Home आंतरराष्ट्रीय Iran Displacement : युद्धाच्या दाहकतेमुळे इराणमधून सर्वाधिक पलायन
आंतरराष्ट्रीय

Iran Displacement : युद्धाच्या दाहकतेमुळे इराणमधून सर्वाधिक पलायन

72

अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांमुळे इराणमधील नागरिकांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. आधीच इराणमध्ये महागाईमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले होते, त्यात आता युद्धामुळे अधिक भर पडली आहे. अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले वाढल्यामुळे इराणमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यात ३० हून अधिक रुग्णालयांचे नुकसान झाले आहे. जी रुग्णालये शाबूत आहेत, त्यामध्ये औषधोपचारांच्या सोयींची वाणवा आहे. यामुळे अनेक जखमी नागरिक हताशपणे अन्य ठिकाणी जात आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, आतापर्यंत अंदाजे ३.२ लाख इराणी नागरिकांनी आपली घरे सोडली आहेत. यामध्ये इराणची राजधानी तेहरानमधून अधिक प्रमाणात पलायन झाले आहे. हा विस्थापनाचा आकडा पुढील काही दिवसांत दुप्पट वाढण्याची भीती आहे. कारण सध्या तेहरानमध्ये अमेरिकेचे हल्ले वाढले आहेत. तसेच सतत जळणाऱ्या तेलाचा वास शहरात पसरला आहे. येथे काळा पाऊस झाल्याने आधीच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यात आता येथील हवा अत्यंत प्रदूषित झाल्यामुळे नागरिक अन्य शहरांसह शेजारील इराकमध्येही मोठ्या संख्येने विस्थापित होत आहेत. ( Iran Displacement )

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. युद्धाला दोन आठवडे झाले तरी त्याची धग कमी झालेली नाही. उलट अधिक घातक शस्त्रास्त्रांचा वापर सुरू झाला आहे. अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील लष्करी तळांवर इराण हल्ले करत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल आणि अमेरिका इराणवर हल्ले करत आहेत. या वर्चस्वाच्या लढाईत इराणच्या नागरिकांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेले नागरिक युद्धामुळे होरपळत आहेत. इराणमधील काही शहरांत पिण्याच्या पाण्याचे साठेही दूषित होऊ लागले आहेत. त्यामुळे या शहरांतून मोठ्या प्रमाणात विस्थापन सुरू झाले आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध लष्करी कारवाई सुरू केल्यापासून सुमारे ३.२ लाख लोक विस्थापित झाले आहेत. हजारो इराणी कुटुंबांनी आपली घरे सोडून दिली आहेत. हे नागरिक प्रमुख शहरे सोडून देशाच्या उत्तरेकडील आणि ग्रामीण भागात जात आहेत. मात्र आता अमेरिका सर्वदूर हल्ले करत असल्यामुळे शेजारील इराकमध्येही मोठ्या प्रमाणात इराणी नागरिक जात आहेत.

या सर्वांमध्ये तेहरानची परिस्थिती अधिक भयावह आहे. तिथे मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचा मारा होत आहे. शहराच्या अनेक भागांतून मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. काही रुग्णालयांवरही हल्ले करण्यात आले आहेत. ३० हून अधिक रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. जी आरोग्य केंद्रे सुस्थितीत आहेत, त्यांच्याकडे पुरेसा औषधसाठा नाही. जखमी नागरिकांची संख्या वाढल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढला आहे. अन्नधान्याची टंचाईही गंभीर समस्या बनली आहे. अमेरिकेच्या हल्ल्याच्या भीतीने अनेक दुकाने बंद करण्यात आली आहेत. कामगार बेरोजगार झाले असून रोजगाराच्या शोधार्थ अनेकजण इराककडे वळत आहेत. इराण-इराक सीमेवरील हाजी उमरान क्रॉसिंग उघडण्यात आल्यानंतर हजारो इराणी नागरिकांनी इराकमध्ये प्रवेश केला. अनेक कुटुंबे उत्तर इराकच्या कुर्दिश प्रदेशात दाखल झाली आहेत. तेथे स्वस्त तांदूळ, तेल, सिम कार्ड आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करत आहेत. ( Iran Displacement )

=======

हे देखील वाचा : Benjamin Netanyahu : नेतन्याहू जिंदा है तो… या दाव्यानं जगभर खळबळ

=======

इराणमध्ये इंटरनेट सुविधा मोठ्या प्रमाणात खंडित झाल्यामुळे अनेक कुटुंबांना आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधता येत नाही. त्यामुळे सिम कार्ड खरेदी करण्यासाठी आणि फक्त फोन करण्यासाठीही लोक कुर्दिश प्रदेशात येत आहेत. काही नागरिक आपल्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी इराकमध्ये जात आहेत. अनेक वृद्ध नागरिक दिवस-रात्र चालत फक्त संपर्क साधण्यासाठी सीमा ओलांडत आहेत. काहीजण फक्त तांदूळ आणि तेल खरेदी करण्यासाठी इराकमध्ये येत आहेत. दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या युद्धामुळे इराणी जनतेची दैना झाली आहे. युद्ध आणखी काळ चालू राहिले तर नागरिकांना इतर देशांत स्थलांतर करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. ( Iran Displacement )

– सई बने

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!

📈
शेअर बाजार
लोड होत आहे...
--
NIFTY 50
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
SENSEX (BSE)
--
--
उच्चांक
--
नीचांक
--
उघडणे
--
📊 NIFTY BANK  |  ⚡ NIFTY ENERGY  |  💊 NIFTY PHARMA  |  🚗 NIFTY AUTO  |  💻 NIFTY IT  |  🏠 NIFTY REALTY
⚡ NSE/BSE डेटा लोड होत आहे...
गाजावाजा
🥇
सोने & चांदी दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर
लोड होत आहे...
⚡ दर अंदाजे आहेत | IOC संदर्भ
गाजावाजा
पेट्रोल & डिझेल दर
लोड होत आहे...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई
लोड होत आहे...
⚡ IOC दराप्रमाणे
गाजावाजा

Related Articles

Katrina Kaif
आंतरराष्ट्रीय

Jiang Xueqin : चीनच्या नॉस्ट्राडॅमसने सांगितले ट्रम्पचे भविष्य

अमेरिका-इराण युद्धामध्ये पंधरा दिवसांचा विराम आला आहे. यात चीनची भूमिका असल्याची माहिती...

Jewellery
आंतरराष्ट्रीय

Jared Kushner : ट्रम्पचा जावई आहे तरी कोण

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर कायमचा विराम आणण्यासाठी पाकिस्तानची राजधानी...

Mobile
आंतरराष्ट्रीय

First Lady Melania Trump : अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसाठी शाही सवारी

इराणमध्ये सत्तांतर करण्याच्या हेतूने अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध लष्करी मोहीम...

आंतरराष्ट्रीयगाजावाजा स्पेशल

US-Iran War : अमेरिका नमली की इराण घाबरलं ?

America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या...

WhatsApp वर शेअर करा
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!