अमेरिका-इराण युद्धाला आता २६ दिवस होऊन गेले आहेत. इकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराणचा अस्त होत आल्याचे सांगत असले, तरी इराण ज्या ताकदीने अमेरिकेला उत्तर देत आहे, त्यावरून अद्यापही इराणची स्थिती मजबूत असल्याचे स्पष्ट होत आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबत मध्यपूर्वेतील देशांनाही हैराण करणाऱ्या इराणच्या या युद्धनितीची आणि त्यामागील शस्त्रास्त्रांची आता जगभर चर्चा होत आहे. या सर्वांमागे इराणमधील भक्कम अभियांत्रिकी फळी आहे. कारण इराणमधील अभियांत्रिकी विद्यापीठे जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यातील तेहरानचे शरीफ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी हे तर ‘मध्यपूर्वेचे एमआयटी’ म्हणून ओळखले जाते. येथे प्रवेश मिळवणे अत्यंत कठीण असून केवळ १% सर्वोत्तम विद्यार्थ्यांनाच येथे प्रवेश मिळतो. याव्यतिरिक्त इराणमध्ये सर्वोत्तम अशी ३०० हून अधिक महाविद्यालये आहेत. या सर्वांत फार कमी लोकांना इराणच्या कोंकूर नावाच्या प्रवेश परीक्षेबाबत माहिती आहे. इराणमध्ये विद्यापीठ प्रवेशासाठी ‘कोंकूर’ ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. त्यामुळेच इराणचा शिक्षणाचा स्तर उंचावला आहे. विशेषतः अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये इराणचा दबदबा आहे. येथे मध्यपूर्वेसह भारत आणि अन्य देशांतूनही अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. ( Iran’s Universities )

इराण गेल्या २६ दिवसांपासून महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेसमोर ठामपणे उभा आहे. अमेरिका आणि इस्रायल या देशांनी इराणमध्ये सत्तांतर करण्यासाठी जे युद्ध सुरू केले, ते युद्ध इराणच्या हातात गेल्यासारखे आहे. अमेरिकेची या युद्धातून माघार घ्यायची तयारी सुरू असली, तरी इराणने आता अमेरिकेवरच काही अटी लादण्याचे संकेत दिले आहेत. या सर्वांत इराणच्या क्षेपणास्त्रांनी जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. इराणमधील क्षेपणास्त्रांची क्षमता पाहून अमेरिकेलाही चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे इराणने ही शस्त्रे आणि त्यांची युद्धनीती कशा पद्धतीने तयार केली, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातूनच इराणच्या शिक्षणपद्धतीबाबत माहिती मिळाली. इराणमध्ये धर्मगुरूंचे स्थान सर्वोच्च असले, तरी येथील शिक्षणपद्धती अत्यंत आधुनिक आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास ‘कोंकूर’ ही परीक्षा द्यावी लागते, जी भारतातील जेईई परीक्षेपेक्षाही अधिक कठीण असल्याची माहिती आहे. तसाच दर्जा तेथील महाविद्यालयांचाही आहे. त्यामुळे या संस्थांमधून तयार झालेले विद्यार्थी आपल्या देशाच्या सेवेसाठी विविध विभागात भरती होतात, आणि त्यांच्याच जोरावर इराण हा अमेरिकेसारख्या महासत्तेला खंबीरपणे तोंड देत आहे.
अभियांत्रिकी क्षेत्रात इराणचे विशेष स्थान आहे. सिव्हिल, मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर शाखेतील येथील महाविद्यालये जगभरातील निवडक महाविद्यालयांच्या यादीमध्ये आहेत. तेहरानच्या शरीफ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीला ‘मध्यपूर्वेचे एमआयटी’ म्हटले जाते. या विद्यापीठाची प्रवेश परीक्षा जेईईपेक्षाही कठीण आहे. शरीफ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना १९६६ मध्ये झाली. संगणक क्षेत्रात हे विद्यापीठ सर्वोच्च मानले जाते. इराणवर गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय निर्बंध असल्यामुळे तिथे तंत्रज्ञानासाठी अन्य देशांची मदत घेता येत नाही. अशा परिस्थितीत इराणी अभियांत्रिकी महाविद्यालयांतून अनेक शास्त्रज्ञ आणि अभियंते तयार झाले आहेत. त्यांनी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून आज इराणला ड्रोन तंत्रज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि वैद्यकीय संशोधनात अग्रेसर केले आहे. याशिवाय इराणमधील अल मुस्तफा आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून भाषा शिक्षणावर विशेष भर दिला जातो. येथे फारसी भाषेतील अनमोल पुस्तके उपलब्ध आहेत. शिवाय इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चीनी, कोरियन आणि जपानी भाषाही येथे शिकवल्या जातात. ( Iran’s Universities )
=======
हे देखील वाचा : Strait of Hormuz : अवाढव्य मालवाहू जहाजांची जादुई दुनिया
=======
या सर्वांत इराणच्या विद्यापीठ प्रवेश परीक्षेचीही मोठी भूमिका आहे. ‘कोंकूर’ नावाची ही प्रवेश परीक्षा जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. इराणमध्ये दरवर्षी अंदाजे १० ते १२ लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. साधारण १०० पैकी केवळ एक किंवा दोन विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होतात. संपूर्ण इराणमध्ये ही परीक्षा देशभरात एकाच दिवशी घेतली जाते. यातील गुणांवरूनच विद्यार्थी कोणत्या विद्यापीठात प्रवेश मिळवणार हे निश्चित होते. कोंकूर परीक्षेमध्ये गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, साहित्य, धर्म आणि तत्त्वज्ञान तसेच परदेशी भाषा यांचा समावेश असतो. इराणमधील अनेक विद्यार्थी कोंकूरच्या तयारीसाठी विशेष कोचिंग संस्थांमध्ये जातात. त्यामुळे इराणमध्ये कोचिंग क्लासेसची संख्याही वाढली आहे. इराणी शाळांपासूनच या परीक्षेची तयारी सुरू होते. या सर्वांतून तयार झालेले विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतात. तेथेही त्यांना तंत्रज्ञानामध्ये प्रॅक्टिकलचा भाग अधिक दिला जातो. त्यातूनच इराणमध्ये ड्रोन निर्मिती सर्वाधिक होऊ लागली आहे. ( Iran’s Universities )
— सई बने
- Al-Mustafa International University
- biotechnology Iran
- competitive university admissions.
- drone technology Iran
- engineering excellence Iran
- global academic reputation Iran
- higher education in Iran
- indigenous technology development
- international sanctions and innovation
- Iran engineering universities
- Iran–US geopolitical tensions
- Iranian education system
- Iranian missile technology
- Iranian scientists and engineers
- Konkur entrance exam
- medical research Iran
- Middle East education hub
- MIT of the Middle East
- multilingual education Iran
- nanotechnology Iran
- science and technology advancement
- Sharif University of Technology
- STEM education Iran
- technical universities Iran
- toughest exams in the world