदास स्वामी यांनी. रामदास स्वामी आणि महाराज यांचे नाते खूपच वेगळे आणि घनिष्ठ होते. रामदास स्वामी आणि महाराज यांचे नाते गुरु शिष्य असे होते. (Shiv Jayanti)

छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचे नाते महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत आदरपूर्ण आणि प्रेरणादायी मानले जाते. महाराज आणि रामदास स्वामी यांनी हिंदवी स्वराज्य आणि धर्मसंस्कृतीच्या रक्षणासाठी एकत्रित काम केले. समर्थांनी महाराजांना ‘निश्चयाचा महामेरू’ म्हणून संबोधले होते, तर महाराजांनी समर्थांना सज्जनगडावर मठ स्थापन करण्यासाठी जागा दिली. महाराजांची रामदास स्वामींवर अपार श्रद्धा होती. इतिहासात या दोघांचे अनेक किस्से सांगितले जातात. आज शिव जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांचे काही किस्से. (Shivaji Maharaj and Ramdas swami)

एकदा समर्थ रामदास गुरु भिक्षेसाठी जात असे. तेवढ्यात रस्त्यात त्यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी भेट झाली. महाराजांनी आपल्या गुरूस अभिवादन केले आणि म्हणाले “गुरुदेव मी आज पासून माझे सर्व राज-वैभव आपल्याला अर्पण करतो. गुरुदेव यावर उत्तरले “राजे आपण हे परत मागणार तर नाही”? राजे म्हणाले अजिबात नाही, हे संपूर्ण राज्य आपलेच आहे गुरुदेव. तेव्हा समर्थांनी आपल्या वस्त्रातून फाडून एक तुकडा राजेंच्या मुकुटावर बांधला आणि म्हणाले “की मग आज पासून मी माझे राज्य आपल्या स्वाधीन करतो. (Marathi)

आपण ह्या राज्यांचा सांभाळ करून याची काळजी घेऊन याचा व्यवस्थित सांभाळ करावा. राजेंचे डोळे हे बघून पाणावले. आपण माझी भेट मलाच परत करीत आहात. असे ते गुरूंना म्हणाले. गुरूंनी त्यांना उत्तर दिले की राजे मला या राज्याला धर्म राज्य करावयाचे आहे. आपण याचा सांभाळ करावा आणि माझे वारस म्हणून राज्य करा. मी सदैव आपल्याबरोबर आहे. हे एकून राजे म्हणाले “मग ठीक आहे गुरुदेव मी आपणास वचन देतो की या राज्यांचा ध्वज नेहमी भगवा असेल.” नेहमी आनंदी राहा !! असे म्हणून रामदास भिक्षेसाठी निघून गेले. (Todays Marathi Headline)

Shiv Jayanti

छत्रपती शिवाजी महाराज हे गुरु समर्थ रामदास स्वामी यांचे एकनिष्ठ भक्त होते. उत्तम आणि हुशार असल्यामुळे समर्थांचे महाराजांवर अपार प्रेम आहे होते. समर्थांच्या या प्रेमामुळे इतर सर्व शिष्यांना हेवा वाटायचं आणि समर्थ आणि शिवाजी महाराज यांच्या नात्याबद्दल ते कायमच चुकीचा अर्थ काढायचे. हे सर्व समर्थ जाणत होते आणि म्हणून त्यांनी इतर शिष्यांचा संशय दूर करण्याचे ठरवले. एक दिवस समर्थ शिष्यांसमवेत रानात गेले. रानात सगळे मार्ग चुकले आणि तेव्हाच समर्थ पोट दुखण्याचे नाटक करत एका गुहेत जाऊन झोपले. शिष्यांनी बघितले की गुरुजी वेदनेमुळे कण्हत आहेत. त्यांनी वेदना दूर करण्याचा उपाय विचारला. समर्थांनी उपाय सांगितल्यावर सर्व शिष्य मात्र हैराण होऊन एकमेकांना बघू लागले. ढोंगी भक्त उपाय करणार तरी कसे. सर्व शांत होते. (Top Marathi News)

तेवढ्यात शिवाजी महाराज समर्थांच्या दर्शनासाठी रानात आले आणि गुहेत वेदनेमुळे समर्थ कण्हत आहे हे कळल्यावर शिवाजी महाराज तेथे आले आणि हात जोडून वेदनेचे कारण आणि त्यावर काय उपाय करू शकतो विचारले. तेव्हा गुरुजींनी इतर भक्तांना सांगितले त्याप्रमाणे शिवाजींना सांगितले की भयंकर पोट दुखत आहे आणि हा रोग असाध्य असल्यामुळे यावर एकच औषध काम करू शकतं. पण ते फार कठिण आहे. (Latest Marathi Headline)

त्यावर शिवाजी महाराज म्हणाले, गुरुदेव आपण संकोच न करता औषध सांगा. आपली व्याधी बरी होत नाही तोपर्यंत मी शांत बसू शकणार नाही. तेव्हा समर्थ म्हणाले यावर केवळ वाघिणीचे ताजे दूध हेच औषध आहे. आणि ते मिळणे अशक्य आहे. हे ऐकल्यावर शिवाजी महाराज समर्थांना नमस्कार करून लगेच निघाले. थोडं दूर गेल्यावर त्यांना दोन वाघाचे छावे दिसले. तेव्हा महाराजांनी विचार केला की निश्चितच यांची आई देखील येथेच कुठे असेल. ते तेथेच उभे राहिले आणि आपल्या पिलांजवळ मनुष्य बघून वाघीण तेथे आली आणि महाराजांवर गुरगुरू लागली. महाराज तर वाघिणीशी लढण्यास समर्थ होते परंतु त्यांना लढायचे नव्हते, तर वाघिणीचे दूध काढायचे होते. (Top Stories)

========

Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांची माहिती

========

शिवाजींनी धैर्याने हात जोडून वाघिणीला विनंती केली की मी येथे तुम्हाला मारायला नव्हे तर केवळ दूध घेण्यासाठी आलो आहे कारण त्यांची व्याधी बरी व्हावी म्हणून तुझे दूध पाहिजे. हे दूध मी समर्थांना देऊन येतो आणि हवं तर नंतर तू माझे भक्षण केले तरी काही हरकत नाही. शिवाजी महाराजांची भक्ती आणि विनम्रता बघून वाघीण शांत झाली आणि महाराजांनी तिचे दूध काढले. तिच्या या वागणुकीमुळे आनंदी होऊन महाराजांनी तिला नमस्कार केला आणि गुहेत पोहचले. महाराजांनी भरलेलं कमंडलू बघत म्हटले की शिवा शेवटी तू वाघिणीचं दूध घेऊन आलास. धन्य आहे तू. तुझ्या सारखा शिष्य असल्यावर गुरु वेदनेत राहूच शकत नाही. शिवाजींना आशीर्वाद देत गुरुजींनी इतर शिष्यांकडे दृष्टी टाकली. (Top Trending News)

आता शिष्यांना शिवाजी महाराजांचा अधिकार कळून आला आणि स्वत:ची चूक देखील. शिष्याची योग्यता असल्यामुळे गुरुंचे त्यावर प्रेम असल्याचे सर्वांना कळून आले. अर्थातच ईर्ष्या करण्यापेक्षा आपल्यातील दुर्गुण दूर केल्याने आपण पात्र ठरू शकता आणि विशेष कृपा आणि प्रेमाचे अधिकारी बनू शकता. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा

Related Articles

गाजावाजा स्पेशल

Akshaya Tritiya : जाणून घ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण येत्या...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

गाजावाजा स्पेशल

Ekadshi : वैशाख महिन्यात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महत्त्व

हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता...

Flight Ticket Booking
गाजावाजा स्पेशल

E-Arrival Card नक्की काय आहे? कोणासाठी महत्वाचा आणि कोणती कागदपत्रे सादर करावी याबद्दल घ्या जाणून

E-Arrival Card :  भारतातील विमानतळ प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल होत आहे....

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!