नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी रहाडी उघडल्या जातात आणि त्यात रंगपंचमी खेळली जाते. नाशिकची रहाड परंपरा अनेक दशकं जुनी आणि अतिशय खास आहे. पेशवे हे खरे या रहाडींचे जनक आहे, त्यांनी दगड आणि चुन्यात या रहाडींचं बांधकाम केले होते. नाशिकमध्ये आधी एकूण १८ रहाडी होत्या, मात्र अनेक रहाडी बुजवण्यात आल्या, त्यामुळे आता फक्त ४ रहाडी येथे पाहायला मिळतात. आता या रहाडी खुल्या करण्यात आल्या असून, नाशिक-करांना त्याचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. पेशवेकाळापासून रंग खेळण्यासाठी जुने नाशिक व पंचवटीच्या विविध भागांत रहाडींची निर्मिती करण्यात आली होती. दर वर्षी होळीच्या दुसऱ्या दिवसापासून रहाडीचे खोदकाम काम सुरू होते. (Nashik)
रंगपंचमीच्या आदल्या दिवसांपर्यंत स्वच्छता करून त्यात स्वच्छ पाणी भरून ठेवले जाते. रंगपंचमीच्या दिवशी त्यात रंग तयार करून टाकले जातात. त्यानंतर पुन्हा रहाडीची पूजा करून नागरिकांना रंग खेळण्यासाठी मोकळी करून दिली जाते. या पेशवेकालीन रहाडीत पाणी आणि रंग मिसळून जलदेवतेची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा होते. आज नाशिकमध्ये शनी चौकातील रहाड, तांबट लेन येथील रहाड, दंडे हनुमान चौकातील रहाड, दिल्ली दरवाजा रहाड आणि तिवंधा चौकातील रहाड या सर्व रहाडी चालू आहेत. प्रत्येक रहाडीचे एक वैशिष्ट्य आणि एक रंग ठरलेला आहे. या सर्व राहाडींबद्दल जाणून घेऊया. (Marathi)
शनी चौक रहाड
काळाराम मंदिराच्या उत्तर दरवाजाला असलेली शनी चौकातील रहाड पेशवे काळापासून प्रसिद्ध आहे. पूर्वी या भागात पेशव्यांचे सरदार राहायचे. तेव्हा येथे कुस्त्या खेळण्याचा हौद होता. रास्ते सरदार याची देखभाल करत. हाच हौद पुढे राहाडीमध्ये बदलण्यात आला. शनी चौकातील शनी चौक मित्र मंडळ आणि सरदार रस्ते आखाडा परंपरेने रहाडीची काळजी घेत आहे. शनी चौकातील होळी रात्री बारानंतर पेटवली जाते. तर सकाळपासून रहाड उघडण्यास सुरुवात होते. या रहाडीचा रंग गुलाबी असून, हा रंग कायमस्वरूपी एकच असतो. रंगपंचमीच्या दिवशी दीक्षित घराण्याचे मानकरी रहाड पूजा करतात. (Todays Marathi Headline)

दिल्ली दरवाजा रहाड
गाडगे महाराज पुलाजवळ असलेल्या दिल्ली दरवाजा चौकात असलेल्या रहाडीचा मान तुरेवाले पंच मंडळ यांच्याकडे आहे. रहाडीची परंपरा सुरू ठेवण्यासाठी आझाद सिद्धेश्वर दिल्ली दरवाजा मंडळाची स्थापना करण्यात आली होती. पळसाच्या फुलांपासून या रहाडीसाठी रंग बनवला जातो. हे या रहाडीचे वैशिष्ट्य आहे. या रहाडीचा रंग केशरी आहे. (Latest Marathi Headline)
तांबट लेन रहाड
पेशवेकालीन पाषाणातील दगडाच्या बांधकामात असलेल्या या रहाडीचा रंग लाल आहे. रंगपंचमीच्या दिवशी येथील पाच कुटुंबीयांना पूजेचा मान दिला जातो. या रहाडीचा रंग तयार करण्यासाठी पळसाची फुले, तुळस आणि चंदनाचा वापर केला जातो. (Top Trending Headline)
======
Rangpanachami : नाशिकची ‘रहाड’ रंगपंचमी
Rangpanchami : रंग खेळताना कपडेच का घातले जातात?
======
तिवंधा चौक रहाड
जगप्रसिद्ध अशा बुधा हलवाईच्या दुकानासमोर असलेल्या तिवंधा चौकातली ही पेशवेकालीन रहाड नाशिकमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. या रहाडीचा रंग पिवळा आहे. रंगपंचमीच्या दिवशी संपूर्ण रहाड सजवल्यानंतर रहाडीची विधिवत पूजा केली जाते. रहाडीचा मान जळगावकर कुटुंबीयांना आहे. विशेष म्हणजे या रहाडीत महिलांना प्रवेश दिला जातो. या रहाडीमध्ये अर्धा भाग महिलांसाठी राखीव ठेवला जातो. (Top Stories)
दंडे हनुमान चौक रहाड
नाशिकमधील काझीपुरा पोलीस चौक परिसरात ही पेशवे कालीन दंडे हनुमान रहाड आहे. या रहाडीत पिवळा रंग तयार केला जातो. जवळपास २०० किलो हून अधिक फुलांना एकत्रित करून हा रंग तयार केला जातो. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics