आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले आरोग्य जपणे अतिशय आवश्यक झाले आहे. आजची पिढी ही फास्टफूडच्या आहारी असल्याने आणि खाण्यापिण्याच्या पद्धती बदल्याने त्यांना खूपच कमी वयात अनेक गंभीर त्रासांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आपल्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. आता तब्येतीची काळजी घेण्यासाठी सकस आहार आणि त्यासोबतच थोडा व्यायाम जरुरी आहे. आता व्यायाम म्हटल्यावर अनेक लोकं म्हणतील, आम्हाला व्यायामाला वेळच नाही. मग कसा व्यायाम करावा? मात्र व्यायाम म्हणजे केवळ जिममध्ये जाऊन करणे असे नाही, तर दररोज काही किलोमीटर चालणे देखील उत्तम व्यायाम आहे. (Health)
दिवसभरामध्ये तुम्ही 40 ते 45 मिनिटे चालल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. चालल्यामुळे फक्त तुमचे वजन कमी होत नाही तर तुमच्या शरीरातील अनेक स्नायूंची क्रिया होते. चालल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. त्योसबतच जेवल्यानंतर 20 मिनिटे चालल्यामुळे तुमच्या हृदयाचे आरेग्या निरोगी राहाण्यास मदत होते. अनेकांना प्रश्न पडला असेल की दिवसभरामध्ये नेमकं किती वेळ चालणे आवश्यक आहे. जर तुम्ही दररोज हजारो पावले नियमितपणे चालत असाल तर तुम्हाला निरोगी राहण्यासाठी कोणताही व्यायाम करण्याची गरज नाही. अशाप्रकारे मधुमेहासारख्या असाध्य आजारापासून तुम्ही मुक्त होऊ शकता. (Walk)
दररोज अंदाजे ७,००० ते १०,००० पावले चालण्याची शिफारस करतात. सात ते दहा हजार पावले म्हणजे अंदाजे पाच ते आठ किलोमीटरचे अंतर. जर तुम्हाला चांगले आरोग्य राखायचे असेल, तर तुम्ही दररोज एक तास चालण्यासाठी काढला पाहिजे. फक्त एका महिन्यात, तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम आपोआप जाणवतील. साधारण १० हजार पावलं हे योग्य मानक मानले जाते. दररोज 7000 पावले चालल्याने हृदयरोग, कर्करोग सारखे गंभीर आजारांचा धोका कमी होतो. हृदयरोगाचा धोका 25% कमी होतो. कर्करोगाचा धोका 37% कमी होतो. टाइप-2 मधुमेहाचा धोका 14% कमी होतो. नैराश्य 22% कमी होते. (Todays Marathi Headline)

आरोग्य तज्ज्ञांच्या मते 18 ते 30 वर्षे वयोगटातील लोकांनी दिवसातून 30 मिनिटे ते 60 मिनिटे चालने गरजेचे असते. तसेच 30 वर्षांवरील आणि 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी 30 ते 45 मिनिटे चालणे योग्य आहे. या लोकांनी रोज इतके चाललेच पाहिजे. याशिवाय 51 ते 65 वयोगटातील लोकांनी रोज 30 ते 40 मिनिटे चालायला हवे. या वयातील लोकांसाठी इतके चालणे चांगले आहे. तसेच 66 ते 75 वयोगटातील वृद्धांसाठी 20 ते 30 मिनिटे चालणे चांगले आहे. यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि आजारांपासून आपले संरक्षण होते. (Top Stories)
=======
Lifestyle Health : अचानक उभे राहिल्यावर चक्कर येते ? दुर्लक्ष करू नका
Parenting Tips : बालपणापासूनच मुलांना शिकवा या ६ सवयी, भविष्यात नक्कीच होईल फायदा
=======
चालण्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. दररोज सकाळी लवकर उठून चालल्यामुळे तुमच्या शरीरातील अवयवांची हालचाल होते त्यासोबतच तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तुम्हाला जर अॅसिडिटीचा त्रास असेल तर सकाळी जिऱ्याचे पाणी पिऊन किमान २० मिनिटे चालल्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतात. चालल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य निरोगी राहाते त्यासोबतच तणाव कमी होण्यास मदत होते. सकाळी चालल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण होते त्योसोबतच वजन कमी होण्यास मदत होते. वय काहीही असो, रोज चालणे हा आरोग्यासाठी एक सोप्पा आणि प्रभावी उपाय आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्या शरीराला योग्य वाटेल इतके चालण्याचे प्रमाण ठरवा. आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा सोपा उपाय तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल! (Social News)
(टीप: ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय किंवा व्यायाम करण्यापूर्वी संबंधीत क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics