उद्या सर्वत्र रंगपंचमीचा सण साजरा होणार आहे. रंगपंचमी म्हणजे होळीचा शेवटचा दिवस. होळीचा सण हा फाल्गुन पौर्णिमेपासून सुरु होतो आणि रंगपंचमीच्या दिवशी संपतो. रंगपंचमीच्या दिवशी सर्वत्र रंग खेळले जातात. अनेक ठिकाणी धुलीवंदनाच्या रंग खेळतात तर बहुतेक ठिकाणी रंगपंचमीला रंग खेळले जातात. मधल्या काही काही काळापासून चित्रपटांमुळे किंवा मालिकांमुळे आपण पाहिले तर रंग खेळण्यासाठी सर्वच जणं पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात आणि मग रंग खेळतात. आपण जुने कपडे घालून जरी रंग खेळलो तरी रंगपंचमीच्या दिवशी पांढरे कपडे घालून रंग खेळण्याची परंपरा तशी जुनी आहे. (Rangpanchami)
आपण शक्यतो रंग खेळण्यासाठी जुने गडद रंग असलेले कपडे घालतो, जेणेकरून त्यावर रंग लागला तरी तो निघून जाईल किंवा दिसणार नाही. आणि जुने कपडे असले तर ते फेकून देखील दिले जाऊ शकता. मात्र होळीला पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे हे बॉलीवूडने आणलेली फॅशन नाही तर त्यामागे एक खास आणि मोठा विचार आहे. प्राचीन काळी लोक साधेपणा आणि पवित्रतेचे प्रतीक म्हणून सफेद कपडे घालत असत. होळीला सफेद कपडे घालणे ही या परंपरेचाच एक भाग आहे, जी आजही लोकं पाळतात. (Marathi)
रंगपंचमीच्या सणाला लोक आपापसांतील मतभेद विसरून एकमेकांना शुभेच्छा देतात. रंगांची उधळण करतात, आनंद साजरा करतात. पांढरा रंग हा शांततेचं प्रतिक आहे तसंच पांढऱ्या रंगात प्रत्येक रंग खुलून दिसतो. त्यामुळे होळीच्या सणाला पांढरे कपडे खास परिधान केले जातात. पांढऱ्या कपड्यांमधून लोक शांतीचा संदेश देतात, असं मानलं जातं. तसेच, मनातील सगळी जळमटं दूर करून खुल्या मनाने लोकांचा स्विकार करणे हा गुण देखील पांढऱ्या रंगात आहे. रंगपंचमीचा सण हिवाळ्याचा शेवट आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे. (Latest Marathi Headline)

हवामान बदलते तसे वातावरणही बदलते आणि भूतकाळातील तक्रारी पुसून टाकून ती एक नवीन सुरुवात देखील दर्शवते. तुमच्या आयुष्यात नवीन रंग जोडण्याची वेळ आली आहे हा संदेश यातून मिळत असतो. पांढरा रंग हा शांतीचे प्रतीक मानला जातो. तो जीवनात सकारात्म ऊर्जा भरतो. नवीन आयुष्याच्या सुरुवातीसाठी तो एकदम परिपूर्ण रंग मानला जातो. जेव्हा रंग पांढऱ्या कपड्यांवर पडतात तेव्हा लोक कालांतराने एकसारखे दिसू लागतात आणि ते समानता आणि एकतेचे प्रतीक बनते. रंगीबेरंगी कपडे परिधान केल्याने कोणीही श्रीमंत किंवा गरीब दिसत नाही; तो समानतेने साजरा केला जातो. (Top Stories)
=======
Rangpanachami : नाशिकची ‘रहाड’ रंगपंचमी
=======
होळीच्या दिवशी पांढरा रंग परिधान करून लोक प्रेम, बंधुता आणि माणुसकी दाखवतात. या दिवशी पांढरा रंग धारण केल्याने मन शांत राहते. ज्यांना बोलण्यात राग येतो त्यांनी या दिवशी पांढरे कपडे घालावेत. होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टक होतो. या काळात सर्व शुभ आणि शुभ कार्य थांबतात कारण यावेळी वातावरणातील ग्रहांमध्ये नकारात्मकता वाढते. हे कमी करण्यासाठी पांढऱ्या रंगाचे कपडे वापरल्यास ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होण्यास मदत होते आणि अशुभ कामेही निर्माण होतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics