Home लाईफ स्टाईल Country : जगातील एकमेव देश ज्याचे नाव महिलेच्या नावावरून देण्यात आले आहे
लाईफ स्टाईल

Country : जगातील एकमेव देश ज्याचे नाव महिलेच्या नावावरून देण्यात आले आहे

0
Indian Flag Insult
Indian Flag Insult

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना फिरण्याचा छंद असतो. जमेल तेव्हा लगेच वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. देशात किंवा परदेशात फिरून नवनवीन जागा एक्सप्लोर करायला अनेकांना आवडते. यासाठी बरेच लोकांकडे जगाचा नकाशा देखील पाहायला मिळतो. जगातील सर्व देश वेगवेगळ्या कारणांसाठी ओळखले जातात. प्रत्येक देशाचे एक खास वैशिष्ट्य आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा देशाबद्दल सांगणार आहोत, ज्या देशाच्या नावामागे एक विशेष रहस्य आहे. याच नावामागील रहस्यामुळे हा देश जगात प्रसिद्ध आहे. जाणून घेऊया याच देशाबद्दल. (Country)

जगात एक असा देश आहे, ज्याच्या नावामुळे हा देश इतर सर्वच देशांच्या तुलनेत जास्त प्रसिद्ध आहे. या देशाचे नाव आहे, सेंट लूसिया. सेंट लूसिया हा एकमेव देश आहे, ज्याचे नाव एका ऐतिहासिक महिलेच्या नावानुसार ठेवले गेले आहे. कॅरिबियनमधील हे बेट-देश आपले नाव तिसऱ्या शतकातील ख्रिश्चन संत आणि शहीद ‘सेंट ल्युसी ऑफ सिराक्यूज’ यांच्या नावावरून घेतो. संत ल्युसी यांच्या नावावरून या देशाला हे नाव मिळालं असून, त्या सध्याच्या सिसीली येथील एक ख्रिस्तधर्मीय संत होत्या. ज्यांच्या बलिदानामुळं त्यांना थोरत्वं मिळवून दिलं. काही उपलब्ध संदर्भांनुसार सेंट ल्युसी (संत लुसिया) यांचा जन्म अंदाजे इ.स. 283 मध्ये सिसिलीतील सिराक्यूज येथे झाला. डायक्लिशियनच्या अत्याचाराच्या काळात त्यांच्या दृढ श्रद्धा आणि बलिदानासाठी त्यांना ओळखले जाते. १३ डिसेंबर हा त्यांचा विशेष दिवस आहे, जो अनेक ख्रिश्चन परंपरांमध्ये साजरा केला जातो, विशेषतः स्कॅंडिनेव्हिया आणि इटलीमध्ये, जिथे त्या प्रकाश आणि आशेचे प्रतीक मानल्या जातात. (Marathi)

विवाहित आयुष्याऐवजी त्यांना समाजसेवा, गरजुंना मदत अशा कामांत योगदान द्यायचं होतं आणि त्याचसाठी त्यांनी आपल्याकडे असणारा सर्व आर्थिक ठेवी खर्ची घातल्या. तत्कालीन सम्राटासाठी ही अपमानास्पद बाब ठरली आणि त्यानं त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. सेंट ल्सुयी यांच्याविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. या साऱ्यामध्ये एक दुवा कायम आढळतो तो म्हणजे गरजूंप्रती त्यांच्या मनात असणारी आत्मियता. ल्युसी या नावाचा अर्थ होतो, ‘लाईट’ किंवा ल्युसिड. असे म्हणतात की त्या दृष्टीहिनांच्याही संत होत्या. (Latest Marathi Headline)

Country

13 डिसेंबर रोजी वर्ष माहित नाही मात्र एक जहाज या भागावर आदळले आणि सेंट ल्युसिया देश जगासमोर आला. त्या दिवसापासून 13 डिसेंबर ही तारीख युरोपात ‘सेंट ल्युसी डे’ म्हणून साजरा केली जाते. ज्या खलाशांना हा देश सापडला, त्यांनी या देशाला सेंट ल्युसी हे नाव दिले. सेंट लूसियाचा इतिहास अनेक वेळा वसाहत बदलण्यातून गेला आहे. फ्रेंच आणि ब्रिटिश यांच्यात या बेताची सत्ता तब्बल 14 वेळा बदलली गेली. त्यामुळेच त्याला “हेलेन ऑफ द वेस्ट इंडीज” असे नाव मिळाले. ही तुलना ट्रॉयच्या हेलेनशी केली जाते, ज्यामुळे अनेक युद्धे झाली. (Top Stories)

========

Vastu Tips : घरात धन आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करायची आहे? वास्तुशास्त्रानुसार या ठिकाणी ठेवा जेड प्लांट

========

मात्र अनेक बदलांनंतरही सेंट लूसियाने आपले नाव आणि संस्कृती कायम ठेवली आहे. फ्रेंच आणि ब्रिटिश राज्याचा प्रभाव आजही त्यांच्या भाषा, खाद्यसंस्कृती आणि कायद्यात दिसून येतो. आज इंग्रजी ही अधिकृत भाषा आहे, पण सेंट लूसियन क्रेओल फ्रेंच (क्वेयोल) मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. सेंट लूसियाची राजधानी कॅस्ट्रिज आहे. देशाची लोकसंख्या सुमारे 1,80,000 आहे. पिटॉन्सचे जुळ्या शिखरांसाठी, दाट वर्षावनांसाठी, रंगीबेरंगी संगीत उत्सवांसाठी आणि पर्यटन उद्योगासाठी हा देश प्रसिद्ध आहे. देशाचे बोधवाक्य “द लँड, द पीपल, द लाईट” हा सेंट ल्युसी यांच्या परंपरेला दिलेला काव्यात्मक मान आहे. जगातील सेंट लूसिया हा एकमेव असा देश आहे, जो एका स्त्रीच्या प्रेरणादायी कथेला सन्मान देते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

लाईफ स्टाईल

Gold : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याला एवढे महत्त्व का आहे?

आज अक्षय्य तृतीया. साडे तीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेचे ओळख...

Parshuram
लाईफ स्टाईल

Parshuram : भगवान परशुरामांबद्दलची रंजक तथ्ये

परशुराम यांना भगवान विष्णू यांचा सहावा अवतार समजले जाते. मान्यतेनुसार भगवान विष्णू...

लाईफ स्टाईल

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला ‘ही’ कामे करून पुण्य कमवा

वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक...

लाईफ स्टाईल

Vallabhacharya : वल्लभाचार्य जयंती – कोण होते कृष्णभक्त वल्लभाचार्य?

आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अकरावी तिथी अर्थात. आज चैत्र महिन्यातील एकादशीचा...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!