Home आंतरराष्ट्रीय Iran–US–Israel Conflict : रझा पहलवी ऐवजी अमेरिका कुर्दिश गटासोबत
आंतरराष्ट्रीय

Iran–US–Israel Conflict : रझा पहलवी ऐवजी अमेरिका कुर्दिश गटासोबत

71

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू होऊन सहा दिवस झाले आहेत. हे युद्ध आणखी किती दिवस सुरू राहणार, याबाबत अनेक तज्ञ अंदाज व्यक्त करत आहेत. युद्धामुळे संपूर्ण मध्यपूर्व क्षेपणास्त्रांच्या माऱ्यांनी होरपळत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी पाच आठवडे युद्ध चालणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे इराण अद्यापही हार मानण्याच्या मनस्थितीत नाही. ( Iran–US–Israel Conflict )

या सर्वांत एक मुद्दा चर्चिला जात आहे, तो म्हणजे इराणमध्ये सत्तांतर करणे हेच अमेरिकेचे अंतिम ध्येय आहे. इराणमध्ये आपल्या मर्जीतील अध्यक्ष विराजमान करून अमेरिका तेथील कारभार हाकण्याच्या विचारात आहे. पण यासाठी अमेरिकेला अपेक्षित असे नेतृत्व अद्यापही मिळालेले नाही. इराणमध्ये सत्ता बदल झाल्यास तेथे अध्यक्ष कोण, या चर्चेत इराणचे शेवटचे शाह मोहम्मद रझा पहलवी यांचे ज्येष्ठ पुत्र रझा पहलवी यांचे नाव सर्वप्रथम पुढे आले होते. सध्या वॉशिंग्टन डी.सी.च्या उपनगरात अमेरिकेत राहणारे रझा पहलवी हे इराणमधील राजवट बदलासाठी सक्रिय असून मानवी हक्क आणि लोकशाहीचे समर्थक आहेत.

मात्र पहलवी राजघराण्याने सत्तेत असताना जनतेवर केलेल्या अत्याचारांच्या कथा अत्यंत भयानक आहेत. इराणचे शाह मोहम्मद रझा पहलवी यांनी आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी विशिष्ट दल स्थापन केले होते. या दलातील क्रूर सैनिकांनी पहलवी राजसत्तेला आणि त्यांच्या उधळपट्टीला विरोध करणाऱ्यांचे डोळे फोडल्याच्या कथा आजही इराणमध्ये सांगितल्या जातात. अशा परिस्थितीत त्यांचा मुलगा रझा पहलवी यांना सत्तेत बसवल्यास इराणमधील जनतेची प्रतिक्रिया कशी असेल, याबाबत अमेरिकेच्या मनात साशंकता आहे. त्यामुळेच आता अमेरिकन सरकारने इराणमधील सत्ता बदलासाठी कुर्दिश गटांना आपलेसे करण्यास सुरुवात केली आहे. यातून पुढील काही आठवड्यांत इराणमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू होऊन सत्ता बदल होईल, असा अंदाज डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. ( Iran–US–Israel Conflict )

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा शेवट कधी होईल, हे अद्याप सांगणे कठीण आहे. या सर्वांत इराणमध्ये सत्ताबदल करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. या प्रक्रियेत सर्वप्रथम नाव पुढे आले ते इराणच्या शेवटच्या शाहचे पुत्र रझा पहलवी यांचे. १९७९ च्या क्रांतीनंतर स्थापन झालेल्या इस्लामिक राजवटीची जागा धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही सरकारने घ्यावी, आणि इराणमध्ये पुन्हा सत्तेवर यावे, अशी रझा पहलवी यांची इच्छा आहे. धार्मिक हुकूमशाही संपवून कायद्याचे राज्य आणि लोकशाही व्यवस्था स्थापित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. इराणचे पुन्हा पाश्चात्य मूल्यांसह आधुनिक आणि प्रगतिशील राष्ट्रात रूपांतर करण्याचे स्वप्न ते पाहत आहेत. पहलवी यांचा विश्वास आहे की, राजवट बदलल्यास इराणची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि इराणला जगभरातील प्रगत राष्ट्रांमध्ये स्थान मिळेल. मात्र हे स्वप्न पाहताना रझा पहलवी यांनी आपल्या राजघराण्याच्या काळ्या इतिहासाकडे डोळेझाक केली आहे.

इराणचे शाह मोहम्मद रझा पहलवी यांनी सत्तेवरील पकड मजबूत करण्यासाठी ‘सावक’ (SAVAK) नावाची क्रूर आणि शक्तिशाली गुप्तचर यंत्रणा उभारली होती. १९५७ मध्ये CIA आणि Mossad यांच्या मदतीने स्थापन झालेली ही यंत्रणा शाह पहलवी यांच्या विरोधातील प्रत्येक आवाज दडपून टाकत होती. सावकमधील गुप्त पोलीस राजकीय विरोधकांना अटक करत असत. त्यांना तुरुंगात टाकण्यापासून ते त्यांच्या कुटुंबियांवरही क्रूर अत्याचार करण्यात येत. त्यामुळे शाह पहलवी यांच्या काळात सावकची मोठी दहशत इराणमध्ये होती. विशेष म्हणजे अमेरिकन गुप्तचर संस्था CIA ने सावकच्या गुप्त पोलिसांना प्रशिक्षण दिले होते. सावकच्या या गुप्त पोलिसांनी हजारो इराणी नागरिकांचे डोळे काढले, तर अनेकांना अधू केले. सावकच्या अत्याचारांमुळे किती इराणी नागरिक मृत्यूमुखी पडले, याची नोंदही उपलब्ध नाही. सावकच्या क्रूरतेमुळे इराणी जनतेमध्ये व्यापक संताप निर्माण झाला आणि त्यातूनच १९७९ च्या इस्लामिक क्रांतीला खतपाणी मिळाले, ज्यामुळे शाहच्या राजवटीचा पाडाव झाला. ( Iran–US–Israel Conflict )

या सर्व इतिहासाची अमेरिकेला जाणीव असल्यामुळे शाह पहलवी यांच्या वारसांकडे पुन्हा इराणची सत्ता देण्यासाठी अमेरिका टाळाटाळ करत आहे. त्यामुळे त्यांनी कुर्दिश गटांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

=======

हे देखील वाचा : Global Internet Infrastructure : इराण आता इंटरनेटवर घाला घालणार

=======

कुर्दिश गटांना इस्लामिक स्टेट (ISIS) विरुद्ध लढण्याचा अनुभव आहे. इराणमधील कुर्दांना सध्याच्या इस्लामिक रिपब्लिक आणि त्यापूर्वीच्या राजेशाहीविरुद्ध लढ्याचा इतिहास आहे. उत्तर इराकमध्ये असलेले कुर्दिश इराणी बंडखोर गट इराणमध्ये सीमापार लष्करी कारवाईची तयारी करत आहेत. अमेरिकेने या इराकी कुर्दांना पाठिंबा देण्याची विनंती केल्याची माहिती आहे. अशाच कुर्दिश गटांमधून सध्या हजारो प्रशिक्षित सैनिक इराणी सैन्याविरोधात लढत आहेत. ( Iran–US–Israel Conflict )

अमेरिकेला इराणमध्ये सैन्य उतरवावे लागल्यास, ती या कुर्दिश सैनिकांच्या अनुभवाचा फायदा घेणार आहे. कुर्दिश गटांनी अमेरिकेला साथ दिल्यास, त्यांच्यामधून एखाद्या नेत्याची निवड करून इराणच्या सत्तेसाठी पुढे करण्याचीही शक्यता आहे. अर्थात, पुढील काही दिवसांत इराणकडून होत असलेल्या क्षेपणास्त्र माऱ्याला अमेरिका कशाप्रकारे थोपवते, यावरच हे सत्तेचे गणित अवलंबून राहणार आहे.

— सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!