घाम येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. घाम आल्यावर जरी आपल्याला त्रास होत असला तरी, घाम येणे एकाअर्थी चांगले देखील असते. घामावाटे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. मात्र घाम आल्यानंतर आपल्या शरीरातून दुर्गंध देखील येतो, खासकरून काखेतून. काखेतून येणारा घामाचा दुर्गंध आणि काळी झालेली काख महिलांसाठी डोकेदुखीच आहे. ऑफिसमध्ये किंवा चारचौघांमध्ये काखेतून घामाचा येणारा दुर्गंध आणि काळी पडलेली काख लाजिरवाणे वाटते. यामुळेच अनेक महिला स्लिव्हलेस ड्रेस घालणे टाळतात. या काळपटपणा आणि दुर्गंधीमुळे तर काही महिलांचा आत्मविश्वास सुद्धा कमी होऊन जातो. काखेत वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले मास्क, रॉलोन किंवा इतर अनेक वेगवेगळ्या क्रीम आणून लावल्या जातात. मात्र या क्रीम लावल्यामुळे त्वचा अधिकच निस्तेज आणि कोरडी होऊन जाते. त्वचेमधील तेल कमी होऊन जाते. आज आपण याच मोठ्या समस्येवर घरगुती अतिशय सोपे आणि सहज करता येतील, मुख्य म्हणजे अपेक्षित परिणाम देणारे उपाय जाणून घेऊया. (Skin Care)
लिंबाचा रस
काळेपणा दूर करण्यासाठी लिंबाचा रस हे सर्वात उत्तम उपाय आहे. त्यामुळे काखेतील काळेपणा दूर करण्यासाठी 3 चमचे लिंबाचा रस घ्या आणि त्यात साखर मिक्स करा. या मिश्रणाने काखेत 10 मिनिटं मसाज करा. (Marathi)
हळद-बेसन-दही पॅक
या पॅकेचा काखेतीली काळेपणा दूर करण्यासाठी खूप फायदा होतो. हा पॅक साधारण 10 मिनिटं काखेत लावून ठेवा नंतर पाण्याने धुवा.
बटाट्याचा रस
काळेपणा दूर करण्यासाठी बटाट्याचा रस सर्वोत्तम मानला जातो. एका बटाट्याचा किस करून त्याचा रस काढून घ्या. आणि या रसने काखेत मसाज करा. हे सगळे उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा. तर याचा फायदा होईल. (Skin Care Tips)
ओट्स-मध
ओट्स आणि मध एकत्र करुन या पॅकने काखेत स्क्रब करा आणि नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. या पॅकमुळे तुमच्या काखेतील घाण निघून जाते आणि काळपटपणा हळूहळू नाहीसा व्हायला लागतो. (Todays Marathi Headline)
इनो
इनोमध्ये लिंबाचा रस आणि मध मिक्स करा. आणि हे मिश्रण सुमारे 2 ते 3 मिनिटे अंडरआर्म्सवर लावून ठेवा.
कोरफड
कोरफडीचा गर काढून त्याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट 10 ते 15 मिनिटांसाठी अंडर आर्मवर लावून ठेवा.

बदाम तेल
बदाम तेलाचा मसाज काखेत केल्याने फायदा होतो. (Social Updates)
काकडी
काकडीची पेस्ट बनवा आणि या पेस्टने काखेत मसाज करा.
नारळाचे तेल
नारळ प्रत्येक गोष्टींवर गुणकारी आहे. नारळामध्ये व्हिटॅमिन ई आणि पोषणतत्त्वे असतात. नारळाचे तेल दररोज काखेला लावल्यास काळी होत नाही. तेलामुळे काखेतील दुर्गंधी देखील कमी होते.
कोरफड जेल
कोरफड देखील आयुर्वेदात अतिशय गुणकारी मानली जाते. कोरफड जेल काखेला लावल्यामुळे काख स्वच्छ होते. कोरफडीमुळे डेड स्किन निघून जाते आणि काख स्वच्छ होते. कोरफडीचे जेल काळ्या भागावर लावा. ही जेल तशीच 10 मिनिटे ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुवून काढा. (Latest Marathi Headline)
अॅप्पल सीडर व्हिनेगर
अॅप्पल सीडर व्हिनेगर मध्ये अँटीऑक्सीडेंटस आणि नैसर्गिक अॅसिड आढळतं. हे बॅक्टीरियाला नष्ट करतं. एक स्प्रे बाटलीत एक चमचा अॅप्पल सीडर व्हिनेगर आणि ½ कप पाणी मिसळा. हे मिश्रण एका बाटलीत टाका. याला एंटीपर्स्पिरेंट प्रमाणे वापरा. वापरण्यापूर्वी बाटली हालवून घ्या.
पेपरमिंट ऑइल
पेपरमिंट मध्ये आढळणारे नैसर्गिक मेन्थाल शरीरातून येणार्या दुर्गंधीला दूर करतात तसेच याने काखेत होणार्या पुरळांपासून मुक्ती मिळते. आपल्या हातात ऑर्गेनिक पेपरमिंट ऑइलचे काही थेंब घेऊन काखेत लावा. हे लावल्यानंतर खाज सुटत असेल तर लगेच धुऊन टाका. (Top Trending News)
टी ट्री ऑइल
टी ट्री ऑइल मध्ये अँटी बॅक्टीरियल, अँटी सेप्टिक गुण आढळतात. याचसोबत त्यात शक्तिशाली अँटीऑक्सीडेंटसही असतात जे दुर्गंध पसरवणारे बॅक्टीरिया नष्ट करतात. घाम येणार्या ग्रंथींनी नियमित करत आणि कोणत्याही प्रकाराची सूज कमी करतं. या तेलाचे काही थेंब आपल्या हातावर घेऊन काखेत लावा. दुर्गंध दूर करण्यासाठी हे दररोज वापरू शकतात.
योग्य आहार
उन्हाळ्यामध्ये आपल्याला हलक्या आहारचे सेवन केले पाहिजे. जास्त गरम खाल्याने त्याचा परिणाम थेट आपल्या त्वचेवर होत असतो. नारळपाणी, ज्यूस, फळे, पाणी, ताक अशा पेयांचे सेवन जास्त केले पाहिजे, त्यामुळे आपले शरीर आतून थंड राहते. (Top Stories)
योग्य परफ्युम
आपण काही वेळेस परफ्युम जास्त चांगल्या सुगंधामुळे घेतो, परंतु त्यामध्ये असणाऱ्या रसायनामुळे आपल्या त्वचेवर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. परफ्युम शक्यतो दुसऱ्यांचा वापराने टाकावे. परफ्युम थेट त्वचेवर वापरू नये, तो कपड्यांवर वापरावा.
=========
Lifestyle Health : अचानक उभे राहिल्यावर चक्कर येते ? दुर्लक्ष करू नका
Parenting Tips : बालपणापासूनच मुलांना शिकवा या ६ सवयी, भविष्यात नक्कीच होईल फायदा
=========
फिट कपडे घालणे टाळा
उन्हाळ्यात सैल व सुती कपड्यांचा जास्त वापर करा. फिटिंग कपडे किंवा शरीराला चिकटणारे कपडे घातल्याने शरीराला श्वास घेता येत नाही आणि त्यामुळे आपल्या काखेत घाम आणि दुर्गंध येतो.
व्हिनेगर
कापसाच्या बोळ्याच्या सहाय्यानं व्हिनेगर काखेत लावावे. सकाळ व संध्याकाळी हा प्रयोग केल्यास काखेतून येणारा दुर्गंध कमी होण्यास मदत होते. व्हिनेगरमध्ये मायक्रो-बॅक्टेरिअल तत्व असतात, यामुळे नैसर्गिक सुंगध मिळतो. (Social News)
लॅव्हेंडर ऑइल
एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये लॅव्हेडर ऑइलचे काही थेंब मिसळावेत. या स्प्रेचा वापर डीओप्रमाणे दररोज करावा. काखेवर स्प्रे केल्यानंतर घाम आल्यास त्याचा दुर्गंध येणार नाही. लॅव्हेंडर ऑइलमध्ये निसर्गतःच एक सुंगध असून तो दुर्गंध कमी करण्याचे काम उत्तम प्रकारे करतो.
(टीप : या लेखातील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics