आज सगळीकडे महावीर जयंतीचा उत्सव साजरा केला जात आहे. तीर्थंकर भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर आहेत. संपूर्ण भारतामध्ये जैन धर्माचे अनुयायी महावीर जयंती मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा करतात. कारण या दिवशी . भगवान महावीर स्वामींचा जन्म बिहारमधील कुंडलपूर येथील राजघराण्यात इ.स.पूर्व 599 मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव त्रिशला आणि वडिलांचे नाव सिद्धार्थ होते. भगवान महावीर यांना वर्धमान, सन्मती, वीर, अतिवीर इत्यादी नावांनीही ओळखले जाते. जैन समुदाय मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात. भगवान महावीर जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तीर्थकर आहेत. यंदा यंदा भगवान महावीरांची 2626 सावी जयंती आहे. (Mahavir Jayanti)
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला भगवान महावीर यांचा जन्म झाला. त्यामुळे हा दिवस जैन समुदायातील लोक महावीर जयंती म्हणून साजरा करतात. महावीर जयंतीच्या दिवशी भगवान महावीरांच्या शिकवणीचे स्मरण केले जाते. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि भक्तीभावाने विविध धार्मिक विधी करतात. महावीर जयंतीच्या या खास प्रसंगी, जैन धर्माचे लोक प्रभातफेरी, शोभा यात्रा आणि पूजा विधी आयोजित करतात. महावीर जयंती ही भगवान महावीरांना समर्पित आहे, महावीरजींनी समाजकल्याणाचे संदेश दिले आणि मोक्ष मिळविण्यासाठी 5 नियमही बनवले. या पाच नियमांना महावीरांचे पंचसिद्धांत म्हणून ओळखले जाते. (Marathi)
जैन ग्रंथ आणि धार्मिक ग्रंथांनुसार, भगवान महावीरांची जन्म चैत्र महिन्याच्या (हिंदू दिनदर्शिकेच्या) शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला बिहारमधील कुंडलग्राम (आताचे कुंडलपूर) येथे झाला होता, तेव्हा पाटणा वैशालीपासून काही किलोमीटर अंतरावर राज्याची राजधानी होती. स्वेतांबर जैनांच्या मते, महावीरांचा जन्म इ.स.पू 599 मध्ये झाला तर दिगंबर जैन नुसार, त्यांचा जन्म इ.स.पू 615 रोजी झाला. हे त्यांचे जन्मवर्ष मानले जाते. त्यांचे नाव वर्धमान होते आणि त्यांच्या पालकांचे नाव राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशाला असे होते. (Todays Marathi Headline)

भगवान महावीरांनी कायमच त्यांच्या जीवनात अहिंसेला सर्वोच्च स्थान दिले आणि हेच त्यांच्या जीवनाचे मोठे तत्व होते. भगवान महावीर यांनी कायमच सर्वच प्राण्यांप्रती करुणा बाळगण्याचा संदेश दिला. महावीर जयंतीच्या दिवशी भगवान महावीरांनी दिलेल्या अहिंसेच्या महान संदेशाची आठवण काढली जाते. शिवाय हा दिवस सर्वच लोकांना प्राणीमात्रांप्रती दयाळूपणे वागण्याची प्रेरणा देते. वर्धमान महावीरांनी जगाला अहिंसेचा धडा शिकवला. महावीर जयंतीसोबतच हा दिवस महावीर जन्मकल्याणक म्हणूनही ओळखला जातो. जैन दिगंबर आणि श्वेतांबर चैत्र महिन्याच्या 13 व्या दिवशी म्हणजेच चैत्र शुक्ल त्रयोदशीला एकत्र हा सण साजरा करतात. (Top Trending Headline)
महावीर लहान असताना, इंद्र आणि देवतांनी त्यांना भगवान जन्म साजरा करण्यासाठी सुमेरू पर्वतावर नेले. महावीर स्वामींचे बालपण राजवाड्यात गेले. महावीर स्वामी हे अहिंसेचे अवतार होते. त्यांचे जीवन त्याग आणि तपश्चर्याने परिपूर्ण होते. त्याने लंगोटीही घातली नाही. ज्या काळात हिंसाचार, पशुबळी आणि जातिभेद वाढले त्या काळात भगवान महावीरांचा जन्म झाला. तारुण्यात महावीर यांचा विवाह यशोदा नावाच्या राजकन्येशी झाला होता आणि त्यांना प्रियदर्शन नावाची मुलगीही होती. ते 28 वर्षांचे असताना त्यांच्या पालकांचे निधन झाले. मोठा भाऊ नंदीवर्धन यांच्या सांगण्यावरून महावीर 2 वर्षे घरात राहिले. अखेर वयाच्या 30 व्या वर्षी मार्गशीर्ष कृष्ण दशमीच्या दिवशी त्यांनी दीक्षा घेतली. (Top Marathi News)
या काळात महावीरांनी तपश्चर्या, संयम आणि समता साधली आणि पंचमहाव्रताचा धर्म पाळला. इतरांना दुःख देऊनच इंद्रियांचे सुख आणि इंद्रिय वासनांची प्राप्ती होऊ शकते हे त्यांनी जाणले होते. त्यामुळे सर्वांशी प्रेमाने वागताना त्यांनी अवघ्या जगाला सत्य आणि अहिंसेचा धडा शिकवला. सर्व जगाला उपदेश केला. त्याग आणि संयम, प्रेम आणि करुणा, नम्रता आणि सदाचार हे त्यांच्या उपदेशांचे सार होते. भगवान महावीरांनी आपल्या प्रवचनात धर्म, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह, क्षमा यांवर सर्वाधिक भर दिला. भगवान महावीरांनी चतुर्विध संघाची स्थापना केली. भगवान महावीरांनी देशाच्या विविध भागात फिरून आपला पवित्र संदेश प्रसारित केला. महावीर स्वामी म्हणतात की धर्म हेच श्रेष्ठ हित आहे. अहिंसा, संयम आणि तपस्या हा धर्म आहे. ते म्हणतात – ‘जो धर्मात्मा आहे, ज्याच्या मनात सदैव धर्म असतो त्याला देवही नमस्कार करतात.’ (Latest Marathi Headline)
==========
Hanuman : रावणाविरुद्ध युद्ध जिंकल्यानंतर रामाची वानरसेना गेली तरी कुठे?
==========
त्यांनी पंचशीलाची तत्त्वे जगाला समजावून सांगितली. त्यानुसार सत्य, अपरिग्रह, अस्तेय, अहिंसा आणि क्षमा ही तत्त्वे आहेत. त्यांनी आपल्या काही खास शिकवणीतून जगाला योग्य मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला. आपल्या अनेक प्रवचनांमधून जगाला योग्य मार्गदर्शन केले. बरेच राजे महाराज स्वामी महावीर कडून प्रवचन घेऊ लागले आणि तेही महावीर स्वामींचे अनुयायी झाले. बिंबिसारालाही त्या राजांपैकी एक होता जो महावीर स्वामींचा अनुयायी बनला होता. महावीर स्वामींनी त्यांच्या शिकवणीतून प्रेम, शांती आणि अहिंसेचा संदेश दिला. (top Stories)
संपूर्ण भारतातील जैन समाजाकडून महावीर जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी केली जाते. या दिवशी लोक जैन मंदिरांना भेट देतात, प्रार्थना करतात आणि भगवान महावीरांच्या शिकवणीचे स्मरण करतात. यानिमित्ताने प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लोक भगवान महावीरांच्या मूर्तींना सजवतात आणि भक्तीगीते गातात यालाही विशेष महत्त्व आहे. लोक अन्न, कपडे आणि इतर अनेक साहित्य गरजूंना दान करतात. काही लोक महावीर जयंतीच्या दिवशी उपवास करतात. काही ठिकाणी भगवान महावीरांच्या मिरवणुकाही काढल्या जातात. (Social Media)
(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- chiatra month
- happy mahavir jayanti
- jain community
- jain dharma
- jain festival
- mahavir jayanti
- Mahavir Jayanti 2026
- mahavir jayanti celebration
- mahavir jayanti importance
- mahavir jayanti information
- mahavir jayanti significans
- vardhamn mahavir
- जैन धर्म
- भगवान महावीर
- महावीर जयंती
- महावीर जयंती उत्सव
- महावीर जयंती कशी साजरी करतात?
- महावीर जयंती महत्त्व
- महावीर जयंती माहिती
- महावीर जयंती म्हणजे काय
- वर्धमान महावीर