येत्या 2 एप्रिलला हनुमान जयंतीच्या उत्सव साजरा होणार आहे. केसरी आणि अंजनीपुत्र असलेले हनुमान हे शिवाचा अकरावा अवतार मानले जातात. ते बुद्धी, शक्ती आणि अखंड रामभक्तीचे प्रतीक असून, त्यांना मारुती, पवनपुत्र, अंजनेय, बजरंगबली अशा अनेक नावाने ओळखले जाते. हनुमान हे निस्सीम रामभक्त होते. त्यांच्या रामभक्तीच्या अनेक कथा, आख्ययिका आजवर आपण ऐकल्या आहेत, मात्र आज आम्ही तुम्हाला हनुमान आणि श्रीराम यांच्याशी संबंधित एक अतिशय वेगळीच आख्ययिका सांगणार आहोत. प्रभू श्रीरामाचे श्रेष्ठ भक्त म्हणून हनुमान प्रसिद्ध आहे. शिवाय श्रीराम देखील हनुमानाशिवाय अपूर्ण होते, किंबहुना श्रीराम आणि हनुमान हे एकमेकांशिवाय अपूर्णच आहेत. असे असले तरी एकदा चक्क श्रीरामांनी हनुमानांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. काय आहे ही कथा पाहूया. (Hanuman Jayanti)
एका पौराणिक कथेनुसार, लंका जिंकून श्रीराम अयोध्येचे राजा झाले, तेव्हा दरबारात एक सभा भरली होती. सभेत सर्व देव-गुरु उपस्थित होते. देव ऋषी नारद, वशिष्ठ विश्वामित्र यांसारखे थोर विद्वान ही चर्चा करण्यासाठी एकत्रित जमले होते की श्री भगवान रामाच्या अस्तित्वापेक्षा रामाचे नाव मोठे आहे? या सभेत संकट मोचन हनुमानही उपस्थित होते. पण, ते काही बोलत नव्हते. ते मूक अवस्थेत संपूर्ण चर्चा शांतपणे लक्षपूर्वक ऐकत होते. नारदांचे मत होते की स्वत: भगवान रामापेक्षा राम हे नाव मोठे आहे आणि ते सिद्ध करण्याचा दावा त्यांनी केला. आता चर्चा संपली होती, सर्व संतांच्या परत जाण्याची वेळ आली होती. तेव्हा नारदाने हनुमानाला विश्वामित्र सोडून इतर ऋषीमुनींचे छुप्यापद्धतीने स्वागत करण्यास सांगितले. युक्तिवाद असा होता की विश्वामित्र हे एक राजा होते. (Marathi)

हनुमानाने प्रत्येकाचे एक एक करुन अभिवादन केले. पण नारदांनी सांगितल्याप्रमाणे विश्वामित्र यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. आपला आपमान झालेला पाहून विश्वामित्र रागावले. तेव्हा विश्वामित्रांनी रामभक्त हनुमानाच्या या चुकीबद्दल त्याला मृत्यूदंड देण्याचे वचन दिले. भगवान राम हनुमानावर खूप प्रेम करीत होते पण विश्वामित्र हे त्यांचे गुरुही होते. रामाने हनुमानाला मृत्यूदंड देण्याचे ठरविले. जेणेकरुन गुरुचा आदेशचं पालन व्हावं. श्री राम त्यांची हत्या करायला येत आहेत हे जेव्हा हनुमानाला समजले, तेव्हा हे का घडले हे त्यांना समजू शकले नाही. मग ऋषी नारदांनी त्यांना राम नावाचा जप करत राहण्याचा सल्ला दिला. हनुमान एका झाडाखाली बसून जय श्री रामचा जप करु लागली. (Latest Marathi Headline)
=========
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीचे महत्त्व आणि पूजेचा विधी
=========
यानंतर श्रीरामांनी विश्वामित्र ऋषींची आज्ञा मानून हनुमानजींना मृत्युदंड देण्याचा निर्णय घेतला. हनुमानजींनी नारद मुनींना यावर उपाय विचारला. तेव्हा नारद मुनी म्हणाले की तू राम नामाचा जप कर. हनुमानजींनी हे केले. श्रीरामांनी हनुमानाकडे धनुष्य बाण दाखवले. पण, श्रीरामाच्या बाणांचा हनुमानावर काहीही परिणाम झाला नाही. श्रीरामांनी ब्रह्मास्त्र हे ब्रह्मांडातील सर्वात शक्तिशाली शस्त्र वापरले, परंतु त्याचाही हनुमानावर काहीही परिणाम झाला नाही. दरम्यान, नारद मुनींनी ऋषी विश्वामित्रांना हनुमानजींना क्षमा करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी हनुमानजींना क्षमा केली. यानंतर विश्वामित्रांनी रामाला त्यांच्या वचनातून मुक्त केले आणि देव ऋषी नारदांनी हे सिद्ध केले की स्वत: रामापेक्षा राम नाव हे अधिक शक्तिशाली आहे. (Social News)
( टीप : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. आम्ही या माहितीची कोणतीही पुष्टी करत नाही. आमचा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics