इराणबरोबरच्या युद्धामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जगाचे लक्ष एपस्टाईन फाईलवरून दूर करण्यास यशस्वी ठरले असले तरी, या फाईलसंदर्भात तपास सुरू आहे. जेफ्री एपस्टाईन या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे कुख्यात झालेल्या गुन्हेगाराने जगभरातील राजकारणी, शास्त्रज्ञ आणि सेलिब्रिटी यांचे एक मोठे जाळे विणले होते. या जाळ्यात अडकलेल्यांना तेव्हा आपण काय करत आहोत, याची जाणीव नव्हती. मात्र आता जेफ्रीच्या या काळ्या फाईली उघड होताच या सर्वच मान्यवरांच्या चेहऱ्यावरील बुरखा फाटला आहे. यातच एक नाव आहे ते मेटे-मारिट हिचे. मेटे-मारिट ही नॉर्वेची राजकुमारी आहे. ही राजकुमारीही जेफ्री एपस्टाईनच्या जाळ्यात होती आणि त्याच्या बेटावर तिचा कायम मुक्काम असायचा. मात्र एपस्टाईन फाईल उघड झाल्यानंतर संपूर्ण नॉर्वेमध्ये राजकुमारीच्या या वर्तनाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. लोकांचा रोष एवढा होता की, राजघराण्याला माफी मागावी लागली. खुद्द मेटे-मारिट यांनीही लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनसोबतच्या मैत्रीबद्दल नागरिकांची माफी मागितली. त्यानंतर मेटे-मारिट बराच काळ सोशल मीडियापासून दूर राहिली. राजकुमारीला या सर्वांचा जबर मानसिक धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली. तसेच एपस्टाईन फाईलनंतर राजघराण्यातही मतभेद निर्माण झाल्याची माहिती पुढे आली. एपस्टाईनसारख्या गुन्हेगारासोबत नॉर्वे राजघराण्याचे नाव जोडण्यात आले, यासाठी मेटे-मारिटला दोषी मानण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर मेटे-मारिटने आपली भूमिका एका मुलाखतीद्वारे जनतेसमोर मांडली आहे. जेफ्री एपस्टाईन प्रकरणात आपण कसे ओढले गेलो, हे सांगताना या राजकुमारीला अनेक वेळा अश्रू अनावर झाले. ( Norwegian Crown Princess Mette-Marit )

जगातील सर्वात कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईन याचा मृत्यू झाला असला तरी त्याने केलेल्या काळ्याकृत्यांचा पूर्ण उलगडा अद्याप झालेला नाही. त्याच्या मृत्यूनंतरही या प्रकरणात त्याच्या भागीदारांची संख्या मोठी असल्याचे मानले जाते. यामध्ये नॉर्वेची राजकुमारी मेटे-मारिट हिचेही नाव चर्चेत आले. राजकुमारीचे नाव एपस्टाईनशी जोडले गेले, ही बातमी नॉर्वेमध्ये समोर आल्यानंतर तिथे एकच खळबळ उडाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून राजघराण्यावर टीका करण्यात आली. यामुळे पहिल्यांदाच राजघराण्याने जनतेची माफी मागितली.
या सर्वांनंतर तब्बल सात-आठ आठवड्यांनी राजकुमारी मेटे-मारिट यांनी नॉर्वेच्या राष्ट्रीय दूरदर्शन वाहिनीवरील एका मुलाखतीत याबाबत भाष्य केले. या मुलाखतीमध्ये राजकुमारी मेटे-मारिट यांनी जेफ्री एपस्टाईनसोबतचे त्यांचे संबंध, २०११ ते २०१४ दरम्यान त्याला पाठवलेले शेकडो ई-मेल्स आणि फ्लोरिडा येथील त्याच्या घरात त्या कशाप्रकारे राहत होत्या, याबाबत माहिती दिली. जेफ्री एपस्टाईनच्या संदर्भातील काही घटना सांगताना राजकुमारीला अनेकवेळा रडूही आले. या संपूर्ण मुलाखतीत राजकुमारी मेटे-मारिट यांनी आपण या जाळ्यात ओढले गेलो असल्याचे सांगितले. मात्र जेफ्री एपस्टाईनने त्यांच्या १५ वर्षीय मुलगा मारियस बोर्ग होइबी याला ‘वॉलपेपर’ म्हणून नग्न महिलांची छायाचित्रे का पाठवली, याचे योग्य उत्तर त्या देऊ शकल्या नाहीत. ( Norwegian Crown Princess Mette-Marit )
नॉर्वेच्या सार्वजनिक प्रसारक एनआरकेला दिलेल्या २० मिनिटांच्या मुलाखतीत राजकुमारीने अनेक वेळा, “माझी खूप फसवणूक झाली होती, आणि जेव्हा तुमच्यासोबत असे घडते, तेव्हा सुरुवातीला तुम्हाला ते कळतही नाही,” असे सांगून स्वतःचा यात काहीही दोष नसल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. या मुलाखतीदरम्यान ५२ वर्षीय राजकुमारी मेटे-मारिट यांच्यासोबत त्यांचे पती युवराज हाकॉनही उपस्थित होते. राजकुमारीने या मुलाखतीत एपस्टाईन प्रकरणात ज्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले आहेत, त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त करत त्यांना न्याय मिळायला हवा, असे मत व्यक्त केले.
अर्थात, नॉर्वेमध्ये या मुलाखतीमुळे राजकुमारी मेटे-मारिट यांच्याबाबत फारसा सकारात्मक बदल झालेला नाही. कारण राजकुमारीचा मुलगा मारियस बोर्ग होइबी सध्या बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत आहे. मारियसवरील बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाला, तर त्याला कठोर शिक्षा होऊ शकते. मारियसबाबतही सध्या नॉर्वेमधील जनमत विरोधात आहे. राजकुमारी मेटे-मारिट यांनी ही मुलाखत दिली, तेव्हा त्यांच्या मुलावरील बलात्काराच्या खटल्याचा अंतिम दिवस होता. त्यामुळेच त्याच्याप्रती सहानुभूती मिळावी म्हणून राजकुमारीची ही धडपड असल्याची टीका करण्यात आली. ( Norwegian Crown Princess Mette-Marit )
=======
हे देखील वाचा : Iran–US–Israel Conflict : रझा पहलवी ऐवजी अमेरिका कुर्दिश गटासोबत
=======
या सर्व पार्श्वभूमीवर राजकुमारी मेटे-मारिट यांच्या राणी बनण्याच्या क्षमतेवरही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. राजकुमारी मेटे-मारिट या पल्मोनरी फायब्रोसिस या गंभीर आणि असाध्य फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यातच जेफ्री एपस्टाईनसोबतच्या संबंधांमुळे त्यांच्या प्रतिमेलाही मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच आता राजकुमारीला वाचवण्यासाठी स्वतः युवराज हाकॉन मैदानात उतरले आहेत. ( Norwegian Crown Princess Mette-Marit )
— सई बने
- Crown Princess Mette-Marit
- Epstein associates
- Epstein connections
- Epstein files
- Epstein investigation
- Epstein network
- global elite scandal
- Jeffrey Epstein scandal
- Marius Borg Høiby case
- media and royal scandal
- Mette-Marit interview
- monarchy and controversy
- Norway national broadcaster NRK
- Norway public outrage
- Norwegian monarchy crisis
- Norwegian royal family controversy
- NRK interview
- Prince Haakon
- public scrutiny Norway
- reputation crisis.
- royal accountability
- royal apology
- royal family reputation
- royal scandal Europe
- sexual abuse allegations