Home लाईफ स्टाईल Chaturthi : वैशाख महिन्यात येणाऱ्या विकट संकष्टी चतुर्थीचे महत्त्व आणि माहिती
लाईफ स्टाईल

Chaturthi : वैशाख महिन्यात येणाऱ्या विकट संकष्टी चतुर्थीचे महत्त्व आणि माहिती

71

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा व व्रत केले जातात. महिन्यातून दोन चतुर्थी येतात एक असते संकष्टी चतुर्थी तर दुसरी विनायक चतुर्थी. दोन्ही चतुर्थीचे धार्मिक महत्व आहे. पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात तर अमावास्ये नंतर जी चतुर्थी येते ती असते विनायक चतुर्थी. यादिवशी गणपती बापाला दुर्वा व जास्वंदीचे फुले वाहून पूजा करतात. मोदकांचा नैवेद्य दाखवतात. नुकतीच चैत्र पौर्णिमा झाली असल्याने आता संकष्टी चतुर्थी येईल. (Chaturthi)

वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. या चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भक्त पूर्ण दिवस उपवास पाळला जातो आणि चंद्रोद्याची वेळी चंद्राला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार, विकट संकष्टी चतुर्थीला उपवास केल्याने गणपती प्रसन्न होतो आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. वर्षातून येणाऱ्या सर्वच चतुर्थीना विविध नावांनी ओळखले जाते. एका वर्षात 12 आणि ज्या वर्षी अधिकमास आल्यास त्या वर्षी 13 संकष्टी चतुर्थी येतात. अर्थात यंदा अधिक महिना असल्याने यावर्षी 13 चतुर्थी येतेही. आता येणाऱ्या वैशाख महिन्यातील चतुर्थीला विकट चतुर्थी असे म्हटले जाते. (Ganpati BAppa)

वैशाख महिन्यातील कृष्ण चतुर्थी तिथीची सुरुवात रविवार, ५ एप्रिल रोजी सकाळी ११:५९ वाजता होणार आहे आणि या तिथीची सांगता ६ एप्रिल रोजी दुपारी २:१० वाजता होईल. अशा वेळी उद्यतिथीनुसार संकष्टी चतुर्थी रविवार, 5 एप्रिल रोजी आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त ५ एप्रिल रोजी सकाळी ७:४१ ते दुपारी १२:२४ वाजेपर्यंत असेल. यावेळी ब्रह्म मुहूर्त पहाटे ४:३५ ते ५:२१ पर्यंत असेल. तसेच अभिजीत मुहूर्त सकाळी ११:५९ ते दुपारी १२:४९ पर्यंत असेल. लाभ-उन्नती मुहूर्त सकाळी ९:१५ ते सकाळी १०:५० पर्यंत असेल. अमृत-सर्वोत्तम मुहूर्त सकाळी १०:५० ते दुपारी १२:२४ पर्यंत असेल. तर वैशाख संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय रात्री ९.५८ वाजता होणार आहे. (Marathi)

संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. हे व्रत पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते. हे व्रत दोन प्रकारांनी करतात. एक असते ती मिठाची संकष्ट चतुर्थी व दुसरी पंचामृती चतुर्थी. दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला आणि गणपतीला मोदकांचा महानैवेद्य दाखवावा. विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म झाल्यानंतर स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. मग, हातात पाणी घेऊन गणपतीसमोर बसून प्रार्थना करावी. त्यानंतर, देवघरात एका आसनावर लाल वस्त्र अंथरा आणि त्यावर गणपतीची मूर्ती किंवा चित्र ठेवा. यानंतर, गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने गणपतीला स्नान घालावे. (Top Trending Headline)

Chaturthi

त्यानंतर गणपतीच्या मूर्तीला शेंदूर किंवा लाल चंदनाचा टिळा लावावा आणि तांदूळ अर्पण करावे. पूजेदरम्यान २१ दुर्वा अर्पण करा. “ओम गण गणपतये नमः” या मंत्राचा जप करावा. गणपतीला मोदक अर्पण करावे. दिवा लावून आणि संकष्टी चतुर्थीच्या व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी. शेवटी, गणपतीची आरती करून पूजेची सांगता करा. रात्री, चांदीच्या भांड्यात किंवा कलशात थोडे दूध, अख्खे धान्य आणि फुले मिसळून चंद्राला पाणी अर्पण करा. चंद्राकडे पाहून त्याला अर्घ्य अर्पण करा. त्यानंतर, उपवास सोडावा. (Top Marathi NEws)

संकष्ट अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटांवर विजय मिळवून देणारी अशी ही एकादशी आहे असा त्याचा अर्थ आहे. संकटाचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि पापांपासून मुक्ती मिळते. हा उपवास केल्याने बुद्धीची प्राप्ती होते, शिवाय विविध कलांमध्ये व्यक्ती निपुण होते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने श्रीगणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते. धार्मिक मान्यतेनुसार संततीप्राप्तीसाठीही संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. हे व्रत करुन चंद्र दर्शन केल्यानंतर गणेश पूजा करावी. काही ठिकाणी या दिवशी ब्राह्मण भोजन देखील करवले जाते. याने अर्थ- धर्म-काम-मोक्ष अभिलाषित पदार्थ प्राप्त केले जाऊ शकते. (Latest Marathi HEadline)

========

Hanuman : हनुमानाच्या 11 विविध रूपांची पूजा केल्याने होते विशेष कृपा

Hanuman : हनुमानाला रुईच्या पानांचा हार आणि तेल का वाहिले जाते?

========

संकष्ट चतुर्थी व्रत कथा
एकदा गणपती उंदरावर बसून जात असताना त्यांना कोणीतरी हसत आहे असे ऐकू येते. गणपती वर बघतात तर चंद्र आपल्यावर हसत आहेत असे त्यांना कळतं. हे पाहून गणपतीला राग येतो आणि ते चंद्राला शाप देतो की आजपासून तुझे तोंड काळे पडणार आणि तुझ्याकडे कुणीही बघणार नाही आणि जर पाहिले तर त्यावर चोरीचा आळ येईल. यावर मोठे तप करुन चंद्र गणपतीला प्रसन्न करतात. तेव्हा गणपती चंद्राला शापातून मुक्त करतात मात्र त्याला सांगतात की भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी म्हणजे गणेश चतुर्दशी तुझे तोंड कुणीही बघणार नाही आणि जर बघितले तर त्याच्यावर खोटा आळ येईल. (Top Stories)

त्यावर चंद्र गणपतीला विचारतो की जर चुकून कोणी मला पाहिले तर त्याने यापासून मुक्तीसाठी काय करावे? त्यावर गणपतीने सांगितले की त्याने संकष्टी चतुर्थीचा व्रत धरावा. त्यामुळे त्याची आळातून मुक्तता होईल. पुराण काळातील कथांमध्ये असे सांगितले जाते की श्रीकृष्णाने गणेश चतुर्थी दिवशी चंद्र पाहिला होता त्यामुळे त्यांच्यावर संम्यतक मणी चोरल्याचा आळ आला होता. त्यावेळी श्रीकृष्णाने गणेशाची संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण केले तेव्हा मुक्ती मिळाली. (Social News)

( टीप : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. आम्ही या माहितीची कोणतीही पुष्टी करत नाही. आमचा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics
📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!