Home लाईफ स्टाईल Hanuman Jayanti : हनुमानाला शेंदूर का अर्पण करतात?
लाईफ स्टाईल

Hanuman Jayanti : हनुमानाला शेंदूर का अर्पण करतात?

13

प्रभू श्रीरामांचे श्रेष्ठ भक्त म्हणून कायमच हनुमानाचे नाव घेतले जाते. हनुमानाने त्यांच्या भक्तीने निस्सीम भक्त म्हणून स्वतःचे नाव अजरामर केले आहे. सात चिरंजीवींमध्ये देखील स्थान असलेले हनुमान कायमच आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे. आपण सर्वच हनुमानाचे भक्त आहोत. अशा या शक्तीची आणि बुद्धीची देवता असलेल्या हनुमानाचा जन्मोत्सव हा दरवर्षी चैत्र पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा चैत्र पौर्णिमा येत्या 2 एप्रिलला येत असल्याने याच दिवशी मारुतीरायाचा जन्मदिन साजरा होत आहे. याच निमित्ताने आपण त्यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया. आपण हनुमान मंदिरांमध्ये कायम त्यांची मूर्ती ही शेंदूराने माखलेली असते. मारुतीरायांना शेंदूर का लावला जातो, याचे कारण तुम्हाला माहिती आहे का? आज आपण याचीच माहिती जाणून घेऊया. (Hanuman Jayanti)

हनुमानाला शेंदूर वाहण्यामागे रामायणातील एक प्रसंग कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. एकदा सीता देवी साजश्रुंगार करत होत्या. त्याचवेळेस हनुमान तिथे पोहोचले. सीता मातेला नमस्कार केला. सीता मातेची सात्विकता हनुमंतांना अतिशय भावली. साजश्रुंगार झाल्यावर सीताने भांगेमध्ये शेंदूराची लकीर ओढली. ते पाहून हनुमंताने कुतुहलाने विचारले, माते, हा सुद्धा तुमच्या श्रुंगाराचा एक भाग आहे का?, त्यावर हसून सीता माता म्हणाली की, हनुमंता, बाकीचे अलंकार नसले तरी चालतील, परंतु हा सर्वात महत्त्वाचा सौभाग्यलंकार आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी भांगात शेंदूराची रेघ ओढतात. (Marathi)

Hanuman Jayanti

सीता मातेने दिलेल्या उत्तरावर प्रतिक्रिया देत हनुमान म्हणाले की, पतीला दीर्घायुष्य, म्हणजे प्रभू श्रीरामांना दीर्घायुष्य! पती म्हणजे पालन करणारा. म्हणजेच ते माझ्यासह या साऱ्या विश्वाचे पती आहेत. मग तुमच्यासारखेच प्रत्येकाने भांगात शेंदूर लावले पाहिजे. मात्र, केवळ एक रेघ का? माझ्या रामरायाचे नाव अजरामर व्हावे, त्यांचे अस्तित्त्व कायम राहावे, म्हणून मी शेंदूराची पूर्ण वाटीच अंगाला चोपडून घेतो. (Marathi Latest Headline)

हनुमान नुसते सांगून थांबले नाहीत, तर क्षणार्धात सर्वांगाल सिंदुरलेपन करून घेतले. हनुमानांची भाबडी व वेडी रामभक्ती तसेच अलोट रामप्रेम पाहून सीता माता आणि प्रभू श्रीरामचंद्रांना भरून आले. तेव्हापासून हनुमंताला शेंदूर अर्पण करायची प्रथाच सुरू झाली, ती आजतागायत सुरू असल्याचे आपल्याला दिसून येते. मारुतीला उडीद, तेल, शेंदुर, रुईच्या पान-फुलांचा हार आवडतो. या सर्व गोष्टी आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. बल, शक्तीवर्धक आहेत. प्रत्येक रंगात विशेष प्रकाराची ऊर्जा असते. हनुमानाला शेंदूर अर्पण केल्यावर भक्त याचा तिलक करतात, तेव्हा दोन्ही डोळ्यांमध्ये असलेले ऊर्जाकेंद्र सक्रिय होते. असे केल्याने मनात चांगले विचार येतात आणि सोबतच ऊर्जा प्राप्त होते. हनुमानाला तूप मिश्रित शेंदूर चढवल्याने अडथळे दूर होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. (Top Stories)

==========

Hanuman : रावणाविरुद्ध युद्ध जिंकल्यानंतर रामाची वानरसेना गेली तरी कुठे?

==========

विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी हनुमाना शेंदूर लावतात. यामुळे संकटं दूर होतात आणि शक्ती मिळते, असे मानले जाते. हनुमानाने प्रभू रामावरील अपार प्रेम आणि भक्ती दाखवण्यासाठी संपूर्ण शरीरावरती शेंदूर लावला म्हणून आजही त्यांना शेंदूर अर्पण करण्याची परंपरा आहे. हनुमानाची ही अतूट भक्ती पाहून श्रीराम अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी हनुमानाला आशीर्वाद दिला की, जो कोणी तुला शेंदूर अर्पण करेल, त्याच्या जीवनातील संकटे दूर होतील आणि त्याला बल, बुद्धी आणि यश प्राप्त होईल. ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रहाचा रंग लाल/केशरी आहे. हनुमानाला शेंदूर अर्पण केल्याने मंगळ दोष आणि शनीच्या बाधेपासून मुक्ती मिळते अशीही मान्यता आहे. (Social News)

( टीप : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. आम्ही या माहितीची कोणतीही पुष्टी करत नाही. आमचा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!