2 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा असून, या दिवशी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करण्यात येणार असून, आता सर्वत्र या उत्सवाची तयारी चालू आहे. हनुमान हे प्रभू श्रीरामाचे निस्सीम भक्त, वायूपुत्र आणि शक्तीचे प्रतीक मानले जातात. रामायणात हनुमानाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांना संकटमोचक मानले जाते, म्हणून कठीण काळात त्यांची प्रार्थना केली जाते. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. याच हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याकडे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती. मात्र देशातील अनेक ठिकाणी खासकरून दक्षिण भारतामध्ये कार्तिक महिन्यात हनुमान जयंती साजरी केली जाते. अर्थात एका वर्षात दोन हनुमान जयंती साजरी होतात. मग असे का? वर्षातून दोन हनुमान जयंती साजऱ्या करण्यामागचे कारण आज आपण या लेखातून जाणून घेऊया. (Hanuman Jayanti)
दरवर्षी हनुमान जयंती दोनदा साजरी केली जाते. प्रथम चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला आणि नंतर कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला. हनुमान जयंती चैत्र महिन्यात हनुमानजींची जयंती आणि कार्तिक महिन्यात विजय अभिनंदन म्हणून साजरी केली जाते. केरळ आणि तामिळनाडूमध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या अमावास्येला आणि ओरिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी हनुमान जयंती साजरी करण्याची परंपरा आहे. पहिली हनुमान जयंती ही हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र शुक्ल पौर्णिमेला म्हणजेच ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार मार्च किंवा एप्रिल दरम्यान आणि दुसरी हनुमान जयंती ही कार्तिक कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशी म्हणजेच सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान असतो. याशिवाय तामिळनाडू आणि केरळमध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या अमावास्येला आणि ओरिसात वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. (Marathi Trending News)
चैत्र महिन्यातील हनुमान जयंती
चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमानजींना नवीन जीवन प्राप्त झाले अशी पौराणिक कथा आहे. हनुमानजींकडे लहानपणापासूनच अलौकिक शक्ती होत्या. लहान असताना भूक लागली म्हणून त्यांनी तळपत्या सूर्यालाच फळ समजून गिळंकृत केले होते. त्यानंतर पृथ्वीवर अंधार पडला. हे इंद्र देवाला समजताच त्यांनी बाल हनुमानांवर आपल्या शास्त्राने वार केला. हनुमानजींचे पिता पवनदेवाला हे समजताच ते क्रोधित झाले आणि त्यांनी वायूप्रवाह थांबवला यामुळे पृथ्वीर अजारकता पसरली. हवेच्या अभावामुळे त्राही झाली. तेव्हा ब्रम्हदेवांना हस्तक्षेप करावा लागला. ब्रम्हदेवाने पवनदेवांना शांत केले व हनुमानजींना जीवित केले तो दिवस होता चैत्र महिन्यातील पौर्णिमेचा. यादिवशी हनुमानजींना पुनरुज्जीवन मिळाल्याने भक्त आपल्या आराध्याची जयंती या दिनी आनंदाने साजरी करतात. (Top Stories)
========
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीचे महत्त्व आणि पूजेचा विधी
Hanuman Jayanti : ‘या’ कारणामुळे भगवान रामाने चक्क प्रिय हनुमानाला सुनावलं होता मृत्यूदंड
========
कार्तिक महिन्यातील हनुमान जयंती
कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला स्वाती नक्षत्रात मंगळवारी हनुमानजींचा जन्म झाला त्यामुळे हा दिवस हनुमान जयंती म्हणून सगळीकडे साजरा करण्यात येतो. हनुमानजी रामभक्त आहेत हे आपण जाणतो. आजही ते पृथ्वीतलावर वास करतात असे मानले जाते. त्यामुळे हनुमानजींना प्रसन्न करणे फार सोपे आहे. मात्र त्यासाठी पवित्र मनाने भक्ती करावी लागते. हनुमानजी तुमच्या हाकेला नक्की धावून येतात. भक्तांना संकटातून वाचवण्याचे काम हनुमानजी करतात म्हणून तर त्यांना संकटमोचन असे म्हणतात. हनुमानजींची जयंती भक्त मोठ्या उत्साहात साजरी करतात. (Social News)
( टीप : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. आम्ही या माहितीची कोणतीही पुष्टी करत नाही. आमचा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- Chaitra Purnima Hanuman Jayanti
- Hanuman Jayanti
- Hanuman Jayanti 2026
- Hanuman Jayanti celebration
- Hanuman Jayanti celebration twice in year
- Hanuman Jayanti festival
- Hanuman Jayanti significance
- kartik Hanuman Jayanti
- कार्तिक हनुमान जयंती
- चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती
- दोन हनुमान जयंती
- श्रीराम
- हनुमान जयंती
- हनुमान जयंती 2026
- हिंदू
- हिंदू सण