Home गाजावाजा स्पेशल Women’s Day : जागतिक महिला दिनाचा इतिहास आणि माहिती
गाजावाजा स्पेशल

Women’s Day : जागतिक महिला दिनाचा इतिहास आणि माहिती

72

स्त्री या समाजाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. स्त्रीशिवाय आपण या जगाची कल्पनाच करू शकत नाही. मुख्य म्हणजे स्त्री नाही तर हे जगच नाही. अशा या स्त्रीचा सन्मान करण्यासाठी आणि तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस तर असलाच पाहिजे. रोज सकाळपासून रात्रीपर्यंत स्त्री घरात, बाहेर झगडत असते ते केवळ आपल्या कुटुंबासाठी. गृहिणी असो किंवा नोकरदार स्त्री असो दोघींची लढाई सारखीच असते. फरक असतो तो जागेचा. अशा या स्त्रीचा जागर करण्यासाठी साजरा केला जातो महिला दिन. ८ मार्चला दरवर्षी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो. हा दिवस लिंग समानता, पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो. (Women’s Day)

महिला सक्षमीकरण, समानता आणि हक्कांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या संघर्षांचा, त्यांच्या कामगिरीचा आणि समाजातील त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेचा सन्मान करतो. महिला दिनाची सुरुवात २०व्या शतकात झाली. १९०८ मध्ये न्यूयॉर्क येथे महिला कामगारांनी कमी वेतन, जास्त कामाचे तास आणि मतदानाच्या हक्कासाठी ८ मार्च रोजी आंदोलन केले होते. त्यानंतर १९१० मध्ये समाजवादी नेत्या क्लारा झेटकिन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. पुढे १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने अधिकृत मान्यता दिल्यानंतर या दिवसाला जागतिक स्वरूप प्राप्त झाले. (Top Marathi News)

१९ मार्च १९११ रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आाला. ऑस्ट्रिया, जर्मनी, डेन्मार्क आणि स्वित्झर्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला होता. त्यानंतर ८ मार्च १९७१ रोजी रशियातील महिलांनी संप केला. त्यानंतर ही तारीख बदलून ८ मार्च निश्चित करण्यात आली. तेव्हापासून ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. (Latest Marathi Headline)

Women's Day

८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात एकत्र येऊन प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा हा क्लारा यांनी मांडलेला ठराव पास झाला. (Top Trending News)

भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम निश्चित केली जाते. “जेव्हा आपण देतो, तेव्हा आपणच अधिक मिळवतो” हा २०२६ च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा मुख्य संदेश आहे. Give To Gain ही थीम उदारता, सहकार्य आणि परस्पर समर्थनाची ताकद अधोरेखित करते. लिंगसमता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येऊन योगदान देण्याचे आवाहन या मोहिमेतून करण्यात आले आहे. (Top Stories)

========

Health Care : महिलांच्या पायांच्या नसा का फुगतात? वाचा वेरिकोज वेन्स होण्यामागील 5 मुख्य कारणे

========

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना समान वेतन, शिक्षण, सुरक्षितता मिळावी आणि महिलांवरील हिंसाचार संपवणे यासारख्या मुद्द्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यात येते. ज्यां महिलांनी त्यांच्या कुटुंबात, कामाच्या ठिकाणी आणि समुदायात बदल घडवून आणला आहे, त्यांच्या सन्मानासाठीही हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस केवळ एक उत्सव नाही तर महिलांचे हक्क आणि कामगिरी ओळखण्यासाठी आणि त्यांच्यावरील भेदभाव संपवण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे, लिंग समानता सुनिश्चित करणे आणि समाजात महिलांची भूमिका अधिक मजबूत करणे आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%

पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा

Related Articles

गाजावाजा स्पेशल

Akshaya Tritiya : जाणून घ्या अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचे धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण येत्या...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

गाजावाजा स्पेशल

Ekadshi : वैशाख महिन्यात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महत्त्व

हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता...

Flight Ticket Booking
गाजावाजा स्पेशल

E-Arrival Card नक्की काय आहे? कोणासाठी महत्वाचा आणि कोणती कागदपत्रे सादर करावी याबद्दल घ्या जाणून

E-Arrival Card :  भारतातील विमानतळ प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल होत आहे....

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!