हनुमान जयंतीचे महत्त्व मोठे आहे. हा दिवस भगवान हनुमानाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. हा दिवस रामनवमी नंतर आठच दिवसात येतो. रामनवमीला प्रभू श्री रामाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. हिंदू श्रद्धेनुसार, भगवान हनुमानाला शंकराचे अवतार मानले जाते. शक्ती आणि भक्तीचे प्रतीक म्हणून हनुमानाची ओळख आहे. श्रीराम यांचे सर्वात श्रेष्ठ भक्त म्हणून हनुमान कायम ओळखले जातात. शिवाय सात चिरंजीवांमध्ये देखील हनुमानाचे स्थान आहे. अशा या हनुमानाचा जन्मोत्सव म्हणजे भक्तीची पर्वणीच आहे. भारतात हनुमानाचा जन्मदिन मोठ्या उत्साहाने साजरा होतो.(Hanuman Jayanti)
यंदा हनुमान जयंतीचा पवित्र सण गुरुवार, २ एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. पंचांगानुसार, पौर्णिमेची सुरुवात 1 एप्रिल रोजी सकाळी 07.06 वाजता होत आहे आणि 2 एप्रिल रोजी सकाळी 07.41 वाजता संपणार आहे. उदय तिथीनुसार चैत्र पौर्णिमा गुरुवार, 2 एप्रिल रोजी आहे त्यामुळे हनुमान जयंती देखील गुरुवार, 2 एप्रिल रोजी असणार आहे. हनुमान जयंती ‘हनुमंतोत्सव’ म्हणूनही ओळखली जाते. (Marathi)
पौराणिक कथेनुसार, हनुमानाचा जन्म पहाटे झाला होता. २ एप्रिल रोजी हनुमान जयंतीसाठी सकाळची शुभ वेळ ६:१० ते ७:४४ ही वेळ शुभ मानली जाते. जे लोक काही कारणास्तव हनुमान जयंती पूजा करू शकत नाहीत, ते सायंकाळी पूजा करू शकतात. त्यासाठी सायंकाळी मुहूर्त ६:३९ ते रात्री ८:०६ च्या दरम्यान हनुमानजींची पूजा करावी. हा अमृत-सर्वोत्तम मुहूर्त (सर्वात शुभ वेळ) आहे. त्यानंतर, रात्री ८:०६ ते ९:३२ पर्यंत चार-सामान्य मुहूर्त (सर्वात शुभ वेळ) आहेत. (Shriram)
हनुमान जयंतीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे ४:३८ ते ५:२४ पर्यंत असतो. अभिजीत मुहूर्त दुपारी १२:०० ते १२:५० पर्यंत असतो. या वर्षी हनुमान जयंती ध्रुव योग आणि हस्त नक्षत्रांतर्गत साजरी केली जाईल. ध्रुव योग पहाटेपासून दुपारी २:२० पर्यंत चालेल त्यानंतर व्याघात योग होईल. त्या दिवशी, सकाळपासून सायंकाळी ५:३८ पर्यंत हस्त नक्षत्र प्रभावात असते. त्यानंतर चित्रा नक्षत्र येते. ध्रुव योग हा एक शुभ योग असून, कोणत्याही स्थिर कामासाठी तो योग्य आहे. (Hanuman)

हनुमान जयंतीच्या दिवशी प्रातःकाळी उठून स्नान करावं. हनुमानाच्या प्रतिमेसमोर उपवासाचा संकल्प करा. या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करण्याला प्राधान्य दिले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून हनुमानाला अर्पण करावा. चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा. प्रसाद म्हणून गुळ आणि हरभरा ठेवावा. हनुमानाला बुंदीचे लाडू देखील आवडत असल्याने ते देखील प्रसाद म्हणून ठेवता येतात. यानंतर ७ वेळा हनुमान चालिसा पठण करावे. नंतर शेवटी आरती करावी. या दिवशी दान करण्याला खूपच महत्व आहे. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार जमेल ते गरजूंना दान करावे. अनेक ठिकाणी या दिवशी घरी रामायण पठण देखील केले जाते. (Top Marathi News)
मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुम्हाला हनुमानाची कृपा प्राप्त होते आणि आयुष्यामध्ये सुख, शांति आणि समृद्धी नांदते. संतान प्राप्तीसाठी हनुमान जयंतीला व्रत करणे फायदेशीर ठरते. या दिवशी हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठण केल्याने देखील फायदा होतो. मंगळवारच्या दिवशी हनुमानाची पूजा आणि त्यांना सिंदूर अर्पण केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील मंगल दोष कमी होतो. (Latest Marathi Headline)
हनुमान जयंती वर्षांतून देन साजरी केली जाते. वाल्मिकी रामायणानुसार, हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला झाला. मग शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती का साजरी केली जाते? यावर आधारित एक पौराणिक कथा देखील सांगितले जाते. या कथेनुसार, एकदा हनुमान लहान असताना त्यांना भुक लागली तेव्हा त्यांना आकाशात सूर्य दिसला, त्यांना वाटलं की ते फळ आहे. तेव्हा हनुमान सूर्याला गिळायला निघाले होते. (Top Stories)
========
========
तेवढ्यात, संपूर्ण पृथ्वीवर अंधार झाला. ही गोष्ट इंद्रदेवाला समजल्यावर त्यांनी हनुमानाला थांबविण्यासाठी वज्राने प्रहार केला, त्याचा परिणाम हनुमानावर झाला आणि ते बेशुद्ध झाले. जेव्हा ही गोष्ट पवनदेवाला कळली तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडातील हवा त्यांनी थांबवली. त्यामुळे पृथ्वीवरील जीव हे कासावीस होऊ लागले. तेव्हा ब्रह्म देव यांनी पवनदेवाला शांत करण्यासाठी हनुमान यांना जीवनदान दिले. ज्यादिवशी हनुमान यांना जीवनदान मिळाले तो दिवस हा चैत्र महिन्यातील पौर्णिमेचा होता. त्यामुळेच चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्ष पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. (Social News)
( टीप : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. आम्ही या माहितीची कोणतीही पुष्टी करत नाही. आमचा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- chaitra pournima 2026
- Hanuman Jayanti
- Hanuman Jayanti 2026
- Hanuman Jayanti celebration
- Hanuman Jayanti celebrations
- Hanuman Jayanti date 2026
- Hanuman Jayanti festival
- Hanuman Jayanti info
- hanuman jayanti information
- Hanuman Jayanti significance
- maruti
- shriram
- चैत्र पौर्णिमा
- मारुती
- श्रीराम
- हनुमान
- हनुमान जन्मकथा
- हनुमान जन्मोत्सव
- हनुमान जयंती
- हनुमान जयंती 2026
- हनुमान जयंती महत्त्व
- हनुमान जयंती माहिती