सध्या सगळीकडे महाशिवरात्रीचे वातावरण पाहायला मिळत आहे. महादेवाच्या मंदिरांमध्ये देखील शिवरात्रीच्या जोरदार तयारी चालू आहे. भगवान शंकरांना ‘संहारकर्ता’ म्हणून ओळखले जातात, जे दुःखाचे हरण करून भक्तांना सुख आणि समृद्धी प्रदान करतात. अशा भगवान शिवाचा सर्वात मोठा उत्सव म्हणून महाशिवरात्रीची ओळख आहे. आता शिव यांचे नाव उच्चारले की, आपल्या डोळ्यासमोर वल्कले परिधान केलेले, अंगावर भस्म, गळ्यात नाग, हातात त्रिशूल आणि डोक्यावर चंद्र असलेली छवी उभी राहते. हीच महादेवांची ओळख आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का की महादेवांनी डोक्यावर चंद्र का परिधान केला आहे? महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आपण याबद्दलच जाणून घेऊया. (Lord Shiv)
भगवाणी शिवानी डोक्यावर चंद्र धारण करण्यामागे काही पौराणिक आख्ययिका सांगितल्या जातात. एका आख्ययिकेनुसार प्राचीन काळी राक्षसांनी तिन्ही लोकांमध्ये अराजकता माजवली होते. यामुळे नर-नारीपासून ते देवता असे सर्व जण त्रस्त झाले होते. राक्षसांपासून स्वर्गाचा राजा इंद्रही भयभीत झाला. राक्षसांता त्रास असहाय्य झाल्याने सर्व देव, देवी आणि ऋषी जगाचा पालनहार देव विष्णूपर्यंत पोहोचले. सर्वांनी विष्णूला राक्षसांच्या त्रासा बद्दल सांगत मदतीसाठी साकडे घातले. (Marathi)
यावर, विष्णूंनी देवतांना समुद्रमंथन करून अमृत प्राप्त करण्याचा सल्ला दिला. मात्र, एकट्या देवतांकडून समुद्र मंथन शक्य नव्हते. त्यामुळे राक्षसांना सोबत घेऊन समुद्र मंथन करण्यात आले. देवातांना विष्णूंनी सांगितले की, समुद्रमंथनातून मिळणारे अमृत प्यायल्याने तुम्ही सर्व देव अमर व्हाल पण राक्षसांनी अमृत पिऊ नये, याची काळजी घ्या. जर राक्षसाने अमृत प्यायले तर ते सुद्धा अमर होतील. त्यावेळी देव आणि दानवांनी वासुकी नाग आणि मंदार पर्वताच्या मदतीने समुद्रमंथन केले. समुद्रमंथनातून 14 रत्ने, विष आणि अमृत मिळाले. त्यापैकी प्रथम विष आढळून आले. समुद्र मंथनातून निघालेले विष खूपच घातक होते. या विषामुळे सर्व जग नष्ट झाले असते. (Mahashivratri)

समुद्रमंथनातून हे घातक विष बाहेर आल्यावर देव आणि दानवांमध्ये गोंधळ उडाला की ते विष कोण घेणार? त्यावेळी महदेवांनी तिन्ही लोकांच्या रक्षणासाठी विष प्राशन केले. विष प्राशन केल्याने महादेवाच्या घशात जळजळ होऊ लागली. त्याचे शरीर तापू लागले. हे पाहून देवी-देवता व्याकुळ झाले. महादेवाला या वेदनेपासून आराम मिळावा म्हणून देवतांनी महादेवाला चंद्राला डोक्यावर धारण करण्याचा सल्ला दिला. चंद्र शीतलता देतो. म्हणून महादेवाने डोक्यावर चंद्र धारण केला, असे मानले जाते. (Todays Marathi Headline)
तर दुसऱ्या पौराणिक कथेनुसार, चंद्राच्या पत्नी २७ नक्षत्र कन्या आहेत. यापैकी रोहिणी त्याच्या सर्वात जवळची. चंद्र हा रोहिणीला सर्वात जास्त जीव लावतो म्हणून दु:खी झालेल्या चंद्रमाच्या इतर पत्नींनी वडील प्रजापती दक्ष यांच्याकडे चंद्रची तक्रार केली. तेव्हा प्रजापती दक्षाने चंद्राला कुष्ठरोगाचा शाप दिला. यामुळे चंद्राचे टप्पे कमकुवत होऊ लागले. चंद्राची ही दशा पाहून नारदजींनी चंद्राला महादेवाची उपासना करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, चंद्राने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्याने सुरु केली. (Top Marathi News)
चंद्राच्या या तपश्चर्येने महादेव प्रसन्न झाले. आणि महादेवाच्या कृपेने पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण रुपात प्रकट झाला आणि त्याला त्याच्या सर्व संकटांपासून मुक्ती मिळाली. सर्व संकटांपासून मुक्ती मिळल्याने चंद्राने महादेवाला विनंती केली की, त्यांनी आपल्याला त्यांच्या डोक्यावर धारण करावे. चंद्रची ही विनंती महादेवाने मान्य केली आणि तेव्हापासून महादेवांनी चंद्राला डोक्यावर धारण केले. (Latest Marathi Headline)
चंद्राला हिंदू धर्मात शांती, शीतलता आणि भावनिक स्थैर्याचं प्रतीक मानले जाते. तो दिवसाच्या तेजात विरघळूनही आपला सौम्य प्रकाश टिकवतो. हेच वैशिष्ट्य भगवान शिवांमध्ये दिसते. एका बाजूला रुद्र, तांडव करणारे देव आणि दुसऱ्या बाजूला ध्यानस्थ, शांततेत रमणारे योगी. चंद्र धारण करणं म्हणजे स्वतःच्या क्रोधावर विजय मिळवणं, अंतःकरणात शांती टिकवणं आणि जगात संतुलन राखण्याचे प्रतीक. म्हणूनच कपाळावरचा चंद्र म्हणजे केवळ आभूषण नाही, तर एक गूढ आणि प्रेरणादायी संदेश आहे. (Top Stories)
=======
Kalyana Sundareswarar Temple : रंग बदलणारे चमत्कारी शिवलिंग
Panakala Lakshmi Narasimha Swamy : चमत्कारी मंदिर
Gajanan Maharaj : संत श्री गजानन महाराजांशी संबंधित खास गोष्टी
=======
शिवाय चंद्र हा काळाचा सूचक मानला जातो. कॅलेंडर देखील चंद्राच्या वाढत्या आणि अस्ताच्या आधारावर बनवल्या जातात. शंकराच्या मस्तकावरील अर्धचंद्र हे दर्शवितो की, तो काळाच्या पलीकडे आहे. ते शाश्वत आणि अनंत आहेत, ज्यांच्यावर काळाचा काहीही परिणाम होत नाही. चंद्राचा थेट संबंध पाण्याशी आहे. ते समुद्राच्या लाटांवर नियंत्रण ठेवते आणि पाण्याचा घटक मानले जाते. त्याच वेळी, गंगा देखील भगवान शिवाच्या मस्तकावर विराजमान आहे, जी पाण्याचा सर्वात मोठा स्रोत आहे. म्हणूनच, शिवाच्या मस्तकावर अर्धचंद्र आणि गंगा एकत्र असणे हे दर्शवते की शिव निसर्गाच्या प्रत्येक घटकाशी जोडलेले आहेत. (Social News)
(टीप : ही माहिती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही किंवा अंधश्रद्धेला पाठिंबा देखील देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics