Home गाजावाजा स्पेशल Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांची माहिती
गाजावाजा स्पेशल

Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांची माहिती

72

ज्यांच्या केवळ विचारानेच अभिमानाने छाती फुलते, ज्यांच्या नावाने चेहऱ्यावर तेज, अंगावर शहारे आणि डोळ्यात चमक येते, ज्यांच्या आभाळापेक्षा महान कर्तृत्वापुढे मानच काय तर शब्द देखील झुकतात, ज्यांच्यामुळे मराठी असल्याचा अभिमान अधिकच तीव्र होतो अशा माझ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे. संपूर्ण महाराष्ट्राला स्वराज्याचे स्वप्न दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचेच दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १६२७ की १६३० कधी झाला यावर मोठा वाद होता. अखेर अनेक गोष्टी पाहून २००० सालातील तत्कालीन सरकारने फाल्गुन वद्य तृतिया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख स्वीकारली. (Shiv Jayanti)

मात्र २००० सालापासून राज्यात तारखेनुसार आणि तिथीनुसार अशी दोनवेळा शिवजयंती साजऱ्या केल्या जातात. इंग्रजी कॅलेंडरनुसार १९ फेब्रुवारी रोजी आणि तिथीनुसार येणाऱ्या तारखेला. त्यामुळेच ६ मार्च रोजी आपण सर्व तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आहोत. महाराजांबद्दल बोलावे एवढे आपली पात्रता नाही. संपूर्ण जनतेला स्वराज्याचे स्वप्न दाखवून ते पूर्णत्वास नेण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. मराठा साम्राज्याचे संस्थापक अशी ओळख असलेल्या महाराजांबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो. त्यांच्या शौर्यावर आधारित सिनेमे बघतो. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का असेना बऱ्यापैकी लोकांना महाराजांबद्दल माहिती असेल. (Todays Marathi Headline)

मात्र आज शिव जयंतीचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला महाराजांच्या महत्वाच्या गोष्टीबद्दल सांगणार आहोत. ही गोष्ट म्हणजे महाराजांचा घोडा. आपण नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बघतो, त्यांची कल्पना करतो, तेव्हा ते नेहमीच घोड्यावर स्वार झालेले आपल्याला दिसतात. घोड्याशिवाय महाराज नेहमीच अपूर्ण असायचे. त्यांचे साथी असणाऱ्या घोड्यांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (Top Marathi News)

Shiv Jayanti

शिवाजी महाराजांनी त्यांचे सैन्य तयार करताना त्यात प्रामुख्याने घोडदळाचा समावेश केला होता. या घोडदळामध्ये ते स्वतः आणि त्यांच्यासोबत अनेक निष्णात आणि हुशार घोडेस्वार होते. घोडदळातील स्वरांना स्वतः महाराजच घोडे पुरवायचे आणि त्यांच्या देखरेखीसाठी खिदमतगारही द्यायचे. शिवाजी महाराजांकडे अनेक जातीवंत घोडे होते. शिवाजी महाराज घोड्यांचा वापर निर्णायक प्रसंगी करत असत. (Latest Marathi Headline)

आपण नेहमीच महाराजांच्या कथा, किस्से ऐकताना त्यांनी जवळपास सर्वच महत्वाच्या मोहिमांमध्ये घोडा वापरल्याचे ऐकले आहे. शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमांमध्ये घोड्यांचा वापर नेमकेपणाने केला. शिवाजी महाराजांकडे एकूण सात घोडे होते. मोती, विश्वास, तुरंगी, इंद्रायणी, गाजर, रणभीर, कृष्णा अशी या घोड्यांची नावे होती. यातल्या कृष्णा या पांढऱ्या रंगाच्या घोड्यावर छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर बसले होते. महाराज स्वतः घोडेस्वारीमध्ये निपुण होते. ते लहान असताना घोडेस्वारी त्यांचा आवडता खेळ होता. (Top Stories)

छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली तेव्हा त्यांच्या अधिपथ्याखाली ४०० गड होते. काही गडांची स्थापना त्यांनी स्वत: केली होती आणि काही गड त्यांनी युद्ध करून जिंकले होते. महाराजांचा प्रत्येक गड, किल्ला हा स्थापत्यशास्त्र, व्यवस्थापन यांचे आजच्या काळातील लोकांसाठी जिवंत उदाहरण आहे. अतिशय हुशार, चाणाक्ष अशा महाराजांचा एक एक गुण हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आणि अंगिकारावा असा आहे. महाराजांचे कर्तृत्व, त्यांची कीर्ती, प्रताप हे केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहे. म्हणूनच शिव जयंती ही केवळ महाराष्ट्रात नाही तर १११ पेक्षा जास्त देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. यासाठीच तर म्हटले जाते, “निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।” (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

गाजावाजा स्पेशल

Akshaya Tritiya : जाणून घ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण येत्या...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

गाजावाजा स्पेशल

Ekadshi : वैशाख महिन्यात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महत्त्व

हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता...

Flight Ticket Booking
गाजावाजा स्पेशल

E-Arrival Card नक्की काय आहे? कोणासाठी महत्वाचा आणि कोणती कागदपत्रे सादर करावी याबद्दल घ्या जाणून

E-Arrival Card :  भारतातील विमानतळ प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल होत आहे....

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!