Home गाजावाजा स्पेशल Rangpanachami : नाशिकची ‘रहाड’ रंगपंचमी
गाजावाजा स्पेशल

Rangpanachami : नाशिकची ‘रहाड’ रंगपंचमी

72

होळी झाल्यानंतर पाचव्या दिवशी साजरी होते रंगपंचमी. होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात धुलीवंदनाच्या दिवशी अनेक ठिकाणी रंगोत्सव खेळाला जातो. मात्र काही ठिकाणी रंगपंचमीला रंग खेळतात. येत्या ८ मार्च रोजी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जल्लोषात रंगपंचमी साजरी होणार आहे. या दिवशी एकमेकांंना रंंग लावून आनंंदोत्सव साजरा करतात. कडक उन्हामुळे अंगाची होणारी दाह शांत व्हावी म्हणून रंग खेळले जातात. शिवाय या रंगपंचमीचा सण उन्हाळ्याच्या सुरुवातीला येत असल्याने येणारा उन्हाळा आपल्याला बाधू नये म्हणून देखील हा सण साजरा केला जातो. (Rangpanchami)

आजच्या काळात बहुतकरून होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशीच अर्थात धुलिवंदनालाच रंग खेळले जातात. खूप कमी ठिकाणी रंगपंचमी साजरी होते. यातलेच एक ठिकाण म्हणजे नाशिक. होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये धुलिवंदनाचे निमित्त साधून वीरांची मिरवणूक मोठ्या गाजावाज्यामध्ये काढली जाते. त्यानंतर रंगपंचमीला येथे रंग खेळतात. आता तुम्ही म्हणाल मग यात काय नवल आहे…? महाराष्ट्रामध्ये रंगपंचमीलाच रंग खेळण्याची परंपरा आहे. मात्र जिथे आपण अनेक उत्तर भारतीय प्रथांचे अनुकरण करत असताना धुलिवंदनालाच रंग खेळण्याची त्यांची पद्धत देखील उचली आहे. तिथे मात्र नाशिक शहराने रंगपंचमीला रंग खेळण्याची आपली परंपरा आजही चालू ठेवलेली दिसते. (Todays Marathi Headline)

नाशिकमधील रंगपंचमीची बातच निराळी आहे. एकदा जर तुम्ही नाशिकमध्ये रंगपंचमी खेळात तर नक्कीच कायम याच शहरात येऊन हा सण साजरा कराल. कारण नाशिककरांसाठी रंगपंचमीचे खास वैशिष्ट्य आहे. आणि ते म्हणजे इथे असणाऱ्या ‘रहाडी’. हो…नाशिकच्या रंगपंचमीची रहाड संस्कृती संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या दिवशी शहरामध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवत असते. ठिकठिकाणी पाण्याचे मोठमोठे शॉवर लावलेले असतात. शिवाय जुन्या नाशकात तर रहाडी असतातच. या रहाडीमध्ये रंग खेळले नाही तर नाशिककरांची रंगपंचमी पूर्णच होत नाही. (Marathi News)

Rangpanachami

आता अनेक लोकांसाठी रहाडी हा शब्द नवीन असेल. रहाडी म्हणजे काय? आणि काय आहे त्याचा इतिहास चला जाणून घेऊया. नाशिक आणि रंगपंचमी हे समीकरणच खूपच आनंद आणि ऊर्जा देणारे आहे. नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी जपण्यात येणारी अनोखी परंपरा म्हणजे ‘रहाड’. जवळपास २५० पेक्षा जास्त वर्षांपासून नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी रहाड रंगपंचमी खेळली जाते. रहाड म्हणजे एक मोठा आणि खोल हौद. रंगपंचमीच्या दिवशी या रहाडी उघडण्यात येतात. नाशिकमध्ये आधी १४ रहाडी होत्या, मात्र आज चार रहाडी असून, या सर्व पेशवेकालीन आहे. नाशिकची ही रहाड संस्कृती बघण्यासाठी दरवर्षी देशभरातून किंबहुना जगभरातून अनेक लोकं शहरात येतात आणि रंगांचा आनंद लुटतात. (Top Marathi News)

रहाडी म्हणजे काय?
रहाड म्हणजे १२ बाय १२ चा एक हौद जो तब्बल ८ फूट खोल असतो. या हौदाला पायऱ्या देखील असतात. हा हौद अर्थात रहाट रंगपंचमीला रंग खेळण्यासाठी तयार केली जाते. रंगपंचमीच्या काही दिवस आधी ही रहाड उघडून ती स्वच्छ करतात आणि मग त्यात पूर्णपणे नैसर्गिक रंग आणि पाणी टाकून ती खेळण्यासाठी सज्ज केली जाते. शहरातील प्रत्येक रहाटीमध्ये टाकण्यात येणारा रंग हा वेगवेगळ्या फुलांपासून तयार केला जातो. यासाठी विविध रंगाच्या फुलांना तासंतास उकळून त्याचा घोटून रस काढतात आणि तोच तस पाण्यात मिसळून रहाडीमध्ये टाकला जातो. (Latest Marathi Headline)

रहाडीमधील हे रंगाचे पाणी शरीराला अत्यंत गुणकारी मानलं जातं. या पाण्यात अंघोळ केल्याने, त्वचेचे आजार दूर होतात आणि उन्हाळा बाधत नाही अशी मान्यता आहे. रहाडीमध्ये एकमेकांना धप्पा देत या पाण्यात ढकलण्याची एक वेगळीच गंमत आपल्याला येथे पाहायला मिळते. मुख्य म्हणजे वर्षातले ३६४ दिवस या रहाडी बंद असतात. आज या रहाडीवरच वाहतुकीसाठी रोड बांधण्यात आले आहे. आपण अनेकदा सामान्य दिवसांमध्ये रहाडीवर उभे राहतो किंवा प्रवास करतो. पण आपल्याला जाणवत देखील नाही की, आपल्या पायाखाली रहाड आहे. कारण वर्षभर ही रहाड बंद ठेवली जाते. त्यावर सागवानी लाकडांच्या मोठमोठ्या रिफांचं आच्छादन टाकलं जातं. असं सांगितलं जातं की, या सागाच्या रिफाही जवळपास ३०० वर्ष जुन्या आहेत. (Top Stories)

========

Rangpanchami : होळीची समाप्ती होणारा रंगपंचमीचा सण कधी आहे?

========

रंगपंचमीच्या आधी या रहाडी उघडल्या जातात. त्यांना स्वच्छ करण्यात येते. त्यांची रंगरंगोटी केली जाते. त्यानंतर नैसर्गिक गोष्टींचा वापर करून खास रंग तयार केले जातात आणि याच रंगांचा वापर करून ऱ्हडीमध्ये रंगाचे पाणी तयार केले जाते. या पाण्यात फुले टाकली जातात. रंगपंचमीच्या दिवशी रहाडीची पूजा केली जाते, आणि त्यानंतर ती सर्वांसाठी खुली केली जाते. असे म्हणतात की, रंगपंचमीच्या दिवशी या रहाडीमध्ये उडी मारून ते पाणी आपल्या अंगावर घेतल्यास उन्हाळा बाधत नाही. म्हणूनच अनेक लोकं दुरून दुरून रहाडीमध्ये उडी मारण्यासाठी येतात. यंदा रंगपंचमीला रविवार असल्याने तुम्ही देखील नाशिकला जा आणि रहाडीचा आनंद घ्या. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

गाजावाजा स्पेशल

Akshaya Tritiya : जाणून घ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण येत्या...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

गाजावाजा स्पेशल

Ekadshi : वैशाख महिन्यात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महत्त्व

हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता...

Flight Ticket Booking
गाजावाजा स्पेशल

E-Arrival Card नक्की काय आहे? कोणासाठी महत्वाचा आणि कोणती कागदपत्रे सादर करावी याबद्दल घ्या जाणून

E-Arrival Card :  भारतातील विमानतळ प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल होत आहे....

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!